Lek ladki yojana 2025: महाराष्ट्र सरकारने मुलीच्या भवितव्यासाठी लेक लाडकी योजना चालू केली आहे. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून सरकार गरीब कुटुंबातील मुलींना लखपती बनवण्याचे धोरण सरकारने हाती घेतले आहे. महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत मुलींना 1 लाख 1 हजार रुपये सरकारकडून आर्थिक मदत म्हणून दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार हे नेहमी महिला व मुली च्या हेतूसाठी नवनवीन योजना राबवत असतो चला तर जाणून घेऊया लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे? नेमकी ही योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ? जाणून घेऊया सविस्तर.
Lek Ladki Yojana 2025
क्र. | योजनेचे घटक | तपशील |
---|---|---|
१. | योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
२. | योजना चालवणारी संस्था | महाराष्ट्र सरकार |
३. | पात्र मुली | लाभार्थ्याकडे केसरी किंवा पिवळे रंगाचे रेशन कार्ड असावे. जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना योजना लागू राहील. |
४. | लाभार्थी कुटुंब | लाभ घेणारा कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. |
५. | योजनेचे फायदे | मुलीच्या जन्मापासून ₹5000 ते वय 18 वर्षांपर्यंत एकूण ₹1,01,000 मिळणार आहे. |
६. | योजनेचा उद्देश | गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत प्रदान करणे. |
७. | अधिक माहितीसाठी वेबसाईट | लेक लाडकी योजना |
Lek ladki yojna2025: लेक लाडकी योजना काय आहे ?
महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी ‘ योजनेमार्फत मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत सरकारकडून मुलींना 1 लाख 1 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना मुलीच भविष्य उज्वल होण्यासाठी सरकारने चालू केले आहे. मुलींचे शिक्षण, आरोग्य, आणि सर्वांगीण विकासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
Lek ladki yojana 2025: लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
- लेक लाडकी योजनेमार्फत सरकारचे उद्दिष्ट असे आहे की मुलींचा जन्मदर वाढवणे आणि मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देणे.
- मुलींच्या शिक्षणाला चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे या योजनमार्फत.
- मुलींचा बालविवाह रोखणे.
- कुपोषण कमी करणे.
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- मुलींना सक्षम बनवणे. यासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवण्यात आली आहे.
Lek ladki yojana 2025: लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र असणार आहे ?
लेक लाडकी योजना ही पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिली मध्ये गेलरुपये 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये,11 वित गेल्यावर 8 हजार रुपये , मुलीला 18 पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा पद्धतीने त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ सरकारतर्फे मिळणार आहे. सरकारतर्फे डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंट वर (DBT) प्रणाली द्वारे लाभाची रक्कम हे त्यांना देण्यात येणार आहे.
1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या 1 किंवा 2 मुलींना तसेच एक मुलगी व एक मुलगा असल्यास मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.तसेच दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुली असल्यास या योजनेचा लाभ मिळू शकतो . पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठ माता पितांनी शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील कारण कुटुंब नियोजन प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
Lek ladki yojana2025: लेक लाडकी योजनेचा लाभ
1. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5 हजार रुपये.
2. मुलगी पहिलीत असताना तिला 6 हजार रुपये मिळणार.
3. मुलगी सहावी गेल्यावर 7 हजार रुपये मिळतील.
4. मुलगी अकरावीत 11 गेल्यावर मिळतील ₹1000 रुपये मिळतील.
5. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीला सरकारकडून 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येईल.
Lek ladki yojana 2025: लेक लाडकी योजनेचे फायदे ?
1. आर्थिक मदत मदत: लेक लाडकी योजने अंतर्गत सरकार ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल त्या तुम्हाला हार्दिक साह्य म्हणून मदत करणार आहे.
2. शिक्षणासाठी सहाय्य: लेक लाडक योजनेअंतर्गत मुलीच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. तिचे शिक्षण चांगल्याप्रमाणे व्हावे म्हणून मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे शिष्यवृत्ती दिली जाते. मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळते.
3. आरोग्य आणि कल्याण: मुलीचे आरोग्य व कल्याणासाठी योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर आणि आरोग्य तपासणी आयोजित करते. यामुळे मुलीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
4. सोशल सुरक्षा: या योजनेअंतर्गत मुलींना सरकारी योजनेचा लाभ मिळवून दिला जातो विशेषता: कुपोषण, बालविवाह, आणि इतर सामाजिक अडचणी वर उपाय शोधला जातो.
5. सामाजिक जागृता: या योजनेमुळे मुलींची मान समाजामध्ये उंच होते, मुली विषय समाजामध्ये सकारात्मक बदल होतात.
Lek ladki yojana 2025: लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
क्र. | आवश्यक कागदपत्रे | तपशील |
---|---|---|
१. | लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला | मुलीचा जन्म प्रमाणित करणारा दाखला |
२. | कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1,00,000 पेक्षा जास्त नसावे. |
३. | लाभार्थी मुलींचे आधार कार्ड | योजनेचा लाभ घेणाऱ्याला आधार कार्ड आवश्यक आहे |
४. | पालकाचे आधार कार्ड | पालकांच्या आधार कार्डाची प्रती |
५. | बँकेच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स | बँक खाते तपशील आणि पानाची झेरॉक्स |
६. | शिधापत्रिका | पिवळी किंवा केशरी रंगाची शिधापत्रिका असणे आवश्यक |
७. | मतदान ओळखपत्र | मतदार ओळखपत्राचीझेरॉक्स |
८. | शाळेचा दाखला | मुलीच्या शाळेचा दाखला |
९. | कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र | कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अनिवार्य |
Lek ladki yojana2025: लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा ?
1.जर तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये राहत असाल तर अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला लेक लाडकी योजना चा अर्ज घ्या.
2. लेक लाडकी योजनेचा फॉर्म फॉर्म भरत असताना आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडावी, आणि फॉर्म काळजीपूर्वक भरत असताना मोबाईल नंबर, बँकेची तपशील, हे सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे.
3. हे सर्व तपशील बरोबर लिहून झाल्याच्या नंतर हा अर्ज अंगणवाडी सेविकाकडे द्यायचा आहे. आणि त्यांच्याकडून अर्ज भरल्याची स्लिप घ्यायची आहे.
Lek ladki Yojana 2025: या योजनेचा अर्ज केल्याच्या नंतर पुढे काय ?
अंगणवाडी सेविका कडून अर्जाची कागदपत्रे नीट तपासणी करू अर्जाची नोंदणी सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती करायचे आहे. त्यानंतर लेक लाडकी योजना चा अर्ज संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. त्यानंतर या योजनेची मंजुरी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे. त्यानंतर हा अर्ज दोन महिने प्रशासना कडून अर्जाची पडताळणी पूर्ण करण्यात येईल.
या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्याच्या नंतर या योजनेमध्ये मिळणारा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात.
निष्कर्ष: लेक लाडकी योजना या योजनेत लाभार्थी कुटुंबाला मुलीचा जन्म झाला की ₹5000 रुपये आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1 लाख 1 हजार रुपये रक्कम मिळते. या योजनेचा लाभ 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना मिळणार आहे. कुटुंबामध्ये एक किंवा दोन मुलींना झाला मिळणार आहे. च्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रंगाचे रेशन कार्ड आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे. या योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी लेक लाडकी योजना यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.