Pm Scholarship Yojana 2025: या योजनेत मुलींना मिळणार 36,000 तर मुलांना 30,000 ऑनलाईन अर्ज सुरू

PM Scholarship Yojana 2025: भारत सरकारने मुलींच्या शिक्षणाला नवीन चालना मिळवण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना मधील एक योजना म्हणजे पीएम स्कॉलरशिप योजना 2025, ही योजना विशेषता मुलींच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी सुरू केले आहे सरकारने. पीएम स्कॉलरशिप योजनेअंतर्गत सरकार मुलींना शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रगती होण्यासाठी सरकार तर्फे मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

खालील लेखांमध्ये स्कॉलरशिप योजना 2025 नेमकी काय आहे कोणी चालू केले आहे याची सविस्तर माहिती देऊ, म्हणजे हा लेख वाचून तुम्हाला या योजनेबद्दल योग्य माहिती मिळेल जसे की या योजनेसाठी कोण पात्र आहे, या योजनेचा अर्ज कुठे करायचा, या योजनेचे फायदे काय, या योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रे कोणते आहे, पी एम स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

पी एम स्कॉलरशिप योजनेअंतर्गत सरकार मुलांना 30,000 हजार रुपये तर 36,000 मुलींना शिष्यवृत्ती देते. याशिवाय या लेखांमधून आम्ही तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देऊ, यामुळे तुम्हाला या शिष्यवृत्तीचा फायदा होईल आणि तुम्ही तुमचे शिक्षण पुढे चालू ठेवू शकाल. चला तर आपण जाणून घेऊया पीएम स्कॉलरशिप 2025 या योजनेचा अर्ज प्रक्रियेबद्दल.

PM Scholarship Yojana 2025

योजनेचे नावपीएम स्कॉलरशिप योजना 2025
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
या योजनेत लाभमुलांना ₹30,000, मुलींना ₹36,000
अधिकृत वेबसाईटdesw.gov.in

PM Scholarship Yojana 2025: काय आहे ही योजना ?

ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की माजी सैनिक सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मुलांना आर्थिक मदत मिळावी शिक्षणासाठी. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी मुलांसाठी 30,000 हजार रुपये तर मुलींसाठी 36,000 हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून सरकार आर्थिक मदत देते. जर प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

PM Scholarship Yojana 2025:  या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ?

1. सैनिकांच्या कुटुंबांना शिक्षणासाठी आर्थिक मदत: प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की सैन्य, नौसेना, हवाई दल, आणि प्यारा मिलिटरी बलाच्या उच
शहीद झालेल्या जवानांच्या मुला मुलींना उच्च शिक्षणासाठी हार्दिक मदत म्हणून साह्य करणे.
2. उच्च शिक्षणाचा पोषक: कमीत कमी 12 पास झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना व्यवसाय किंवा उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
3. शिक्षणावर खर्च कमी करणे: पी एम स्कॉलरशिप योजनेमुळे विद्यार्थ्यांवर होणारा आर्थिक दबाव कमी होतो आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते.

PM Scholarship Yojana 2025: या योजनेसाठी कोण असणार आहे पात्र ?

पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर काही अटी आणि नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी नियम कोणते आहेत ते माहिती असणे आवश्यक आहे.

1. लाभार्थी विद्यार्थी :या योजनेसाठी लाभार्थी म्हणजे त्या मुलांचे किंवा मुलीचे असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वडील किंवा इतर कुटुंबामधले सदस्य सैन्य, हवाई दल, नौसेना किंवा परामिलिटरी मध्ये काम करतांना शहीद झालेले आहे. अशे विद्यार्थी पात्र आहे.
2. शैक्षणिक पात्रता: पी एम स्कॉलरशिप व्यवसायासाठी किमान बारावी पास झालेले विद्यार्थी पात्र आहे.
3. त्यानंतर बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी मान्य प्राप्त कॉलेज, संस्थेत इंजीनियरिंग, मेडिकल किंवा व्यवसायिक नाही तर इतर क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण प्रवेश घेणे आवश्यक आहे.
4. वय मर्यादा: दरवर्षी या योजनेची वय मर्या असू शकते या योजनेची वयोमर्यादा 21 ते 25 असू शकते.
5. या योजनेसाठी मुलांचे पालक सैन्य दलातील आणि सेवानिवृत्त अधिकारी आहे ,अशी मुलं पात्र आहे.

PM Scholarship Yojana 2025:  या योजनेचे फायदे

भारत सरकारद्वारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याचे एक महत्वाचे उपक्रम आहे. या योजनेचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:

1. आर्थिक सहाय्य: या योजनेमुळे शिष्यवृत्ती लाभार्थी असणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक लाभ मिळणार आहे त्यामुळे. ज्यामुळे शिक्षणासाठी पैसे भरणे हे सुलभ होईल.
2. घरी बसलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास आर्थिक मदत मिळेल.
3. शिष्यवृत्ती प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील कौशल्य विकास आणि मार्गदर्शन मिळू शकते यामुळे त्यांच्या शिक्षणाला नवीन दिशा मिळते.

PM Scholarship Yojana 2025:  या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहेत. अर्ज करण्याच्या वेळेस तुम्हाला हे कागदपत्रे अपलोड करायचे आहे.

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. आय प्रमाणपत्र
3. जातीचे प्रमाणपत्र, ( Cast Certificate)
4. सैनिकांच्या कुटुंबाचे प्रमाणपत्र
5. सैन्य सेवेत असलेल्या कुटुंबाचे प्रमाणपत्र
6. मोबाईल नंबर
7. बँक खाते पासबुक
8. मार्कशीट ( Marksheet )
9. पासपोर्ट आकाराचे फोटो
10. रहिवासी प्रमाणपत्र ( Domicile certificate )

PM Scholarship Yojana 2025: यासाठी अर्ज कसा करावा ?

1. Pm scholarshipयोजनेचा अर्ज करण्यासाठी  https://www.desw.gov.in/scholarship  ऑफिसियल वेबसाईटला जा.   

2. या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर येथे तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल नंबर,अशा प्रकारची माहिती भरून घ्यायची आहे.

3. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक आवश्यक  कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे. उदा. आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, सैनिक कुटुंबाचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे.

4. हे सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज हा अचूकपणे तपासून घ्यायचा आहे. नंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे.  

5. सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर  तुमचा pm Scholarship Yojana पीएम कॉलरशिप योजनेचा अर्ज यशस्वीपणे भरला गेला आहे. असा तुम्हाला मेसेज येईल.

Pm Scholarship Yojana 2025: या योजनेअंतर्गत किती रक्कम मिळणार आहे ?

( Pm Scholarship Yojana ) पी एम स्कॉलरशिप योजनेमार्फत सरकार दरवर्षी मुलांना 30,000 हजार रुपये आणि मुलींना 36,000 हजार रुपये ही रक्कम Pm Scholarship Yojana लाभार्थी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

Leave a Comment