Sinchan Vihir anudan yojana 2025: सरकार शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी नवनवीन योजना राबवत असतात त्यामधील विहीर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधा करण्यासाठी व्यक्तिगत सिंचन हे विहिरीची कामे घेण्यास 4 मार्च 2022 ला शासनाच्या नियमानुसार मान्यता देण्यात आली. शासनाच्या सिंचन विहीर अनुदान योजना 2025 महाराष्ट् राज्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतजमिनीत या पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने विहीर सिंचन अनुदान योजना सुरू केली आहे.
विशेषता या योजनेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे, शेतकऱ्याला व्यक्तिगत विहिरीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे सिंचन मिळवून देणे. यामुळे शेतकऱ्याला शेती उत्पादनास सुधारणा करता येईल. शेतकऱ्यांच्या शेजारणीसाठी सिंचन विहीर सुविधा उपलब्ध करून देणे हा खूप सरकारचा चांगला उपक्रम आहे. विहीर खोदण्यासाठी सरकारकडून 4 लाखाची आर्थिक मदत मिळणार आहे. खालील लेखामध्ये सिंचन विहीर आण्णा योजना योजना काय आहे, कुणी चालू केली आहे ,यासाठी कोण पात्र असणार आहे, या योजनेचा लाभ किती मिळणार आहे, हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येईल.
Sinchan Vihir anudan yojana 2025: सिंचन विहीर अनुदान योजना
क्रमांक | माहिती | तपशील |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | सिंचन विहीर अनुदान योजना 2025 |
2. | योजना चालू करणारे केंद्र | महाराष्ट्र राज्य सरकार |
3. | उद्देश | सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते. या योजनेत सिंचनाची सुविधा मिळते. |
4. | विभाग | कृषी विभागामार्फत |
5. | लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
6. | या योजनेचा लाभ | ₹4,00,000 रुपये अनुदान दिले जाणार |
7. | अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
8. | अधिकृत वेबसाईट | egs.mahaonline.gov.in |
Sinchan Vihir anudan yojana 2025: सिंचन विहीर अनुदान योजना काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी पाणी मिळत नाही, कारण अनियमित पडणारा पाऊस, आणि राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात घेतल्या जाणाऱ्या पिकाला हवं तेवढं पाणी पुरत नाही. त्यामुळे शेतातल्या पिकाचे नुकसान होते. शेतकरी शेत पिकासाठी विहिरीतले पाणी वापरू शकते परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याकडून विहीर बांधण्यासाठी हवी तेवढी रक्कम नसते त्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बळ असते.या सर्व समस्यांचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर अनुदान योजना सुरू केली आहे.
या योजनेमार्फत सरकार शेतकऱ्यांना सिंचन विहीर अनुदान योजनेमार्फत चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यामुळे शेतकरी हे शेतामध्ये व्यक्तीक विहीर बांधू शकतील आणि त्यांच्या होणाऱ्या पिकाच्या नुकसानापासून वाचू शकतील. यामुळे सरकारने महाराष्ट्र राज्यातील पंचायत समिती सिंचन विहीर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sinchan Vihir anudan yojana 2025: या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
1. महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामधील पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होण्यासाठी “सिंचन विहीर अनुदान योजना” सुरू करण्यात आली आहे.
2. महाराष्ट्र राज्यामध्ये जे शेतकरी शेती करतात अशा शेतकऱ्यांना शेती व्यवसायामध्ये प्रोत्साहन करणे.
3. पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळणे.
4. महाराष्ट्र राज्यामध्ये शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू नये, या हेतूने हे योजना सुरू करण्यात आली.
5. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे.
6. शेतकऱ्याला शेत जमिनीसाठी पाण्याचा स्त्रोत निर्माण करून देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.
Sinchan Vihir anudan yojana 2025: या योजनेचे फायदे काय आहे?
- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात होणाऱ्या पिकांमध्ये वाढ होईल.
- शेतकऱ्याला सरकारकडून विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
- तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी आणि इतर नागरिक शेती व्यवसायाकडे आकर्षित होईल.
- सिंचन विहीर योजने अंतर्गत शेतकऱ्याला शेतपिकांसाठी पाणी उपलब्ध करून देणे तसेच पिण्यास पिण्यासाठी सुद्धा पाण्याची सोय होईल.
- याचा फायदा शेतकऱ्याला असा होईल त्यामुळे शेतकऱ्याच्या शेती व्यवसाय मध्ये भरभराट येईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल शेतकऱ्याची.
हे ही वाचा :: Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2025: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे ?
Sinchan Vihir anudan yojana 2025: या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी आणि नियम ठेवण्यात आले आहे
- 1. सिंचन विहीर अनुदान योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना घेता येईल.
- 2. महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- 3. या योजनेसाठी लाभार्थी व्यक्तीला स्वतःची जमीन असणे महत्त्वाचे आहे, आणि त्याचबरोबर त्या लाभार्थ्याजवळ शेती करणे योग्य जमीन असणे ही खूप महत्त्वाचे आहे.
- 4. सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतामध्ये अगोदर विहीर नसली पाहिजे.
- 5. अर्ज माझ्या शेतकऱ्याचे राष्ट्रीय बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आधार कार्ड बँकेची लिंक असणेही खूप महत्त्वाचे आहे.
- 6. अर्जदार शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.04 हेक्टर जमीन असणे महत्त्वाचे आहे.
- 7. ज्या ठिकाणी शेतकऱ्याला विहीर खोदायची आहे त्या ठिकाणी 500 मीटरपर्यंत विहीर नसली पाहिजे
- 8. अर्जदार शेतकऱ्यांच्या 7/12 वर यापूर्वी विहिरीची नोंदणी नसली पाहिजे.
- 9. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडून जॉब कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे आवश्यक आहे.
- 10. जर अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मध्ये अजून काही लोकसेदार असतील तर अर्ज करताना हिस्सेदार दाराचे हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
Sinchan Vihir anudan yojana: या योजनेतील लाभार्थ्याची पात्रता काय?
1. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे एक एकर शेत जमीन असावे.
2. या योजनेमध्ये अनुदानित सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. एससी एसटी ओबीसी ओपन अशा सर्व समाजातील व्यक्तींना मिळणार आहे.
3. अर्ज करणारा शेतकरी दारिद्र्यरेषेखाली असणे आवश्यक आहे.
4. अर्ज करणारा शेतकऱ्यांकडे शेतीचा गट क्रमांक असणे आवश्यक आहे.
5. सिंचन विहीर अनुदान योजना या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे सातबारा उतारा नोंद असलेली जमीन आवश्यक आहे.
Sinchan Vihir anudan yojana 2025:या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे
1. अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
2. पासपोर्ट आकाराचे फोटो
3. शिधापत्रिका (Ration Card)
4. मोबाईल नंबर
5. ई-मेल आयडी ( E-Mail ID )
6. उत्पन्नाच प्रमाणपत्र
7. बँक खाते पासबुक
8. रहिवासी प्रमाणपत्र
9. अर्जदार शेतकऱ्यांचा 7/12आणि 8अ उतारा
10. अर्जदाराचे रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
11. अर्जदाराची जर समुदाय विहीर असेल तर सर्व लाभार्थी मिळून 0.04 तर पेक्षा जास्त जमीन असल्यास सर्व लाभात्याचे पंचनामा करार पत्र
Sinchan Vihir anudan yojana 2025: या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
शेतकऱ्यांना सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी दोन पद्धतीने अर्ज केले जातात एक ऑनलाईन पद्धतीने अनेक ऑफलाईन पद्धतीने तर या दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातात.
ऑनलाइन पद्धतीने: 1. सर्वप्रथम तुम्हाला सिंचन विहीर अनुदान योजना यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
2. या ठिकाणी आल्यानंतर सिंचन विहीर अनुदान योजना या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
3. त्यानंतर तुमच्या पुढे आणखी एक नवीन पेज ओपन होईल. त्या ठिकाणात अर्जामध्ये विचारण्यात आलेली महत्त्वाची माहिती भरून घ्यायचे आहे. त्याचबरोबर अर्ज सोबत महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे.
4. अर्जामध्ये भरलेली माहिती व्यवस्थितपणे तपासून घ्यायचे आहे आणि नंतर सबमिट या बटन वर क्लिक करायचा आहे.
ऑफलाईन पद्धत: 1. शेतकऱ्यांना सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळील ग्रामपंचायत या कार्यालयाला भेट द्यायची आहे.
2. त्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत मधून सिंचन विहीर अनुदान योजना चा अर्ज घ्यायचा आहे.
3. किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय मधील कृषी विभाग या ठिकाणी जायचं आहे आणि तिथून तुम्हाला सिंचन विहीर अनुदान योजना चा फॉर्म घ्यायचा आहे.
4. हा फॉर्म घेतल्यानंतर व्यवस्थितपणे त्याला भरून घ्यायचा आहे त्यामधील माहिती अचूकपणे भरून घ्यायची. त्यासोबत महत्त्वाचे कागदपत्रे जोडायचे आहे.
5. अर्जांमधील माहिती सविस्तरपणे पुन्हा एकदा तपासून घ्यायचे आहे. आणि हा अर्ज तुम्हाला कार्यालयात जमा करायचा आहे.
निष्कर्ष: राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहीर योजना राबवली जात आहे. शेतकऱ्यांना हक्काची विहीर देण्यासाठी सरकार सज्ज आहे. शेतकऱ्यांना विहीर अनुदान देण्यासाठी सरकार चार लाख रुपये योजनेत अनुदान देते आहे. सिंचन विहीर योजना अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.