mofat bhande Sanch Yojana 2025: महाराष्ट्र सरकार नागरिकाच्या भल्यासाठी नवनवीन योजना राबवत असते. आणि महिलांच्या विकासासाठी अनेक योजना सरकारने चालू केले आहेत लाडकी बहीण योजना, फ्री शिलाई मशीन त्याचबरोबर गरीब कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने अनेक योजना सुरू केले आहेत. महाराष्ट्रामधील बांधकाम कामगारासाठी सरकारने मोफत भांडी संच योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार बांधकाम कामगारांना दैनंनिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणे हा त्यांचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे.
ही योजना 13 फेब्रुवारी 2024 ला सुरू करण्यात आली. ज्या बांधकाम कामगार नागरिकाकडे बांधकाम कामगार कार्ड आहे अशांना मोफत भांडे संच या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना थोड्या कालावधी पुरती बंद करण्यात आली होती, परंतु आता मतदान झाल्यानंतर ही योजना परत सुरू करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये भांडे वाटप सुरू आहे. त्यांना भांड्याचा सेट मिळाला सुद्धा आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये तुमची नोंदणी झाली आहे, त्या जिल्ह्याचे बांधकाम कामगार सुविधा केंद्रात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता.
खालील लेखांमध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे . भांडे सेट घेण्यासाठी किती खर्च लागेल, भांडे किती दिवसात मिळणार, असणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे या योजनेचे फायदे काय आहे हे सविस्तरपणे खाली दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही योग्य ते अर्ज करू शकाल.
mofat bhande Sanch Yojana 2025: बांधकाम कामगार भांडी योजना – माहिती तक्ता
अ. क्र. | माहिती | तपशील |
---|---|---|
1 | योजनेचे नाव | बांधकाम कामगार भांडी योजना |
2 | चालू तारीख | 13 फेब्रुवारी 2024 |
3 | सुरू करणारे केंद्र | महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ, मुंबई |
4 | लाभ | 30 वस्तूंचा भांड्याचा सेट |
5 | खर्च | मोफत योजना |
6 | पात्रता | महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार नोंदणी आवश्यक |
7 | अर्ज पद्धत | ऑनलाइन |
8 | अधिकृत वेबसाईट | अधिकृत संकेतस्थळ |
Mofat Bhande sanch : कोणासाठी आहे ही योजना?
1. बांधकाम कामगार मोफत भांडे संच ही योजना अशा लोकांसाठी आहे की ज्या लोकांनी महाराष्ट्र इमारत आणिबांधकाम कामगार मंडळ “मुंबई”त्यांच्याकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे ,आणि ज्या लोकांना स्मार्ट कार्ड भेटलेले आहे अशा लोकांसाठी ही योजना आहे.
2. त्याचप्रमाणे नोंदणी केल्यानंतर सुद्धा त्यांचे बांधकाम कामगारांचे कार्ड चालू आहे अशा नागरिकांसाठी मोफत भांडे संच योजना आहे.
Mofat bhande Sanch Yojana 2025: बांधकाम कामगार भांडे योजना नेमकी काय आहे ?
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगार मध्ये नोंदणी असलेल्या कामगारांना भांडेचा संच दिला जातो. या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना 30 भांड्याचा संच दिला जातो. या योजना संदर्भात सरकारने शासकीय जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे.
बांधकाम कामगार योजनांमध्ये कोणकोणत्या लाभ मिळतो. बऱ्याचशा कामगारांना योजनेविषयी माहिती नसते. जर तुम्हालाही या योजनेविषयी माहिती नसेल पण जर ज्या लाभार्थी कामगारांनी बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल. तर त्या लाभार्थ्यांना बांधकाम कामगार योजनेतून भांड्याचा संच मिळतो.
हे ही वाचा :: Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana 2025: महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना
Imarat bandhkam kamgar Mofat bhande: बांधकाम कामगार भांडे योजना शासन निर्णय काय ?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या कल्याणकारी मंडळा अतर्गत बांधकाम कामगारांचे नोंदणी केले आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केले आहे अशा लाभार्थ्यांना भांड्याचा संच दिला जातो. यामध्ये साधारण 30 भांड्याचा संच बांधकाम इमारत कामगारांसाठी दिला जातो. या योजनेसाठी शासनाने मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे.
Mofat Bhande sanch 2025: या योजनेसाठी किती खर्च येईल?
1. बंद ज्या लोकांची बांधकाम कामगाराची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ मुंबई यांच्याकडे असेल त्याचप्रमाणे त्यांचे कार्ड सक्रिय असेल. अशा सर्वांना बांधकाम कामगार भांडी योजना किट पूर्णपणे फ्री दिली जाणार आहे. यासाठी त्यांना कुठेही पैसे द्यायचे काम नाही.
2. परंतु मध्य काळामध्ये ही योजना चालू झाल्यानंतर अनेक एजंट मार्फत भांड्याचा सेट देण्यात आला होता. त्यामुळे 400 ते 1000 रुपये इतके पैसे यांच्याकडून घेण्यात आले. परंतु महाराष्ट्र बांधकाम व इमारत मंडळ मुंबई यांच्याकडून ही योजना पूर्णपणे फ्री आहे.
Mofat bhande Sanch: बांधकाम कामगार भांडे योजनांमध्ये मिळणाऱ्या वस्तू कोणत्या? जाणून घ्या
(Imarat Bandhkam kamgar yojana ) इमारत बांधकाम कामगार या योजनेमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना बांधकाम भांडी योजना मध्ये 30 भांडे योजनाचा संच मिळतो. त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात सविस्तरपणे आपण खाली जाणून घेणार आहोत.
बांधकाम कामगार भांडी योजना – भांड्यांची यादी
अनु. क्र. | गृहपयोगी वस्तूचे नाव | संख्या |
---|---|---|
1 | ताट | 04 |
2 | वाट्या | 08 |
3 | पाण्याचा ग्लास | 04 |
4 | पातेले झाकणासह | 03 |
5 | भातवाडी | 01 |
6 | मोठा चमचा (वरण वाटण्यासाठी) | 01 |
7 | पाण्याचा जग (2 लिटरचा) | 01 |
8 | मसाल्याचा डब्बा (7 कप्प्याचा) | 01 |
9 | तीन डब्याचा सेट (14,16, व 18 इंच) | 03 |
10 | परात | 01 |
11 | कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील) | 01 |
12 | कढई (स्टीलची) | 01 |
13 | स्टीलची पाण्याचा टीप झाकणासह आणि वरगळ्यासह | 01 |
एकूण | – | 30 |
Mofat Bhande yojana: बांधकाम कामगार भांडे संच योजना या योजनेचे फायदे कोणते?
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार योजनेमध्ये लाभार्थ्यांनी जर नोंदणी केलेली असेल, तर अशा लाभार्थ्यांना घरगुती वापरण्यात येणाऱ्या 30 प्रकारच्या वस्तू भांड्याचा संच दिला जात आहे.
- या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना मोफत भांड्याचा संच मिळतो.
- बांधकाम कामगारांना भांडे संच मिळाल्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाची सुविधा उपलब्ध होते.
- बांधकाम कामगारांना शासनात तर्फे मिळालेला भांडे संचामुळे आर्थिक मदत होते.
- बांधकाम कामगार योजनेमध्ये मिळालेले या वस्तूची किंमत साधारणपणे 15000 ते 30 हजार पर्यंत असते मात्र सरकार तुम्हाला फ्री मध्ये ही योजना देत आहे.
- या योजनेमध्ये गृहउपयोगी वस्तू म्हणजेच 30 भांड्याचा संच दिला जातो.
बांधकाम कामगार भांडे योजना नियम आणि अटी कोणत्या?
1. महाराष्ट्र कामगार व इमारत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांची नोंदणी केलेली असेल तर त्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल.
2. बांधकाम कामगार इमारत यांच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना प्राकृतिक सहाय्यक कार्यालय किंवा जिल्हाधकारी, यांच्याकडे अर्ज सादर करावा. ज्या लाभार्थ्यांचा अर्ज मंजूर होईल त्यांना भांड्याचा संच पुरवण्यात जाईल.
3. या योजनेचा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हास्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, आणि या योजनेच्या संबंधित अधिकारी यांच्याकडे असणार आहे.
4. बांधकाम कामगार भांडे योजना यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार लाभार्थी या गृह उद्योग वस्तू मिळवण्यासाठी ऑनलाईन इस केवायसी करावा लागणार आहे. त्यानंतर नामांकित आणि अनुभवी संस्थेची निवड करावी.
Mofat Bhande sanch 2025: या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
1. आधार कार्ड (Aadhar Card)
2. कामगाराचे कार्ड (कामगारात नोंदणी केलेले प्रमाणपत्र)
3. रेशन कार्ड (Ration Card)
4. रहिवासी प्रमाणपत्र (Domicile certificate)
5. हमीपत्र
6. वार्षिक उत्पन्न दाखला
7. 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
8. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
बांधकाम कामगार भांडे या योजनेसाठी अर्ज कसा करावा?
1.सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटला https://mahabocw.in/ भेट द्यायचे आहे.
2. या वेबसाईटवर आल्यानंतर मुख्यपृष्ठावरती “Workers Registration” या ठिकाणी क्लिक करून घ्या.
3. येथे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्वतःची माहिती सविस्तरपणे भरून घ्यायची आहे. स्वतःचे नाव मोबाईल नंबर आधार क्रमांक अशी महत्त्वाची माहिती या फॉर्ममध्ये भरून घ्यायचे आहे.
4. त्यानंतर या फॉर्ममध्ये विचारण्यात आलेले आवश्यकता डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे. उदाहरणार्थ: आधार कार्ड,रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अशी आवश्यकता कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे.
5. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला फॉर्म सविस्तरपणे चेक करून घ्यायचा आहे.
6. या सर्व गोष्टी चेक केल्याच्या नंतर सबमिट या बटन वर क्लिक करून घ्यायचे आहे.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा मोफत भांडे योजना चा फॉर्म भरू शकता.
निष्कर्ष: महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार योजना या अंतर्गत चालवण्यात येणारी योजना म्हणजे बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडे योजना संच सुद्धा चालू करण्यात आले आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरगुती उपयुक्त अशा वस्तू राज्य सरकारकडून मोफत दिल्या जातात. यामध्ये एकूण 30 भांड्याचा संच मोफत मिळतो. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बांधकाम कामगार योजना या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. इमारत व बांधकाम कामगार या योजनेमध्ये नोंदणी असेल तरच या योजनेचा फायदा तुम्हाला होणार आहे. ह्या योजनेविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.