E-Shram Card yojana 2025: ई-श्रम कार्ड योजना महाराष्ट्र सरकारने नागरिकाच्या भवितव्यासाठी आणि त्यांचे हितासाठी अनेक नवनवीन योजना लॉन्च केले आहे. “ई-श्रम कार्ड” हे भारतात सरकारद्वारे तयार केलेले महत्वाचे कार्ड आहे. गरीब कुटुंबाचा आणि आर्थिक परिस्थिती असलेल्या लोकांचा विचार करून सरकारने ई- श्रम कार्ड ही योजना सुरू केली आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजूर लोकांना एकत्रित आणण्याचे काम करते. ही योजना 2021 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत कामगारांसाठी एक विश्राम कार्ड पोर्टल सुरू केले आहे. असंघटित क्षेत्रातील काम करणारी व्यक्ती ही श्रम कार्डचा वापर करू शकते किंवा त्यासाठी अर्ज करू शकते.
या ईश्रम कार्ड च्या मदतीने राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या मजुरांचा असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही घरगुती काम करणारे कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील काम करणारे कामगार स्वतःची नोंदणी करू शकता. हे श्रम कार्ड पोर्टल हे 30 व्यापक व्यवसाय आणि क्षेत्र 400 अंतर्गत नोंदणी सुद्धा सुरू आहे. खालील लेखांमध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. ही योजना कोणासाठी आहे, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे या योजनेचे फायदे काय आहे हे सविस्तरपणे खाली दिलेला आहे. जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
E-Shram Card Yojana 2025: ई-श्रम कार्ड योजना
क्र. | तपशील | माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | E-Shram ई-श्रम कार्ड योजना |
2. | चालवणारे मंत्रालय | कामगार आणि रोजगार मंत्रालय |
3. | योजनेची सुरूवातीची तारीख | 26 ऑगस्ट 2021 |
4. | पात्रता | असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे मजूर कामगार |
5. | पेन्शन फायदे | प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये |
6. | एकूण नोंदण्या | 29.23 कोटीहून अधिक लाभार्थी |
7. | विम्याचे फायदे | दोन लाख रुपयांचा मृत्यू विमा, अपंगासाठी एक लाख रुपये |
8. | अधिकृत वेबसाईट | www.eshram.gov.in |
9. | हेल्पलाइन नंबर | 14434 |
E- Shram Card yojana: ई-श्रम कार्ड म्हणजे काय?
असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी विश्राम कार्ड हे सरकारने उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून त्यांना या कार्डापासून उपयोग होईल हे कार्ड असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आहे कोणतीही व्यक्ती वापरू शकते आणि या कार्डासाठी अर्ज करू शकते. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना 60 वर्षानंतर पेन्शन चालू होईल मृत्यू विमा आणि अपंगत्वत आल्यावर आर्थिक मदत दिली जाईल. अंतर्गत लाभ घेणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण भारतात वैद्य 12 आंकी UAN क्रमांक मिळेल. या योजनेअंतर्गत 60 वर्षानंतरच्या व्यक्तीला पेन्शन म्हणून दरमहा तीन हजार रुपये दिले जाईल.
E- Shram: या कार्डचे फायदे कोणते?
1. ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन दरमहा तीन हजार रुपये सुरू होणार आहे.
2. या योजनेअंतर्गत मृत्यू व्यक्तीला 2,00,000 लाखाचा मृत्यू विमा येणार आहे.
3. कामगार आणि अपंगत्व असेल तर त्याला 1,00,000 लाखाची आहे आर्थिक मदत दिली जाणार आहे.
4. कोणत्याही लाभार्थ्यांचा महिला असो या पुरुष असंघटित क्षेत्रात काम करताना जर मृत्यू झाला तर त्यांना इस्रम कार्ड च्या सर्व लाभ व फायदे मिळतील.
5. ई श्रम कार्ड लाभार्थ्यांना (PMSBY) प्रधानमंत्री सुरक्षा विमा मिळतो. त्यामध्ये दोन लाख रुपयाचा लाभ मिळतो.
6. ई श्रम कार्ड लाभार्थ्यांना पीएम श्रम योगी मानधन (PMSBY) या अंतर्गत टेन्शन मिळते.
7. ई श्रम कार्ड या योजनेमार्फत केंद्र सरकारच्या मजूर आणि कामगारांना आर्थिक लाभ मिळतो.
क्र. | तपशील | माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | E-Shram Card Yojana |
2. | मिळणारा लाभ | लाभार्थी व्यक्तीस मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, आणि काही गंभीर आजार झाल्यास 1 लाख रुपये |
3. | योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
4. | लाभार्थी | भारत देशातील रहिवासी व्यक्ती |
E-Shram या कार्डचे उद्दिष्ट?
1. कामगारांना सुरक्षा: जे कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात असे कामगारांना सुरक्षा आणि आरोग्य उपलब्ध करून देणे.
2. सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे: असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकारी योजना चा लाभ मिळवून देण्यासाठी ओळखपत्र बनवणे.
3. सामाजिक कल्याण करणे: या योजनेअंतर्गत कामगारांना शिक्षण ,आरोग्य, रोजगार आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देणे.
4. ई श्रम कार्ड हे सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्ड आहे.
5. आरोग्य विमा: E Shram Card लाभार्थ्यांना आरोग्याचा विमा देखील मिळतो. आणि आरोग्यासाठी सवलती देखील मिळतात.
6. E-Shram Card योजना: या योजनेमुळे सरकारी विविध योजनांचा लाभ मिळतो. जसे की स्वस्त धान्य,PDS पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम
ई -श्रम कार्ड या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे कोणती?
1. आधार कार्ड
2. बँकेचे पासबुक
3. मोबाईल नंबर
4. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक केलेला असावा
5. लाईट बिल
6. पासपोर्ट आकाराचा फोटो
ई- श्रम E-Shram या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावे?
1. E-sham कार्ड या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर www.eshram.gov.in जा.
2. या वेबसाईटवर आल्यानंतर “Self Registrion” या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
3. त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज “New Page”ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर टाकायचा आहे.
4. त्यानंतर दुसऱ्या पर्यायांमध्ये तुम्हाला “Enter Captcha” कॅपच्या दिल्या जाईल तो कॅपच्या तुम्हाला टाकून घ्यायचा आहे.
5. त्यानंतर तिसरा पर्याय मध्ये तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला जाईल तुम्ही ईपीएफ EPFO चा लाभ मिळत आहे का? या ठिकाणी Yes किंवा No ऑप्शन दिला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला No ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
6. त्यानंतर चौथ्या पर्याय मध्ये तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला जाईल. “Employees State insurance corporation” ESIC याचा लाभ तुम्हाला मिळत आहे किंवा नाही Yes या No हा पर्याय दिला जाईल. तर त्या ठिकाणी तुम्हाला No पर्यावर क्लिक करायचा आहे.
7. ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला सेंड ओटीपी हा पर्याय दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
8. तुम्हाला आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल ओटीपी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आधार नंबर विचारण्यात येईल तो आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्या विचारण्यात येईल तो कॅपच्या टाकून घ्यायचा.
9. हे सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन ई श्रम कार्डचे घरबसल्या नोंदणी करू शकता.
हे ही वाचा :: mofat bhande Sanch Yojana 2025: बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी अर्ज कसा करावा ? जाणून घ्या सविस्तर
ई श्राम कार्ड “E-Shram Card” या योजनेविषयी अनेक वेळा विचारण्यात येणारे प्रश्न खालील सविस्तरपणे जाणून घेऊया.
FAQ वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
1. ई श्रम कार्ड योजना नेमके काय आहे? आणि याचे उद्दिष्ट काय?
2. E Shram ई श्रम कार्ड योजनेचा लाभ कुठे मिळवता येऊ शकतो?
3. असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणजे काय?
4. ई श्रम कार्ड च्या अधिकृत वेबसाईटला प्रॉब्लेम असल्यास आम्ही काय करावे?
5. या योजनेमध्ये वार्षिक उत्पन्नाचे काही निकष आहे का?
6. ई श्रम कार्ड योजना या योजनेसाठी काही वयाची अट आहे का?
8. अपंग व्यक्ती असल्यास त्यांना ई श्रम कार्ड योजनेचा लाभ त्या व्यक्तीला मिळणार का?
निष्कर्ष: .ई श्रम कार्ड ही योजना केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये अनेक विविध सरकारी योजना चा लाभ मिळत आहे. या योजनेमध्ये अपघाती विमा दोन लाखापर्यंत मिळतो त्याचबरोबर पेन्शन आणि अनेक योजनांचा लाभ ई श्रम कार्ड योजनांमध्ये मिळतो. त्याचबरोबर आरोग्यासाठी सुविधा देखील यामध्ये मिळते. ई श्रम कार्ड याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.eshram.gov.in ला भेट द्या.