Pm Mudra Loan Yojana 2025: आपल्याला जर एखादा कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला लाखो रुपयांचे भांडवल लागते. जर ज्याच्याकडे व्यवसाय करण्यासाठी भांडवल आहे ते डायरेक्ट गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करते परंतु, काही लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना हे शक्य नसतं. त्यामुळे त्यांना कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. ज्या लोकांचे आर्थिक परिस्थिती दुर्बळ आहे अशा लोकांसाठी केंद्र सरकारने कर्जाची व्यवस्था केली आहे म्हणजे सरकारने दुर्बल परिस्थिती असलेल्या नागरिकांसाठी मुद्रा लोन योजना सुरू केली आहे. ही योजना 2015 मध्ये सुरू केले आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे.
ही योजना दूध व्यवसाय. संबंधित उत्पादन किंवा व्यापार करणाऱ्या सेवा क्षेत्रात गुंतवलेल्या उत्पन्न देणाऱ्या लहान उद्योगांना दहा लाख रुपयांचे कर्ज देते. लहान नाही छोटा लघुउद्योग करणाऱ्या नागरिकाला सरकारकडून 10 लाख रुपयांचे कर्ज मिळते. हे खर्च सरकार कोणत्याही गॅरंटीशिवाय देते. सध्या या योजनेच्या माध्यमातून लहान आणि लघुउद्योग चालू करणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांची कर्ज मिळते परंतु हे 10 लाख रुपयांचे कर्ज 20 लाख रुपये करण्याची आश्वासन भाजप सरकारने दिले आहे. खालील लेखांमध्ये मुद्रा लोन योजनेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला मुद्रा लोन काय आहे. हे कळेल मुद्रा लोन साठी अर्ज कुठे करायचा आहे. मुद्रा लोन मध्ये किती व्याजदर आहे सविस्तरपणे कळू शकेल.
Pm Mudra Loan Yojana 2025
क्रमांक | घटक | माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नाव | मुद्रा लोन योजना |
2 | सुरू करणारे केंद्र | केंद्र सरकार |
3 | उद्दिष्ट | लघु उद्योग करणाऱ्या नागरिकांना आर्थिक सहाय्य |
4 | पात्रता | अर्जदार भारताचा नागरिक असावा |
5 | अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
6 | अधिकृत वेबसाईट | https://www.mudra.org.in |
Pm Mudra loan yojana काय आहे ही योजना?
“PMMY” मुद्रा लोन योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे लहान आणि सूक्ष्म लघुउद्योगांना आर्थिक मदत होणार आहे. ही योजना मुख्यतः मध्यवर्ती लोकांसाठी आहे. ज्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे अशा लोकांना आर्थिक सहाय्य या योजनेच्या अंतर्गत होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार लघुउद्योग आणि सूक्ष्म उद्योग करणाऱ्या नागरिकांना दहा लाख रुपयांचे आर्थिक मदत देणार आहे कर्ज देणार आहे.
हे कर्ज घेताना व्यक्तीला कुठल्याही गॅरंटी द्यायची गरज नाही. दहा लाख रुपयाचे कर्ज आता तुम्हाला तुमचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी सरकार देणार आहे .विशेषता बऱ्याच लोकांचे व्यवसाय सुरू सुद्धा झाले आहे या योजनेमुळे. आता हे रक्कम 10 लाख रुपये नसून सरकारने 20 लाख रुपये होणार आहे असे आश्वासन दिले आहे. या योजनेअंतर्गत तरुण, शिशू आणि अशा तीन श्रेणीमध्ये कर्ज दिली जाते.
Pm Mudra loan yojana या योजनेचे फायदे?
PMMY मुद्रा लोन योजना ही नागरिकाला तीन टप्प्यांमध्ये लोन देते. शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन टप्पे आहे.
1. लोणच्या पहिल्या श्रेणीमध्ये शिशु: 50 हजार पर्यंत कर्ज दिले जाते.
2. दुसऱ्या श्रेणीमध्ये किशोर: 5 लाख रुपयाचे कर्ज दिले जाते.
3. तर लोणच्या तिसऱ्या श्रेणीमध्ये तरुण: 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
हा सर्वात मोठा फायदा आहे नागरिकाला व्यवसाय सुरू करण्यासाठी
3. कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
4. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत होईल.
5. शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
6. उत्पन्नात वाढ होईल.
Pm Mudra loan yojana या योजनेसाठी पात्रता काय आहे?
- 1. भारताचा नागरिक असावा
- 2. अर्ज देणाऱ्या अर्जदाराकडून कोणत्याही बँकेची थकबाकी नसावी .
- 3. अर्जदाराचा क्रेडिट स्कोर चांगला असावा.
- 4. अर्जदाराला जो व्यवसाय करायचा आहे त्याचे कौशल्य ज्ञान अनुभव असणे आवश्यक.
- 5. छोटे व्यवसाय, विक्रेते, शेतकरी कुटुंब उद्योग किंवा अन्य लघुउद्योग.
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana 8th Hafta Update 2025: लाडकी बहिण योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Pm Mudra loan yojana: या योजनेचा व्याजदर किती?
वेगवेगळ्या बँकेचा वेगवेगळा व्याजदर असतो त्यामुळे ज्या बँकेचे लोन घेतले जाईल त्या बँकेच्या आधारित व्याजदर ठरला जातो. 10 %ते 12 %टक्के इतका व्याजदरच असतो कुठल्याही बँकेचा
Pm Mudra loan yojana या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?
1. आधार कार्ड (Aadhar Card)
2. मोबाईल नंबर
3. ओळखपत्र
4. रहिवासी प्रमाणपत्र
5. अर्जदार व्यक्तीची स्वाक्षरी
6. पासपोर्ट साईज फोटो
Pm Mudra loan yojana या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
- स्टेप 1. सगळ्यात अगोदर प्रधानमंत्री मुद्रा लोन च्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि Udyamimitra Portal निवडा.
- मुद्रा कर्ज या बटन वर क्लिक करून’अर्ज करा’व क्लिक करा
- खालीलपैकी एक ऑप्शन निवडा नवीन उद्योजक, विद्यमान उद्योजक, स्वयंरोजगार व्यवसायिक
- त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरून ओटीपी जनरेट करा.
- Successfully register
- त्यानंतर वैयक्तिक माहिती आणि व्यवसायिक माहिती भरा.
- प्रोजेक्ट प्रस्ताव तयार करण्यासाठी मदतीची गरज भासल्यास मदत करणारे एजनसी निवडा, जर मदत लागत नसेल तर ‘कर्ज अर्ज केंद्र’ बटन वर क्लिक करा आणि अर्ज करा.
- तुमच्या कर्जाची श्रेणी निवडा शिशु, किशोर आणि तरुण यामधून एक श्रेणी निवडा.
- त्यानंतर अर्जदार यांच्या व्यवसायाची माहिती भरा, जसे की व्यवसायाची नाव उत्पादन इत्यादी.
- मालकाची माहिती, विद्यमान बँकिंग, क्रेडिट सुविधा भविष्यातील अंदाज ,संपत्तीचा खर्च जात आहे याची माहिती भरा.
- अर्जदाराचे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा जसे आधार कार्ड ,पासबुक ,मोबाईल नंबर रहिवासी ,अर्जदाराची स्वाक्षरी, व्यवसायिक उपक्रमाचा पत्ता इत्यादी.
- सगळी माहिती एकदा रिचेक करून घ्या त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा, एक अर्ज क्रमांक नवीन जनरेट होईल तो भविष्यातील संदर्भासाठी ठेवावा लागतो.
निष्कर्ष: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही योजना केंद्र सरकारने चालू केले आहे. या योजनेत लघुउद्योग करण्यासाठी 10 लाख रुपयांचे आर्थिक मदत केली जाते. त्यामध्ये लाभार्थी व्यक्ती स्वतःचा उद्योग, व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे लोन उपलब्ध करून दिले जातात. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.