Mukhyamantri Mazi Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, या दिवशी खातात जमा होणार एप्रिलचा हप्ता

Mukhyamantri Mazi Ladki bahin Yojana: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने जुलै 2024 मध्ये राज्यांमध्ये सुरू केली आहे. या योजनेमध्ये आर्थिक मदत म्हणून पंधराशे रुपये दरमहा लाडक्या बहिणीच्या खात्यात डीबीटी DBT प्रणाली द्वारे पाठवल्या जातात. या योजनेमध्ये आतापर्यंत नऊ हप्ते यशस्वीपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकत्रित 13500 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहे.

मात्र आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागलेला आहे. याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे तर ती काय आहे सविस्तरपणे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Mukhyamantri Mazi Ladki bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तपशील

  • योजनेचे नाव: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनासुरू करणारे केंद्र: महाराष्ट्र शासन
  • योजना कोणी सुरू केली: माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योजना कधी सुरू झाली: जुलै 2024
  • योजनेत मिळणारी रक्कम: दरमहा ₹1500 रुपये
  • योजनेची पात्रता: लाभ घेणाऱ्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे
  • आतापर्यंत मिळालेले हप्ते: नऊ हप्ते यशस्वीपणे जमा झाले आहे.
  • आतापर्यंत मिळालेली रक्कम: लाडकी बहीण योजनेत ₹13,500 रुपये आतापर्यंत मिळाले आहेअधिकृत वेबसाईट – लाडकी बहिण योजना

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजना विषयी मोठी अपडेट

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने राज्यांमध्ये सुरू केले आहे. या योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत आतापर्यंत 13500 महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे. मात्र आता लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे.

तर अशा महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांसाठी खुशखबर दिलेले आहे. तर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात हा हप्ता जमा होणार आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.

तर एप्रिल महिना संपायला अवघे सहा दिवस बाकी आहे तर या सहा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारण 30 तारखेपर्यंत अक्षय तृतीया या दिवशी लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. तर सध्याला लाडकी बहीण योजनेत अर्जाची तपासणी सुरू आहे. या योजनेचा निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे. आतापर्यंत लाडकी बहिण योजनेतील नऊ लाख महिला अपात्र ठरले आहे.

या योजनेचा निकषांमध्ये म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला या योजनेतून रद्द केल्या जाणार आहे. तसेच महिलांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा चार चाकी वाहने असतील अशा महिलांना देखील या योजनेतून रद्द केले जात आहे.

Leave a Comment