SSC And HSC Result Date 2025: आज आपण बघणार आहोत की, राज्यातील दहावी आणि बारावी निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बोर्ड ने काय सांगितले आहेत त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री सुद्धा काय म्हणाले आहेत. याची माहिती आपण खालील लेखांमध्ये घेणार आहोत. राज्यांमधील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार, कोणत्या महिन्यात लागणार ,किती तारखेला लागणार आहे हे याची सविस्तर माहिती आपण खालील लेखांमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही रिझल्ट चेक करता येईल आणि तारीख ही कळेल.
SSC And HSC Result Date: निकालाच्या तारखा
- 1. बोर्डाचे नाव-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBHSB)
- 2. वर्ग-10वी आणि 12वी
- 3. बारावी निकालाची तारीख-मे महिन्याचा पहिला आठवडा
- 4. दहावी निकालाची तारीख-मे महिन्याचा दुसरा आठवडा
- 5. निकाल चेक करण्यासाठी लागणारे तपशील-रोल नंबर आणि आईचे नाव
- 6. वेबसाईट-mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in
SSC And HSC Result Date: दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजीलॉकर ॲप मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्य मंडळाकडे 21 लाख विद्यार्थ्यांच्या आयडिया उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल हा डीजे लॉकर ॲप मध्ये सुद्धा बघता येणार आहेत.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल तर, दुसऱ्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल जाहीर करून राज्य मंडळ हे निकालाची डेडलाईन पाळणार आहे. याची माहिती राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी दहा ते पंधरा दिवसा अगोदर घेण्यात आलेले आहे. दहावी आणि बारावीचे पेपर सुरू असताना पेपर तपासणीचे काम ही सुरू केले होते. त्याचप्रमाणे क्रीडा गुणाची नोंद करण्यासाठी 21 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती.
SSC And HSC Result Date: असा करा निकाल चेक ?
- 1. सर्वात प्रथम तुम्हाला दहावी आणि बारावीच्या बोर्ड च्या अधिकृत mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in. वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- 2. SSC/ HSC Result2025 या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- 3. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव आणि रोल नंबर टाकायचा आहे.
- 4. त्यानंतर निकाल पहा येथे क्लिक करायचे आहे.
- 5. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे तुम्हाला कोणत्या विषयांमध्ये किती गुण मिळाले आहे एकूण टक्केवारी किती आहे.
- 6. त्यानंतर तुम्ही या निकालाची प्रिंट सुद्धा काढू शकता.