Namo Shetkari Yojana: राज्यामध्ये लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या या “नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा सातवा हप्ता बद्दल एक माहिती समोर आली आहे.राज्य सरकारने आता सातवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच शेतकऱ्यांना निधी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजने सुरू केली आहे.नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेले शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वार्षिक ₹6000 हजार रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत प्रत्येक 2000 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये विभागली गेली आहे.आतापर्यंत या योजनेचे एकूण सहा हफ्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत.
हे ही वाचा :: Mohabbat Bhandi sanch: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! मोफत भांडीसंच मिळवा घरबसल्या!
Namo Shetkari Yojana: सातव्या हप्त्यासाठी प्रक्रिया सुरू
नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्र सरकारकडून योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची आकडेवारी मागितली आहे. तेच नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरवले जाईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 92 लाख 91 हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात.
Namo Shetkari Yojana: निधी वाटपाची प्रक्रिया कशी असेल?
कृषी विभागाने लाभार्थीची माहिती निश्चित केल्यानंतर राज्य सरकार हे निधी मंजूर करेल आणि ही मंजुरी मिळाल्यानंतर एक शासन निर्णय प्रसिद्ध केला जाईल त्यानंतरच निधी थेट लाभार्थ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. पी एम किसान योजनेचा हप्ता हप्ता जमा झाल्यानंतर नऊ ते दहा दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा केला जातो.
Namo Shetkari Yojana: हप्ता कधी मिळणार?
पीएम किसन संबंधित योजनेचा सातवा हत्याचा वितरणाची कोणतीही अधिकृत तारीख सध्या जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे सध्या प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आणि बैलपोळा सण असल्यामुळे त्या सुमारास हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हप्त्यासाठी सरकारला 1900 कोटी रुपयांची तरतूद आता करावी लागणार आहे.
या नमो किसान संबंधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते ज्यामध्ये ₹6000हजार रुपये हे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे असतात. आणि ₹6000 हजार रुपये राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या असतात. जर तुम्हाला तुमच्या हप्त्याची आणि अर्जाची स्थिती तपासायची असेल तर तुम्ही या अधिकृत पोर्टल (nsmny.mahait.org) वर जाऊन तपासू शकता.
हे ही वाचा :: Post Office RD Yojana 2025:फक्त 12,000 रुपये दरमहा भरा आणि 5 वर्षांत मिळवा तब्बल ₹8,56,388👇👇👇
निष्कर्ष
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने आर्थिक मिळते.जे त्यांच्या शेतीसाठी आणि जीवन जीवनमानासाठी महत्त्वपूर्ण ठरते