Anganwadi Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,18,882 पदासाठी अंगणवाडीमध्ये बंपर भरती ऑनलाइन अर्ज सुरू

Anganwadi Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी आणि सेविका या पदाकरिता मेगा भरती करण्यात येत आहे. यामध्ये एकूण रिक्त पदे 18,882 इतका पदासाठी भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विभागांतर्गत अंगणवाडी सेविकांना या पदाकरिता 5,639 काढण्यात आल्या आहे. आणि त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता 13,243 इतके रिक्त पदे काढण्यात आली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय? वयाची अट किती असणार आहे? यासाठी पगार किती? असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा सविस्तरपणे आपण बघणार आहोत.

Table of Contents

Anganwadi Recruitment अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025

📢 महत्वाची भरती सूचना

पदाचे नावअंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस
भरती करणारे केंद्रमहाराष्ट्र राज्य महिला बाल विकास विभाग
एकूण रिक्त पदसंख्या18,882
पगार₹8,000 ते ₹15,000
शैक्षणिक पात्रता10वी आणि 12वी पास (मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन / ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख14 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख02 मार्च 2025
निवड प्रक्रियाशैक्षणिक गुणपत्रिकेच्या आधारे
अधिकृत वेबसाईट🔗महिला व बालविकास विभाग

Anganwadi sevika Recruitment: महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या भरतीची प्रक्रिया कशी राबवल्या जाणार ?

महाराष्ट्र राज्यामध्ये मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदाकरिता मेगा भरती करण्यात आले आहे. या भरतीची प्रक्रिया 100 दिवसाच्या आत नियुक्त्या देण्यात येणार आहे. राज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाकरिता 8,882 इतके रिक्त पदे काढण्यात आले आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविका या पदाकरिता 5639 मुक्त पदे असणार, आणि अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता 13,243 के रिक्त पदे असणार आहे.  या पदासाठी जाहिराती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराला या तारखेच्या आतच अर्ज करावा लागणार आहे.

Anganwadi Sevika and Madadnis Recruitment: या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय? कोणते कागदपत्रे लागणार?

महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी मेगा भरती करण्यात आली आहे इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय? लागणारी आवश्यकता कागदपत्रे सविस्तर पण आपण जाणून घेणार आहोत.

1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2. दहावी आणि बारावी उत्तीर्ण असावे.
3. पदवी आणि पदवीधर (या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल)
4. बारावी मध्ये मराठी विषय असणे आवश्यक आहे. त्या विषयामध्ये उत्तीर्ण झालेले असावे.
5. उमेदवाराला स्थानिक भाषेच ज्ञान आवश्यक आहे.
6. मान्यताप्राप्त बोर्ड मधून MSCIT कोर्स कम्पलेट केलेला असावा.
7. अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस काम केलेल्या असल्यास दोन वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यकता आहे.
8. दहावी बारावीचे गुणपत्रक
8. दहावी,बारावी, बी.एड, डी.एड हे सर्व गुणपत्रक व प्रमाणपत्र अर्जासोबत जोडा.
9. आधार कार्ड. (Adhar Card)
10. रहिवासी प्रमाणपत्र.
11. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
12. विधवा व निराधार महिला असल्यास प्रमाणपत्र जोडावेत.
13. पासपोर्ट आकाराचा फोटो.

Anganwadi sevika Age Limit: वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय 18/02/2025 या तारखेपर्यंत वय 18 ते 35 असणे आवश्यक आहे. जर महिला विधवा उमेदवार असेल तर त्या महिलांसाठी 40 वर्ष ठेवण्यात आले आहे.

अंगणवाडी मुख्य सेविका आणि मदतनीस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे ते कमान 40 वर्ष असणे अनिवार्य आहे. या वयाच्याच महिलांना यासाठी अर्ज करता येणार आहे.

📢 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा 📢

📢 महत्वाची भरती सूचना

पदाचे नावअंगणवाडी सेविका आणि मदतनीस
अर्ज सुरू होण्याची तारीख14 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख02 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट🔗महिला व बालविकास विभाग

📌 महत्वाची सूचना: इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा. 🚀

अंगणवाडी सेविका यासाठी अर्ज करणाऱ्या स्थानिक उमेदवाराची काय अट असणार?

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये भरती करण्यात आले आहे यासाठी एकूण रिक्त पदे 18,882 इतके रिक्त पदे काढण्यात आले आहे. इच्छुक उमेदवाराला स्थानिक अट काय असणार आहे सविस्तरपणे आपण खाली बघणार आहोत.

  • अर्ज करणारे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी असावे
  • अर्ज करणारे महिला गाव /तांडा / वस्ती या ठिकाणची स्थानिक रहिवासी असावी.
  • अर्ज करणाऱ्या महिलांना स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
  • अंगणवाडी भरतीसाठी एकाच पदासाठी अर्ज केला जाणार.
  • उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे.
  • अर्ज करणारे महिला जिल्हा परिषद संस्था चे अध्यक्ष/सदस्य असेल तर त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.

हे ही वाचा :: Indian Post Office GDS Recruitment 2025: भारतीय डाक विभागात नोकरीची सुवर्णसंधी, 21,413 पदासाठी मेगा भरती

अंगणवाडी भरती 2025 – पगार माहिती

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदावर आपलं निवड झाल्यास किती पगार मिळणार? सविस्तरपणे आपण खाली बघणार आहोत.

पदाचे नावपगार (₹)
अंगणवाडी सेविका₹10,000 ते ₹15,000
अंगणवाडी मदतनीस₹8,000 ते ₹10,000
अंगणवाडी पर्यवेक्षिक₹12,000 ते ₹18,000

✅ अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या: 🔗महिला व बालविकास विभाग

Anganwadi workers and Helper: अंगणवाडी सेविका साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावे?

अंगणवाडी मुख्य सेविका आणि मदतनीस या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाणार आहे आणि दुसरे ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाणार आहे. तर या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा सविस्तरपणे आपण खाली जाणून घेणार आहोत.

ऑनलाइन पद्धतीने फॉर्म कसा भरावे?

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका यांच्या अधिकृत वेबसाईटला https://womenchild.maharashtra.gov.in/mr/home भेट द्यायचे आहे.
  • 2. या ठिकाणी आल्यानंतर अर्ज करा. या ठिकाणी जायचं आहे. या भरतीसाठी ज्या अधिसूचना दिली आहे त्या डाऊनलोड करून घ्या.
  • 3. त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये ई-मेल, मोबाईल नंबर सर्व माहिती भरून नोंदणी करून घ्यायचे आहे.
  • 4. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची तपशील तुम्हाला यामध्ये सविस्तरपणे आणि अचूकपणे भरून घ्यायचा आहे.
  • 5. त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे. उदाहरणार्थ: ओळखपत्र आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, स्वतःची स्वाक्षरी हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे.
  • 6. अर्जामध्ये दिलेली सविस्तर माहिती अचूकपणे भरून घ्यायचे आहे. आणि पुन्हा एकदा चेक करायचे आहे. आणि नंतर फॉर्म हा सबमिट करायचा आहे.
  • 7. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पोच पावती दिली जाईल ती डाऊनलोड करून चांगली ठेवायचे आहे.

अंगणवाडी सेविका साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा?

1. या भरती करिता फॉर्म मिळवण्यासाठी जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा सीएसएस सेंटरमध्ये भेट द्या आणि तिथून फॉर्म घ्या.
2.  हा फॉर्म घेतल्यानंतर फॉर्म मधील माहिती अचूकपणे सविस्तरपणे भरून घ्या.
3. अर्ज भरताना अर्जामध्ये विचारण्यात आलेले आवश्यक डॉक्युमेंट अर्जासोबत जोडा.
4. फॉर्म सविस्तरपणे भरल्यानंतर अंगणवाडी कार्यालय मध्ये किंवा बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये फॉर्म स्वतः नेऊन द्या.

निष्कर्ष: इच्छुक उमेदवार नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी 18,882 इतक्या जागा काढण्यात आले आहे. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे 14 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करायचा असेल तुमच्या जवळच्या अंगणवाडी कार्यालयामध्ये किंवा महिला बाल विकास कार्यालयात भेट द्या आणि अर्ज भरा. अधिक माहितीसाठी महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांना भेट द्या आणि सविस्तर या जाहिराती विषय माहिती जाणून घ्या.

Leave a Comment