CM Ajit Pawar on Ladki bahin Yojana 2100 installment 2025: लाडकी बहीण योजना यामध्ये पात्र असलेल्या महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यावरती स्पष्टीकरण दिले आहे.
CM Ajit Pawar on Ladki bahin Yojana 2100 installment 2025: लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभा निवडणुका 2024 मध्ये गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये खूप चर्चेत आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना या योजनेला खूप मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र विरोधक या योजनेला सातत्याने विरोध करत आहे. आणि या योजनेविषयी टीका देखील करत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ अशा आश्वासन देखील केले होते. परंतु 2100 रुपये कधी मिळेल? याची पूर्तता कधी होईल. मात्र हे कधी मिळतील याची अधिकृत माहिती मिळत नाही.
त्यामुळे विरोधक हे आक्रमक होत आहे. लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल देखील केला जात आहे. तर याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी यावरती विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे.
नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या योजनेमधील बऱ्याचशा महिलांनी सव्वा आठ लाख महिलांनी योजना चा लाभ घेतला आहे. अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान यांच्याकडून मिळत आहे. या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना वर्षाला 18000 मिळणे ऐवजी सहा हजार रुपये मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेत राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये असे मिळून 12000 रुपये मळतात.
लाडकी बहीण योजनेमध्ये नियम असा आहे की शासकीय योजनेत मिळणारा लाभ हा वर्षाला 18 हजार रुपये दिले जाणार नाही. माहिती व तंत्रज्ञान यांच्या विभागामार्फत लाडक्या बहिणीने नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना चा लाभ एकत्र घेतला याची माहिती देखील मिळाली आहे. एकत्रित या दोन योजना चा लाभ घेतलेल्या महिलांनी माहिती महिला व बाल विभागाला देण्यात आली आहे.
तर यामध्येच आता विधानसभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याची माहिती दिली आहे.
Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनाची 2100 रुपये कधी मिळणार ?
राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना लाडक्या बहिणीने २१०० रुपये कधी मिळणार याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. मात्र त्यासोबत त्यांनी असे म्हटले आहे की सगळे सोंग करता येईल मात्र पैशाचे सोंग करता येत नाही असं देखील ते म्हटले आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना आम्ही या रकमेत वाढ करणार आहोत असे देखील ते म्हटले आहे.
ही माहिती मिळाल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी 2100 रुपये मिळाला आणखी खूप वेळ लागणार आहे. यंदाचा अर्थसंकल्पामध्ये वित्त नियोजन, अन्य आणि नागरी पुरवठा विभागामध्ये अनुदानाच्या मागण्या पूर्ण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये 2100 रुपये कधी मिळेल असे सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र सध्याला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे. राज्यातील आर्थिक स्थिती सुधारण्यानंतर लाडक्या बहिणींना आम्ही या योजनेचे रकमेत वाढ करणार आहोत अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.