Farmer ID Card: केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणार विविध योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र Farmer Id अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना ऍग्री स्ट्रॅक प्रोग्राम या योजनेअंतर्गत आपली शेत जमीन आधार कार्डशी लिंक करणे आवश्यकता आहे.
Farmer ID: फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय ?
फार्मर आयडी कार्ड: केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर फार्मर आयडी कार्ड बनवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या या नवीन नियमानुसार ऍग्रो स्ट्रोक प्रोग्राम या अंतर्गत शेतजमीन आधार कार्डची लिंक करणे आवश्यकता असणार आहे.
हे केले नाही तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, पिक विमा अशा अनेक विविध योजनांचा फायदा मिळणार नाही. राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे शेतजमीन हे आधार कार्डशी लिंक करणे सुरू झाले आहे. त्याचबरोबर फार्मर आयडी बनवण्याचं काम सुद्धा सुरू झाले आहे.
राज्यामध्ये एकूण एक कोटीहून अधिक शेतकरी या योजनेमध्ये जोडले जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या नावावर असलेली शेत जमीन ही आधार कार्ड चे संलग्न करून घेतल्यानंतर त्याचा एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे. या क्रमांकाचा उपयोग भविष्यामध्ये येणाऱ्या सरकारी योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शेती संबंधित कामाकरिता या क्रमांकाचा उपयोग होणार आहे.शेतकरी फार्मर आयडी कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आपले सेवा केंद्र चालवणाऱ्या सर्वांचे बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शेतकरी नोंदणी म्हणजे काय ?
शेताची नोंदणी म्हणजे एक अशी प्रणाली आहे. जे की शेतीचे आणि काही जमिनीची माहिती नोंदवली जाते. शेती योजनेमध्ये आणखी काही सुधारण्या करण्यासाठी हा एक केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. सोप्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर शेतकऱ्यांची आयडीचा संपूर्ण माहिती डेटाबेस म्हणजेच शेतकरी नोंदणी असते.
Farmer ID: फार्मर आयडी ची गरज का ?
शेती ओळखपत्राची गरज यासाठी आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. आणि भविष्यामध्ये शेती संबंधित विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांना या फार्मर आयडीमुळे होणार आहे. शेतकरी ओळखपत्र बनवण्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी KYC करायची गरज पडणार नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना केवायसी ची समस्या दूर होणार आहे. या फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेमधील होणाऱ्या भ्रष्टाचार सुद्धा बंद होणार आहे.
Farmer ID 2025 शेतकरी ओळखपत्र मिळणारे फायदे
शेतकरी ओळखपत्राचा फायदा आणि वितरण
Sr No. | शेतकरी ओळखपत्राचा फायदा | वितरण |
---|---|---|
1. | केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेचा लाभ | केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी ओळखपत्रामध्ये मिळणार आहे. |
2. | कर्ज सुविधा | सरकारी बँक किंवा सहकारी बँक मधून शेतीसाठी कर्ज उपलब्ध होते. |
3. | अनुदान सुविधा | शेतकरी ओळखपत्रामुळे शेतीसाठी लागणारे खत, बियाणे, अवजारे या सुविधांची मदत दिली जाते. |
4. | पिक विमा सुविधा | शेतीमध्ये काही नैसर्गिक आपत्ती झाल्यास पिक विमा संरक्षण उपलब्ध होते. |
5. | शेतीमाल विक्री मदत | या कार्डमुळे शेतीमाल बाजारपेठेत विकण्यासाठी प्राधान्य मिळणार आहे. |
6. | शेतकरी ओळखपत्र नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट | वेबसाईट |
Farmer ID Card शेतकरी ओळखपत्र बनवण्याचे फायदे काय आहे ?
1. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार द्वारे चालवण्यात येणाऱ्या शेती संबंधित विविध योजना चा लाभ शेतकऱ्यांना या फार्मर आयडी कार्ड मुळे मिळणार आहे.
2. शेतकरी ओळखपत्र बनवण्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल परिवर्तन होणार आहे.
3. फार्मर आयडी कार्ड बनवण्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी वारंवार करावा लागते त्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते अशी अपेक्षा आहे.
4. शेतकरी ओळखपत्र बनवण्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या सरकारी योजनेचा फायदा यामुळे होणार आहे.त्याचबरोबर भविष्यामध्ये पीएम किसान सन्मानितेचा हप्ता मिळेल.
5. शेतकरी नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र मिळेल.
6. जर शेतकऱ्यांकडे शेती ओळखपत्र असल्यास बँकेकडून कर्ज घेण्यासाठी मदत मिळणार आहे.
7. त्याचबरोबर शेतीसाठी जे काही आवश्यकता साहित्य खते, बियाणे, शेती साठी लागणारे अवजारे खरेदी करण्यासाठी या शेतकरी ओळखपत्राचा फायदा होणार आहे.
8. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल तरच त्या शेतकऱ्यांना पी.एम किसान सन्माननीय योजना,पिक विमा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना चा फायदा होणार आहे.
9. पी एम किसान सन्माननिध योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षाला 6000 रुपये रक्कम दिली जाते. योजनेची रक्कम शेतकऱ्यांना प्रति 2000 रुपये मिळून असे तीन हप्ते वर्षाला दिले जातात. जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवले नाही तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही.
10. जर तुमच्याकडे Farmer ID card शेतकरी ओळखपत्र नसेल तर भविष्यामध्ये सरकारी योजनेचा फायदा तुम्हाला मिळणार नाही.
Farmer ID Card शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी लागणारे कागदपत्रे
1. आधार कार्ड (Adhar card), मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन,
2. शेती जमिनीची माहिती सातबारा 7/12
3. शेतीचा 8अ उतारा
4. बँकेचा पासबुक झेरॉक्स
5. पासपोर्ट आकाराचा फोटो
6. आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
Farmer Id: शेती ओळखपत्र बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा
1. Farmer ID शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ वरती जायचं आहे.
2. या वेबसाईटवर मुख्य पेजवर आल्यानंतर “Create New User Account” या पर्यायावर ती क्लिक करायचा आहे.
3. येथे क्लिक केल्यानतर पुढील पृष्ठ ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला बारा अंकी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आणि “Submit” बटन वर क्लिक करायचा आहे.
4. त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी OTP येईल तो ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे.
5. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. आणि त्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचा आहे.
6. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल आणि “Create My Account” या पर्यावर्ति क्लिक करायचा आहे.
7. अशाप्रकारे तुमचे फार्मर आयडी यासाठी नोंदणी पूर्ण होईल.
8. यशस्वी नोंदणी झाल्यानंतर परत तुम्हाला मुख्यपृष्ठावरती यावा लागेल आणि फार्मर म्हणून लॉगिन या ठिकाणी क्लिक करायचा आहे.
9. या ठिकाणी आल्यानंतर ओटीपी OTP टाकून तुम्हाला लॉक इन करून घ्यायचा आहे.
10. त्यानंतर पुढील मुख्य पृष्ठ तुमच्या पुढे उघडेल त्या ठिकाणी “Register As Farmer” या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
11. त्यानंतर तुमच्या पुढे आणखी एक नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी फॉर्म वरती बरोबर माहिती भरून घ्यायची आहे.
12. त्यानंतर खाली दिलेल्या “Procced” पर्यावरण क्लिक करून घ्यायचा आहे.
13. या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे आणखी एक पॉप-अप ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला “Proceed To E Sign” हा पर्याय तुमच्यापुढे दिसेल.
14. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे आणखी एक पेज ओपन होईल तेथे तुम्हाला आधार ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. त्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
15. तुम्ही सबमिट “Sumbit” बटन वरती क्लिक केल्याच्या नंतर फार्मर आयडीची नोंदणी होईल. त्यानंतर तुम्हाला एक स्लीप मिळेल.
16. ती स्लिप डाऊनलोड करून तुम्हाला चांगले ठेवावे लागेल. भविष्यामध्ये सरकार योजनेचा फायदा मिळवण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे. अशाप्रकारे तुम्ही शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडीची नोंदणी करू शकता.
निष्कर्ष: Farmer ID Card शेतकरी ओळखपत्र बनवले तरच तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सरकारी योजना चा फायदा मिळणार आहे. शेतकरी ओळखपत्र बनवले तर तुम्हाला पीएम किसान योजना, पिक विमा योजना चा फायदा होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.