Farmer Id Download Process: देशातील आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी चा फॉर्म भरला होता. त्या शेतकऱ्यांना आता एसएमएस त्यांच्या मोबाईल वरती मिळत आहे. तर आता अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी कशी डाऊनलोड करायची? ही सर्व माहिती आपण या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत.
Farmer Id Download Process: शेतकरी ओळखपत्र “फार्मर आयडी”
देशातील आणि राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्राचा फॉर्म भरला होता. तर त्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या मोबाईल वरती युनिक आयडी चा अधिकृत संदेश येत आहे. तर आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी कशी डाउनलोड करायचे? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये चालू आहे. तर फार्मर आयडी कशी डाऊनलोड करायची सविस्तरपणे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
Farmer Id : शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय ?
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘अग्रिस्टॅक योजने’ या योजनेअंतर्गत फार्मर आयडी ही सुरू केले आहे. या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर पिकाची माहिती बाजारभाव अशी अनेक प्रकारची माहिती याद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहे. त्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये सरकार योजनेचा लाभ मिळणार आहे. जसे की “पी एम किसान योजना” राज्य सरकार “नमो शेतकरी योजना” या योजनेची शेतकऱ्यांना जो लाभ मिळतो तो मिळेल. जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नसेल तर भविष्यामध्ये मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार नाही.
Farmer ID Download: शेतकरी ओळखपत्र कसे डाउनलोड करावे?
- 1. ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
- 2. या ठिकाणी आल्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये आधार क्रमांक या ठिकाणी भरून घ्यायचा आहे.
- 3. जर शेतकऱ्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या असेल तर त्यांना युनिक आयडी मिळेल तो युनिक आयडी टाकून घ्यायचा आहे.
- 4. आधार क्रमांक टाकल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे.
- 5. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला “फार्मर आयडी” डाऊनलोड करा या पर्यायावर ती क्लिक करून घ्यायचा आहे आणि फार्मर आयडी डाऊनलोड करायचे.
Farmer ID FAQ: शेतकरी ओळखपत्र विषय वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न?
1. फार्मर आयडी म्हणजे काय ?
शेतकरी ओळखपत्र हे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केला आहे. शेतकऱ्यांची जमिनीची माहिती एकाच ठिकाणी मिळावी. शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेती भावाचं माहिती या ठिकाणी मिळणार आहे.
2. शेतकरी ओळखपत्र का आवश्यकता आहे?
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे सरकारी योजना चा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. पी एम किसान,नमो शेतकरी योजना, आणि पिक विमा या प्रकारचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे.
3. फार्मर आयडी च रजिस्ट्रेशन कुठे करावे ?
फार्मर आयडी काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ॲग्रीस्टॅकच्या यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवू शकता. किंवा महा-ई-सेवा केंद्राला जाऊन तुम्ही फार्मर आयडी बनवू शकतात.
4. फार्मर आयडी चे फायदे काय?
जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली तर भविष्यामध्ये सरकारी योजना चा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची शेतीची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांना वारंवार केवायसी पासून सुटका मिळणार आहे.
5. शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यकता कागदपत्रे कोणती?
फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि शेती संबंधित सातबारा कागदपत्रे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा प्रश्न मोबाईल नंबर आणि आणि ओळखपत्र बनवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे.
निष्कर्ष: शेतकरी ओळखपत्र केंद्र सरकारने राज्य सरकारने ऍग्री स्टॉक या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सुरू केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना मिळणारा योजनाचा लाभ हा लवकरात लवकर मिळेल. शेतकऱ्यांना बाजारभाव, अशा प्रकारची अनेक माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ओळखपत्र बनवले नसेल तर भविष्यामध्ये येणाऱ्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.