Farmer Id Update 2025: कृषी क्षेत्रातील योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी शासनाने बंधनकारक केला आहे. जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर विविध शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. Farmer Id राज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा वापर करून विविध योजनांना जलद गतीने आणि परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्या करिता राज्यामध्ये “Agristack” योजना राबवण्यात येत आहे.
शेतकरी ओळखपत्र काढणे का महत्त्वाचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? याची संपूर्ण माहिती आपण बघूया.
Farmer Id Update 2025: शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय?
Farmer ID फार्मर आयडी यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे शासनाला शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी अडचण येणार नाही. शेतकऱ्यांना यापूर्वी पी एम किसान योजना, नमो शेतकरी योजना, यासाठी ई केवायसी करावा लागत होती ती आता वारांवर करायची गरज पडणार नाही.
फार्मर आयडी काढल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान योजनेमध्ये भ्रष्टाचार होत होता तो आता यामध्ये होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांची शेतीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येणारे अनुदान जलद गतीने शेतकऱ्यांचा खात्यावरती पाठवले जाईल. आणि शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी बनवणे महत्त्वाचे आहे.
Farmer Id update: शेतकरी ओळखपत्र बनवणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे
राज्यांमध कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने व परिणामकार लाभ शेतकऱ्यांना देण्याचे उद्दिष्ट “अँग्रिस्टॅक” या योजनेद्वारे केले जात आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा आधार सलग्न माहिती संच (Farmer Registri) तयार केल्या जातात. शेतकऱ्यांच्या शेतीचा हंगामी पिकाचा माहिती संच, या सर्व शेतीच्या माहितीचा संच एकत्रित रित्या तयार केला जात आहे.
Farmer Id : फार्मर आयडी शासन निर्णयामध्ये काय म्हटले आहे?
- 1. राज्यात कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना चा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) काढणे आवश्यक आहे. राज्यामध्ये दिनांक 15/04/2025 पासून फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.
- 2. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्याविषयी सर्व संबंधित पोर्टल, वेबसाईट, आणि ऑनलाईन प्रणाली इत्यादी संबंधित पोर्टलशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुविधा करण्याची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी.
- 3. शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्यांच्याशी सलग्नित डेटा म्हणजेच जमिनीची (Geo referenced parcel data) माहिती. आणि त्याच जमिनीवर घेतलेली पिकाची (DCS) माहिती. आणि कृषी विभागात वापरण्यात येणाऱ्या विविध प्रणाली “Application Programming Interface” यांच्या द्वारे AgriStack या प्रणालीशी जोडण्याची आवश्यकता कारवाई आयुक्त तसेच संचालक भू अभिलेख महाराष्ट्र राज्य,पुणे आयुक्त यांच्या समन्वय करावे.
- 4. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी आणखीही शेतकरी ओळखपत्र क्रमांक Farmer ID याची नोंदणी केली नसेल, तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्यावी. अन्यथा विविध सरकारी योजना चा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. जसे की पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही, त्यामुळे तुमच्या जवळची ऑनलाईन सेवा केंद्र किंवा CSC या ठिकाणी जाऊन तुम्ही फार्मर आयडी ची नोंदणी करून घ्या.
- 5. राज्यातील शेतकऱ्यांना राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र बनवून घेणे आवश्यक आहे. राज्यातील कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्या बाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार व जागृती करण्यात यावी.
निष्कर्ष: राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत AgriStack योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना स्वतःचे फार्मर आयडी तयार करून घ्यायचे आहे. Farmer ID फार्मर आयडी तयार केल्याच्या नंतर शासकीय येणारे विविध योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला सरकारच्या कृषी विभागामार्फत येणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळणार नाही. अजूनही तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवलेला नसेल तर लवकरात लवकर तुमचं ओळखपत्र बनवून घ्या. शेतकरी ओळखपत्र बनवणे याबाबत शासकीय निर्णय देखील काढण्यात आला आहे.