Gharkul scheme: सरकारच्या आश्वासनांची पूर्तता नाही, घरकुल योजनेवरून ग्रामीण भागात संताप”

Gurukul scheme : सरकारने ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या हक्काचा एक निवार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून घरकुल योजनेची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी अनेक घोषणाची पूर्ती झाली नसल्यामुळे लाभार्थ्यांचा उपलब्ध करण्यासाठी कल दिसत नाही. परंतु या योजनेच्या उद्दिष्टपुतीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. यामुळे हे कर्मचारी अधिकच मेटाकुटीला आले आहेत. तालुक्यात घरकुलाचा दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारने दिले आश्वासनाची पुरती करण्याआधी आवश्यक आहे. तरच ग्रामीण भागातील लोकांना निवारा उपलब्ध होऊ शकतो.

Gurukul scheme : मोफत वाळू व वाढीव अनुदानाची घोषणा हवेतच

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तोंडावर शासनाने ग्रामीण भागातील लोकांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मंजुरी दिली होती. त्यामुळे उद्दिष्टपूतीसाठी शासनाने महसूल व ग्रामसेवक या दोन खात्याचा उपयोग समन्वय साधला नाही.अनेक नागरिकाकडे घरासाठी जागा नसल्यामुळे बक्षीस पत्राची अनेक प्रकरणे पंचायत समितीचे महसूल कडे पाठवली गेली. त्यामुळे काही प्रकल्प प्रकरणाला मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी लावली परंतु ते लाभार्थ्याला त्रास देत आहेत.

ही प्रकरणे अध्याप महसूल स्तरावर प्रलंबित केले गेले आहेत. तर बेघर लाभार्थ्यांना गायरानातील जागा अजून उपलब्ध केलेल्या नाहीत नेमणुकीच्या तोंडावर घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास सरसकट मोफत वाळूची घोषणा केली. परंतु त्या गोष्टीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. घरकुल अनुदानातील निम्मे अनुदान हे वाळूवरच खर्चावे लागत आहे. यामुळे राहिलेल्या अनुदानात घराचे काम पूर्ण होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांनी बांधकामाकडे पाठ फिरवली आहे.

हे ही वाचा :: Mofat Bhandi Yojana: मोफत भांडी संच योजना सुरू! घरगुती भांडी आता सरकार देणार फुकट – जाणून घ्या अर्ज प्रक्रिया👇👇👇      

Gurukul scheme : सरपंचांच्या सहीमुळे हप्ते रखडले

याउलट बांधलेल्या घरकुलाचा हप्ता सोडवण्यासाठी ग्रामीण शाखा अभियंता व ग्रामसेवकाच्या साह्याने दुसरा व तिसरा हप्ता मिळणे आवश्यक असताना सरपंचाच्या सहीची आवश्यकता केली. वास्तविक पाहता काही सरपंचाकडून राजकीय दृष्टिकोनातून अडवणूक केली जात असल्याने घरकुलाचे काम रखडले गेले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना एक सारखा नियम असावा अशी देखील भूमिका या निमित्ताने व्यक्त होत. या परिस्थितीत वाढीव पन्नास हजाराच्या अनुदानाची घोषणा केली. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामध्ये पंधरा हजाराच्या अनुदान हे सोलार साठी ठरवले तेवढ्या रकमे सोलार चे काम पूर्ण होत नाही.

Gurukul scheme : शौचालय अनुदानाबाबत गोंधळ

घरकुल योजनेमध्ये शौचालयाला 12000 अनुदान देणे साठी देखील घोषणा केली प्रत्यक्षात 2012 -2013 नंतर शौचालयाच्या संदर्भात नवीन कुटुंबाला कुटुंबाचा बेस्ट लाईन सर्वच केला नसल्यामुळे या घरकुल लाभार्थ्यांना 12 हजार रुपये कुठून देणार हाही प्रश्न आणि आहे मात्र सरकारने केलेल्या या घोषणाची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र सातत्याने अधिकाऱ्याला तकदार लावत जात आहे. प्रशासकीय स्तरावर कर्मचाऱ्यांनी अनेक पदे रिक्त आहेत एका गावाच्या ग्रामसेवकावर अनेक गावाचा पदभार आहे परंतु काही ग्रामसेवक प्रशिक्षणाला गेले आहेत अशा परिस्थितीत उद्दिष्ट कृतीसाठी शासनाने पाणीपुरवठा कर्मचारी स्वच्छता कर्मचारी डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्राम रोजगार सेवक यांच्या माध्यमातून गृह भेट लावल्या जात आहे.

Gurukul scheme : लाभार्थ्यांचा सरकारवर वाढता संताप

ग्रामीण भागातील लोकांना शासनाने मंजूर केलेल्या अनुदानात घरकुल पूर्ण होत नसल्यामुळे काही लाभार्थ्यांनी घरकुलाची अनुदान सरकारला परत पाठवले कारण या पैशांमध्ये घर बनत नाही त्यामुळे पहिला हप्ता घेऊन थांबून वाळून मिळेल या आशेवर बांधकाम थांबले अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांच्या बैठकावर बैठका उद्दिष्ट पूर्तीसाठी होत आहेत परंतु या योजनेच्या सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ती ऐवजी बांधकाम पुरती साठी तक्ता लाभार्थ्यांना लावला जात आहे त्यामुळे लाभार्थ्याच्या मनात संताप जनक प्रक्रिया व्यक्त होत आहे.

हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana:महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेत पुन्हा मिळणार अर्जाची संधी      

Gharkul scheme: ग्रामीण भागाला शहरी प्रमाणे अनुदानाची मागणी

ग्रामीण भागातील घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आता केंद्र सरकार शहरी भागामध्ये जेवढे अनुदान देते तेवढेच अनुदान ग्रामीण भागातील लोकांना दिल्यामुळे गोरगरिबाचे घरकुल बांधकाम पूर्ण होईल. शिवाय त्यांना हक्काचा निवारा सुद्धा उपलब्ध होऊ शकेल.

Leave a Comment