HSC and SSC Result 2025: दहावी आणि बारावीच्या निकालाच्या प्रतीक्षेमध्ये विद्यार्थी आणि त्यांचे पालक वाट बघत आहे. मात्र दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेलं आहे. तर अशामध्ये बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून मोठी बातमी समोर येत आहे. बारावी विद्यार्थ्यांचा निकाल 13 मे रोजी लागेल आणि दहावी विद्यार्थ्यांचा निकाल हा 15 ते 16 मे दरम्यान लागणार आहे. तर निकाल कसा बघायचा कुठे बघायचा यासंदर्भात सविस्तर माहिती आपण यात लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
HSC and SSC Result 2025: दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख ठरली
राज्यातील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या निकालाची तारीख संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. (Hsc and ssc result) बारावी आणि दहावी विद्यार्थ्यांचा निकालाची तारीख ठरली असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वरिष्ठ अधिकारी यांनी माहिती दिली आहे.
तर राज्यामध्ये 13 मे रोजी बारावी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच 15 ते 16 मे दरम्यान दहावी विद्यार्थ्यांचा निकाल लागेल अशी माहिती राज्यातील शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासणी पूर्ण झाल्या असून. तर आता निकालाची छपाई सुरू असून लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल लागण्याची शक्यता आहे. अशी माहिती वरिष्ठ शिक्षणाधिकारी यांनी दिलेले आहे.
HSC and SSC Result 2025: दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी झाल्या?
राज्यातील बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या दरम्यान पूर्ण झाले आहे. तसेच राज्यातील दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान पूर्ण झाले आहे. तर सर्व शिक्षकांनी बोर्डाच्या दिलेल्या वेळेच्या अगोदर उत्तर पत्रिका तपासण्या पूर्ण केल्या आहे.
तर दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या निकालाची छपाई चालू असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी केलेले आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल हा 11 मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे. तसेच बारावी विद्यार्थ्यांचा निकाल हा 13 ते 14 मे पर्यंत लागणार आहे. तर दहावीचा निकाल हा 16 मे ला लागण्याची शक्यता आहे.
HSC and SSC Result official website: दहावी आणि बारावीचा निकाल बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट
1.mahresult.nic.in
2.mahahsscboard.in
HSC and SSC Result Check 2025: दहावी बारावीचा निकाल असा चेक करा
दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाईट वरती कसा चेक करायचा? सविस्तरपणे जाणून घेऊया.
1. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
2. या ठिकाणी आल्यानंतर एच एस सी HSC Result निकाल किंवा एसएससी Ssc result निकाल या पर्यावरणावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
3. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर नवीन पुष्ट ओपन होईल.
4. या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीटवरचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून घ्यायचे आहे.
5. आणि त्यानंतर सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे.
6. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती टक्केवारी पडली आणि पास आहे किंवा नाही या ठिकाणी लगेच कळणार आहे.