Indian Post Office GDS Recruitment 2025: भारतीय डाक विभागात नोकरीची सुवर्णसंधी, 21,413 पदासाठी मेगा भरती

Indian Post Office GDS Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी नोकरीची सुवर्णसंधी. भारतीय डाक विभागामध्ये मेगा भरती काढण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 21,413 रिक्त पदे आहे. इच्छुक उमेदवाराची दहावी पास असेल तर अर्ज करू शकतो. 10 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे. उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाईटला जाऊन अर्ज करू शकतो. भारतीय डाक विभागामध्ये अर्ज कुठे करायचा? कसा करायचा? सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत.

Indian Post Office GDS Recruitment: भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक या पदाकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. भारतीय डाक विभागातील ग्रामीण डाक सेवक GDS या रिक्त पदाच्या जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर  https://indiapostgdsonline.gov.in/ जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

या भरतीसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 पर्यंत ठेवण्यात आली आहे. भारतीय डाक विभागातील डाग सेवक या पदासाठी एकूण 21,413 रिक्त पदासाठी भरती करण्यात आली आहे. त्यामध्ये GDS-ग्रामीण डाक सेवक, BPM-ब्रांच पोस्ट मास्टर आणि ABPM – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी भरती करण्यात आली आहे.

Indian Post Office GDS Recruitment 2025


📢 Indian Post Office GDS Recruitment भरती सूचना – भारतीय डाक विभाग 📢

🔹 भरती करणारी संस्थाभारतीय डाक विभाग
🔹 पदाचे नावGDS- ग्रामीण डाक सेवक, BPM- ब्रांच पोस्ट मास्टर, ABPM- असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर
🔹 एकूण रिक्त पदे21,413
🔹 श्रेणीसरकारी नोकरी
🔹 अर्ज प्रक्रियाऑनलाइन
🔹 शैक्षणिक पात्रतादहावी पास
🔹 वयोमर्यादा18 ते 40 वर्षे
🔹 निवड प्रक्रियादहावीच्या गुणांवर आधारित
🔹 पगार (मानधन)
ABPM/GDS₹10,000 – ₹24,470
BPM₹12,000 – ₹29,380
🔹 अधिकृत वेबसाईट🌐 indiapostgdsonline.gov.in

📌 लवकरच अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवा! ✅

Indian Post Office GDS Recruitment 2025: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख

इच्छुक उमेदवारालाइंडियन पोस्ट ऑफिस या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली सविस्तर तारखा दिलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारासाठी भरतीचा अर्ज करायचा असेल तर तीन मार्च 2025 आधी अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला https://indiapostgdsonline.gov.in/भेट द्या.

📢 भारतीय डाक विभाग भरती 2025 – महत्त्वाच्या तारखा 📢

📅 घटना🕒 तारीख
🔹 जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख10 फेब्रुवारी 2025
🔹 ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख10 फेब्रुवारी 2025
🔹 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख03 मार्च 2025 (रात्री 12 वाजेपर्यंत)
🔹 अर्जात दुरुस्ती करण्याची तारीख6 ते 8 मार्च 2025

Indian Post Office GDS Recruitment 2025: या भरतीसाठी राज्यानुसार किती रिक्त पदसंख्या आहे?

भारतीय डाक विभागामध्ये 21,413 ग्रामीण डाक सेवक या रिक्त पदासाठी भरती करण्यात आली आहे. यापैकी सर्वात जास्त रिक्त पदे उत्तर प्रदेश यामध्ये आहे. 1374 रिक्त पदे आहे. आणि सर्वात कमी रिक्त पदे महाराष्ट्र मध्ये आहे. एकूण 25 रिक्त पदे आहे. तर कोणत्या राज्यात किती रिक्त पदे आहे. सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

📢 भारतीय डाक विभाग भरती 2025 – राज्यनिहाय रिक्त पदसंख्या 📢

🔹 राज्याचे नाव📝 रिक्त पदसंख्या
महाराष्ट्र25
उत्तर प्रदेश3004
बिहार783
मध्यप्रदेश1314
छत्तीसगड638
झारखंड822
जम्मू-काश्मीर255
हिमाचल प्रदेश331
केरळ1385
पंजाब400
हरियाणा82
दिल्ली30
कर्नाटका1135
ईशान्य1260
ओडिशा1101
आसाम1870
तेलंगणा519
तामिळनाडू2292
आंध्रप्रदेश1215
गुजरात1203
पश्चिम बंगाल923
उत्तराखंड568
एकूण21,413

Indian Post Office GDS Recruitment 2025: भारतासाठी लागणारा शुल्क

भारतीय डाक विभागतील भरती 2025 करिता ऑनलाइनअर्ज भरण्यासाठी उमेदवाराला लागणारा शुल्क
ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन बँकिंग, अशा पद्धतीने इच्छुक उमेदवार अर्ज चा शुल्क भरू शकतो. साधारण कॅटेगिरी मधला उमेदवार यांना 100 रुपये फी लागणार आहे. आणि मागासवर्गीय कॅटेगरीत SC, ST, महिला, असलेल्या उमेदवारांना कुठलीही आकारले जाणार नाही. भारतीय डाक विभागामध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

📢 भारतीय डाक विभाग भरती 2025 – अर्ज शुल्क 📢

🔹 श्रेणी💰 परीक्षा फी
ओपन कॅटेगिरी (UR)₹100
आर्थिक मागासवर्गीय, SC, ST, अपंग, महिला, ट्रान्सजेंडर₹0 (माफ)

Indian Post GDS Recruitment: वयोमर्यादा

Indian Post DGS office recruitment: भारतीय डाक विभागामध्ये उमेदवाराला अर्ज करण्यासाठी साधारण 18 वर्षे ते 40 वर्ष पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयामध्ये राखीव सूट देण्यात आले आहे.

📢 भारतीय डाक विभाग भरती 2025 – वयोमर्यादा सवलत 📢

🔹 कॅटेगिरी⏳ वयोमर्यादा सवलत
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC/ST)5 वर्षे सूट
इतर मागासवर्गीय (OBC/EBC)3 वर्षे सूट
अपंग (PWD) उमेदवार10 वर्षे सूट
अपंग (PWD) + SC/ST13 वर्षे सूट
अपंग (PWD) + OBC15 वर्षे सूट

Indian Post Office GDS Recruitment 2025: शैक्षणिक पात्रता काय असणार आहे?

1. इंडियन पोस्ट ऑफिस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराची दहावी पास असणं आवश्यक आहे. उमेदवाराचे दहावी मध्ये गणित आणि इंग्रजी हे विषय असावे.
2. मान्यता प्राप्त विद्यापीठामधून दहावी उत्तीर्ण असावे आणि त्यांचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असावे. उमेदवाराकडे स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.

इतर शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळामधून एम एस सी आय टी MSCIT कोर्स कंप्लिट केलेला असावा. किंवा त्या व्यतिरिक्त कोणताही संगणक ज्ञान असणे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Indian Post Office GDS Recruitment 2025: ऑनलाइन अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर

भारतीय डाक विभागाच्या भरतीचा अर्ज करताना तीन टप्प्यांमध्ये अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची नोंदणी अर्जाचा शुल्क आणि ऑनलाइन अर्ज सविस्तरपणे भरावा लागणार आहे. अशा तीन पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

  • सर्वात प्रथम तुम्हाला भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला https://indiapostgdsonline.gov.in/ भेट द्यायचे आहे.
  • या वेबसाईटवर आल्यानंतर अर्जाची नोंदणी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
  • नोंदणी करता वेळेस अर्जामध्ये मोबाईल नंबर, ईमेल अशी महत्त्वाची माहिती भरून घ्यायची. आणि त्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे.
  • रजिस्ट्रेशन करता वेळेस युजरनेम आणि पासवर्ड जो तयार केला आहे तो चांगला ठेवायचा आहे.
  • नोंदणी झाल्यानंतर पुन्हा लॉगिन करायचा आहे. लॉगिन झाल्याच्या नंतर फॉर्ममध्ये महत्त्वाचे अर्जामध्ये दिलेले महत्वाचे कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे.
  • हे सर्व कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला अर्जाचा शुल्क भरावा लागणार आहे. सर्वसाधारण कॅटेगिरी साठी शंभर रुपये फी भरायचे आहे.
  • अर्जामध्ये तुम्हाला ऑनलाईन नेट बँकिंग उपलब्ध करून दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय याद्वारे तुम्ही अर्जाची फी भरू शकता.
  • नेट बँकिंग या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्जाची फी भरून घ्या.
  • अर्जाची फी भरल्यानंतर यशस्वी कोणी तुमचा अर्ज सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ती माहिती चांगली जपून ठेवायची आहे.

निष्कर्ष: indian Post GDS Recruitment 2025 भारतीय डाक विभागांमध्ये जीडीएस पदाकरिता 21,413 रिक्त पदासाठी भरती करण्यात आली आहे. दहावी पास उत्तीर्ण असलेल्या इच्छुक उमेदवाराला अर्ज करण्यासाठी 10 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज सुरू झाला आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 पर्यंत असणार आहे. या भरतीची निवड प्रक्रिया दहावीच्या गुणाच्या आधारे असणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आणि सविस्तरपणे जाहिरात वाचून घ्या तरच अर्ज करा.

Leave a Comment