JEE Rusult 2025: जेईई परीक्षेचा रिझल्ट जाहीर! राज्यात तिघांना मिळाले आहे 100% गुण , करा असा चेक रिझल्ट?

JEE Rusult 2025: नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एन टी एनटीएच मेन सेशन-2 जेईई रिझल्ट जाहीर झाला आहे. या exam मध्ये देशभरातील एकूण24 विद्यार्थ्यांनी 100% गुण प्राप्त केले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातून तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेमध्ये बसलेले विद्यार्थी, jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल तपासू शकता. आपला निकाल काय लागला आहे हे विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकुन लॉगिन करावे लागेल

ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती जानेवारी आणि एप्रिल मध्ये. यावर्षी परीक्षेसाठी एकूण 15 लाख 39 हजार 848 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यापैकी एकूण 14 लाख75 हजार हजार103 विद्यार्थी बसले होते. आणि या परीक्षेमध्ये एकूण 2 लाख 50 हजार 236 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं एप्रिल सतराची ची अंतिम उत्तर पत्रिका अधिकृत वेबसाईटला अपलोड केलेली आहे.

JEE Rusult 2025: कधी झाली परीक्षा?

JEE मेन सेशन ची परीक्षा ही 2,3,4 आणि 7 एप्रिल रोजी दोन शिफ्ट मध्ये झाली. पहिल्या शिफ्टचा वेळ हा 9 ते 12 होता. तर दुसऱ्या शिफ्ट चा टाईम 3 ते 6होता. तर आठ एप्रिल रोजी परीक्षा हे एकाच शिफ्ट मध्ये झाली त्याचा वेळ हा 3 ते 6 होता.

पेपर 2A (B.Arch) आणि पेपर 2B ची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12:30 या वेळेत एकाच शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती असा करा चेक रिझल्ट तुम्ही JEE रिझल्ट खाली स्टेप फॉलो करून चेक करू शकता.

  • 1. सर्वात अगोदर jeemain.nta.ac.inया NTA JEE च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • 2. तिथे तुम्हाला होम पेजवर JEE मेन्स निकाल 2025 ची ची लिंक दिसेल, त्या लिंक वर क्लिक करावे लागेल. 3. त्यानंतर लॉगिन माहिती भरा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
  • 4. तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • 5. ते डाऊनलोड करून ठेवा ,कारण त्याचा उपयोग भविष्यामध्ये होऊ शकतो.

Leave a Comment