Ladki bahin Yojana 2025: लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावरती आले की नाही, कसे तपासायचे? जाणून घ्या

Ladki bahin Yojana 2025: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये जुलै 2024 मध्ये महायुतीच्या सरकारने चालू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीत (Mukhyamantri Mazi Ladki bahin Yojana) लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेत महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.

आतापर्यंत लाडकी बहीण योजनांमध्ये नऊ हप्ते यशस्वीपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकत्रित ₹13,500 लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहे. आणि आता एप्रिल हप्त्याचे वाटप देखील सुरू झाले आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र हे स्टेटस कसे चेक करायचे? अकाउंट वर पैसे आले की नाही कसे बघायचे? सविस्तरपणे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Ladki bahin Yojana 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

  • योजनेचे नाव: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
  • सुरू करणारे केंद्र: महाराष्ट्र राज्य सरकार
  • योजना कधी सुरू झाली: जुलै 2024
  • योजना कोणी सुरू केली: माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • योजनेचे पात्रता: लाभार्थी महिलांकडे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे.
  • योजनेत मिळणारे रक्कम: दरमहा 1500 दीड हजार रुपये
  • लाभार्थी वयोमर्यादा: 21 वर्षे ते 65 वर्षे पर्यंत
  • आतापर्यंत मिळालेले हप्ते: 9 हप्ते एकूण मिळालेले रक्कम: 13500
  • दहाव्या हफ्ताचे वाटप सुरू: 1 मे 2025योजनेचे
  • अधिकृत वेबसाईट: लाडकी बहीण योजना

Ladki bahin Yojana 10 Hafta Check: एप्रिलचा 10वा हप्ता आला की नाही कसे करायचे चेक?

  • 1. राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता कधी मिळणार? त्याच्या प्रतिक्षेत महिला वाट बघत होत्या. तर आता ते प्रतीक्षा संपली आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात मध्ये हफ्ता वाटप सुरू झाला आहे.
  • 2. राज्यातील महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना पुढील 2 ते 3 दिवसात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार आहे अशी माहिती दिली आहे.
  • 3. तर अशामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले किंवा नाही कसे चेक करायचं सविस्तरपणे जाणून घेऊया.
  • 4. एप्रिल  महिन्याचा हप्ता मे महिन्यात वाटप सुरू झाला असून तुमच्या खात्यात पैसे आले की नाही तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन अकाउंट मध्ये पैसे किती आले चेक करू शकता.
  • 5. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जमा झाला किंवा नाही यासाठी तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही?  चेक करू शकता.
  • 6. जर लाभार्थी महिलांकडे ऑनलाईन बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंगच्या ॲप असेल त्यामध्ये स्टेटमेंट चेक करून तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही? चेक करू शकता.
  • 7. लाडकी बहीण योजनेचे खाते नंबर मोबाईल नंबर से लिंक असेल तर त्या मोबाईल नंबर वरती मेसेज येईल. त्यामध्ये तुम्हाला पैसे जमा झाले की नाही ते लगेच कळेल.
  • 8. जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा इतर ऑनलाईन ॲप्स वापरत नसाल तर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बँकेमध्ये भेटते आणि खात्यात पैसे जमा झाले की नाही चेक करा.

Leave a Comment