Ladki Bahin Yojana 8th installment 2025: लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार जाणून घ्या तारीख

Ladki Bahin Yojana 8th Installment 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून तर जानेवारी 2025 पर्यंत एकूण सात हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकूण रक्कम ₹10,500 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आली आहे. मात्र 8वा हप्ता खात्यात कधी जमा होणार याकडे महिलाच लक्ष लागून आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण खाली बघणार आहोत.

Ladki Bahin Yojana 8th Installment 2025

विवरणमाहिती
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजना सुरू झालीजुलै 2024
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
योजनेचा लाभ घेणारी महिलामहाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे
योजनेतील लाभदरमहा ₹1500 रुपये रक्कम
योजनेतील नियम आणि अटी– वय वर्ष 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी
– उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे
पैसे कसे जमा केले जातातआधार कार्ड चे खाते बँक ला लिंक असावे, DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणाली द्वारे
अधिकृत वेबसाईटमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे फायदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत म्हणून दरमहा दीड हजार रुपयाची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात. या योजनेमुळे महिला अत्यंत आनंदी आहे.

महिलांना आर्थिक मदत म्हणून ही रक्कम थेट त्यांच्या डीबीटी DBT प्रणाली द्वारे खात्यात जमा केली जातात. या योजनेतील मिळणारा लाभातून बऱ्याचश्या महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश महाराष्ट्र राज्य सरकारचा आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांचे उत्पन्न किती असावे ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा लाभ घेण्यासाठी नियम आणि अटी लावण्यात आल्या होत्या. जर महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक होते. तरच त्या महिलांना या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे.

Ladki bahin Yojana: या योजनेच्या नियमाने अटी आणि पात्रता जाणून घ्या

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांचे वय 21 वर्षे ते 65 वर्ष ठेवण्यात आले आहे.
  2. लाडकी बहीण योजना चा लाभ घेण्यासाठी महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं आवश्यक आहे.
  3. लाडकी बहीण योजना चा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील एक विवाहित व्यक्ती लाभ घेऊ शकते.
  4. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती चार चाकी वाहने नसावे.
  5. या योजनेचा लाभ घेणारे व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी, सरकारी सदस्य अशा कुठल्याही शासकीय नोकरीला नसावे.
  6. या योजनेत लाभ घेणारी व्यक्ती इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसावे. उदा. संजय गांधी निराधार योजना, पी एम किसान योजना, आणि नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेत नसावे.
  7. या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड बँकेला लिंक असावे.

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत अपात्र महिला कोणत्या ?

1. जर लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेत लाभ मिळणार नाही.

2. महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल त्या महिला देखील यामध्ये पात्र नाही.

3. च्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी, किंवा निवृत्तीनंतर वेतन घेत असेल आणि उपक्रम, मंडळ, सदस्य, अशा भारत सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल ते देखील यासाठी अपात्र आहे.

4. जर महिला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या विविध सरकारी योजनेचा लाभ घेत असेल त्या महिला देखील यासाठी अपात्र आहे.

5. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आमदार खासदार असेल त्या महिला देखील अपात्र.

6. ज्या महिलांकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर सोडून) असतील त्या देखील महिला यामध्ये अपात्र ठरल्या आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना चा लाभ किती आणि कसा जमा केले जातात ?

सरकारी योजनेचा लाभ हा थेट त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजेच आधार कार्ड ला बँक लिंक असेल तर डीबीटी DBT प्रणालीद्वारे बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. लाडकी बहीण योजनात पात्र झालेला महिलांना या योजनेचा लाभ ₹1500 रुपये दर महा त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जातात.

Ladki Bahin Yojana: या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी महिलांचे आधार कार्ड.
  • अधिवास प्रमाणपत्र (domicile certificate),15   वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला. यापैकी कोणतेही एक कागदपत्रे चालेल.3.वार्षिक उत्पन्नाचा दाखला ( 2.5 लाखापेक्षा कमी असावे) उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे रेशन कार्ड चालेल.
  • नवविवाहित महिला या महिलांचा रेशन कार्ड वर नाव नसेल तर पतीचे रेशन कार्ड चालेल.
  • नवविवाहित महिला या महिलांचा रेशन कार्ड वर नाव नसेल तर पतीचे रेशन कार्ड चालेल.
  • बँक पासबुक फोटो (आधार कार्ड बँकेला लिंक असावे).
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लाभार्थी महिलांचे हमीपत्र त्यावर स्वतःचे सही करावी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना चा अर्ज कसा करावा ?

1. सर्वात प्रथम तुम्हाला गुगल वरती जायचं आहे. आणि लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ भेट द्यायचे आहे.

2. या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे स्वतःचे प्रोफाइल तयार करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि आवश्यकता ती माहित भरून घ्यायचे आहे.

3. त्यानंतर तिथे तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे.

4. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला परत मेन पृष्ठावर्ती यायचा आहे. येथे आल्यानंतर तुम्ही बनवलेला युजरनेम आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आणि लॉगिन करायचा आहे.

5. लॉगिन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे नाव किंवा वडिलांचे किंवा पतीचे नाव विचारण्यात येईल ती माहिती बरोबर भरून घ्यायची आहे.

6. त्यानंतर तुम्हाला या योजनेत दिलेल्या आवश्यकता कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे.

7. हा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर अर्ज पुन्हा एकदा चांगला तपासून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.

Ladki bahin Yojana 8th installment: लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहे कसे चेक करावे ?

Ladki bahin Yojana 8th installment

1. सर्वात प्रथम तुम्हाला गुगल क्रोम वरती जायचं आहे येथे आल्यानंतर लाडकी बहीण योजनाच्य अधिकृत वेबसाईटला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ भेट द्या.

2. या ठिकाणी आल्यानंतर लॉगिन या बटन वर क्लिक करायचा आहे.

3. त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता वेळेस टाकलेला “Username” आणि “Password”, Captch तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि लॉगिन बटन वर क्लिक करायचा आहे.

4. अर्ज “Login” झाल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या बाजूला केलेला अर्ज याठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे.

5. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही केलेल्या अर्ज हे तुम्हाला इथे दिसणार आहे. वरती तुम्हाला तुमचे नाव दिसेल आणि आतापर्यंत किती हप्त्याचे पैसे जमा झाले आहे ते देखील तुम्हाला तिथे दिसणार आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेत मिळालेले पैशाचे करू शकतात.

Ladki Bahin Yojana 8th installment: लाडकी बहिण योजनाचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता कधी जमा होणार ?

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत महिलांना सात हप्ते खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 ते जानेवारी 2025 पर्यंतचे एकूण सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. असे मिळून एकत्रित साडेदहा हजार रुपये महिलांना मिळाले आहेत. मात्र आता 8वा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे.

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना दर महिन्याला ₹1500 रुपये ही रक्कम पंधरा तारखेच्या नंतरच खात्यात जमा केली जातात. मात्र फेब्रुवारी 2025 आठव्या हप्त्याची कुठलीही अधिकृत माहिती आणखी मिळाली नाही . पण मात्र पंधरा तारखेच्या नंतरच आठवा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment