Ladki bahin Yojana Good News: लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला होणार जमा

Ladki bahin Yojana Good News: महाराष्ट्र राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबवली जात आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये नऊ हप्ते यशस्वीपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकत्रित 13,500 रुपये महिलांच्या खात्यात मिळाले आहे.

मात्र एप्रिल हप्ता कधी मिळणार? याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. एप्रिल महिना हा संपत आला आहे मात्र पंधराशे रुपये कधी मिळतील याकडे महिलांचं लक्ष लागलेला आहे. तर यामध्येच आता राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी खुशखबर दिलेले आहे. नेमकं त्या काय म्हणाला सविस्तर आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Ladki bahin Yojana Good News: लाडक्या बहिणीसाठी खुशखबर

लाडकी बहिणी योजना मध्ये आतापर्यंत 13500 म्हणजेच 9 हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र आता एप्रिल चा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागलेलं आहे. तर अशा मध्येच राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी खुशखबर दिले आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळण्याचे शक्यता आहे असं देखील त्यांनी म्हटल आहे. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे 30 एप्रिल पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. अशी देखील माहिती समोर येत आहे.

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजना तपशील

  • योजनेचे नाव: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
  • योजना सुरू करणारे केंद्र: महाराष्ट्र राज्य
  • योजना कोणी सुरू केली: माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • योजना कधी सुरू झाली: जुलै 2024
  • योजनात मिळणारा लाभ: दरमहा 1500₹
  • योजनेची पात्रता: लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
  • एकूण मिळालेली रक्कम: 13,500 रुपये
  • अधिकृत वेबसाईट – लाडकी बहीण योजना

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत पुन्हा पडताळणी सुरू

मुख्यमंत्री माझी लाडकी  बहिण योजनेमध्ये ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केला आहे अशा महिलांची पळताना देखील सुरू झाले आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसलेल्या महिलांना योजनेतून बात केले जाणार आहे.

योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिला म्हणजेच अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला या योजनेतून रद्द केल्या जाणार आहे. तसेच महिलांकडे चार चाकी वाहने असतील किंवा सरकारी नोकरीला असतील अशा महिला देखिल यामधून वगळल्या जातील. आणि अशा महिलांना या योजनेत लाभ मिळणार नाही. ज्या महिलांनी शासकीय योजनेचा लाभ घेत आहे मात्र त्यांनी लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरला आहे अशा महिलांना योजनेत पाचशे रुपये मिळणार आहे.

तर राज्यामध्ये आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 9 लाख महिलांच्या अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांचे पडताळणी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सुरू झाले. तर यामध्ये एकूण नऊ लाख महिलांना या योजनेतून बात करण्यात आले आहे. मात्र त्या महिलांचे पैसे वापस घेतले नाही पण इथून पुढे मिळणारा लाभ त्या महिलांना मिळणार नाही.

निष्कर्ष: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचा आहे. या योजनेमध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिले जाते. ही रक्कम त्यांच्या आधारशी लिंक असलेल्या खात्याशी थेट डीबीटी प्रणाली द्वारे पैसे जमा होतात. तर या योजनेत आतापर्यंत नऊ हप्ते यशस्वीपणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.

Leave a Comment