Ladki bahin Yojana update: राज्यात 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेत आता मिळणार फक्त ₹500 रुपये! यादी तुमचे नाव आहे का?

Ladki bahin Yojana update: लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरी वरती भार पडला आहे. तर सरकारने आता लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल केले आहे. तर ते बदल कोणते आहे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Ladki bahin Yojana update: महाराष्ट्र राज्याच्या तिजोरी वरती भार

राज्याच्या तिजोरी वरती भार पडल्यामुळे लाडकी बहीण योजनेत मोठे बदल करण्यात आले आहे. या बदलामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आठ लाख महिलांना पंधराशे ऐवजी फक्त पाचशे रुपयेच मिळणार.  लाडकी बहीण योजना च्या नियमानुसार  जर महिलांनी अनेक विविध सरकारी योजना चा लाभ घेत असेल. तर त्या महिलांना 500 रुपये लाडकी बहीण योजनातून दिले जाणार आहे. मात्र ज्या महिला विविध सरकारी योजना चा लाभ मिळत नसेल अशा महिलांना ₹1500 रुपये मिळणारच आहे.

जसे की लाडकी बहीण योजनेतील महिलांनी नमो शेतकरी योजनेत ₹1000 रुपये मिळत असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये ₹500 रुपये मिळणार आहे.

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकी अगोदर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बेहेन योजना आणि नमो शेतकरी योजना ही योजना चालू केल्या होत्या. या योजनेमुळे त्यांना पुन्हा सत्ता मिळवण्यास मदत मिळाली आहे. तर या राज्य सरकारच्या दोन्ही योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या कोट्यावधी आहे. त्यामुळे राज्य सरकारला आर्थिक खर्चाचे नियंत्रण ठेवण्याची दबाव आहे. परंतु सरकारला त्यांच्या मुख्य योजना देखील चालवायचे आहे.

Ladki bahin Yojana update: महाराष्ट्र राज्य सरकार वरती किती रुपयाचे कर्ज आहे ?

राज्यावरती वर्ष 2025 ते 26 या वर्षांमध्ये 9.3 लाख कोटी रुपयांचं कर्ज असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 2025 आणि 26 या अर्थसंकल्पामध्ये लाडके बहीण योजनेसाठी 46 हजार रुपये कोटीची तरतूद करण्यात आली होती मात्र यावर्षी 36 हजार रुपयांची तरतूद करण्यात आले आहे. आणि त्यानंतर या योजनेतील लाभार्थींची संख्या देखील कमी होत आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेतील लाभ घेतलेल्या महिलांची छाननी केली जात आहे. पात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळावा या योजनेचा उद्देश आहे. लाडकी बहीण योजनेत ऑक्टोंबर महिन्यामध्ये 2.63 कोटी अर्जांची नोंद करण्यात आली होती.

त्यानंतर महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला होता त्या महिलांची छाननी करण्यात आली त्यामध्ये 11 लाख महिला यामधून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर लाडकी बहीण योजनेची संख्या 2 कोटी 52 लाख इतकी झाली होती. त्यानंतर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 2.46 लाख महिलांनाच लाभ मिळाला आहे.

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनातील लाडक्या बहिणीची संख्या कमी होणार?

लाडकी बहीण योजनातील छाननी केल्यानंतर या योजनेतील पात्र लाभार्थ्याची संख्या 10 ते 11 लाख कमी होण्याची शक्यता आहे. कारण लाडके बहिण योजनेमध्ये जे काही नियम आणि निकष लावले होते. त्या नियमाचे पालन न करता काही महिलांनी लाडकीभेन योजना चा फॉर्म भरला होता आणि योजनेचा लाभ देखील मिळवला आहे.

जसे की लाडकी बहीण योजनेत अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ मिळणार. मात्र काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून या योजनेचा लाभ मिळवलेला आहे. अशा महिलांची फेर तपासणी केल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेतून त्यांना बाद केले जाणार आहे.

राज्यामध्ये लाडकी बहीण योजना जे नियमाने निकष लावण्यात आले होते त्या पाच नियमाच्या आधारे पडताळणी केली जाणार आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसन एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितला आहे.

Leave a Comment