Lic Bima Sakhi Yojana 2025: विमा सखी योजना 2025: सरकार हे महिलांना सक्षम बनवण्यासाठी नवनवीन योजना राबवत असते जसे की प्रधानमंत्री “माझी लाडकी बहीण “योजना, मोफत शिलाई मशीन योजना, त्याच प्रकारे एलआयसी विमा सखी योजना ही त्यातील एक योजना आहे .ही योजना एलआयसी ची योजना आहे. ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आली.आयवीरमा महामंडळ (एलआयसी) द्वारे सरकार समर्थित परिवर्तनकारी योजना आहे. योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना निश्चित वेतन देऊन आणि कमिशनसह विमा एजंट बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे.
या योजनेची माहिती भारतातील सर्व महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सरकार नवनवीन धोरण हाती घेत आहे. एलआयसी भीमा सखी योजना ही फक्त महिलांसाठीच आहे. दरम्यान सरकारने महिलाच्या स्वावलंबनासाठी एलआयसी विमा सखी नावाची योजना आणली (bimar saki) आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना तीन वर्षाची ट्रेनिंग दिली जाईल. ट्रेनिंग च्या काळामध्ये महिला एलआयसी एजंट म्हणून काम करणार आहे.
ज्या महिलांनी पदवी पर्यंत शिक्षण कंप्लेंट केले आहे अशा महिलांना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करता येईल. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 7000 रुपये सोबत कमिशन सुद्धा मिळू शकतो. खालील लेखांमध्ये सविस्तरपणे माहिती दिलेली आहे एलआयसी विमा सखी योजना काय आहे, या योजनेची उद्दिष्ट काय आहे ,ही योजना साठी कोण पात्र आहे लाभ किती मिळणार आहे, अर्ज कुठे करायचा सविस्तरपणे दिलेले आहे जेणेकरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पण अर्ज करू शकाल.
Lic Bima Sakhi Yojana 2025: विमा सखी योजना
क्र. | तपशील | माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | LIC विमा सखी योजना |
2. | मर्यादित वेळ | 3 वर्ष |
3. | फायदा | विमा एजंट बनण्यासाठी तीन वर्षांची मोफत प्रशिक्षण |
4. | पात्रता | 18-70 वर्ष वयोगटातील महिला वर्ग |
5. | नोकरीची संधी | 3 वर्षानंतर महिला LIC एजंट म्हणून काम करू शकतात आणि चांगल्या पदावरही काम करू शकतात |
6. | कामाचे तास | लवचिक कामाचे तास |
7. | योजना सुरू होण्याची तारीख | 9 डिसेंबर 2024 |
8. | अधिकृत वेबसाईट | LIC India |
हे ही वाचा :: E-Shram Card Yojana 2025: ई-श्रम कार्ड योजनेचे प्रमुख फायदे काय? या योजनेचा अर्ज कसा करावा?
LIC विमा सखी योजना 2025: काय आहे ही योजना?
एलआयसी विमा सखी योजना ही एक एलआयसी मार्फत सुरू केलेली योजना आहे ही एक सरकारी योजना असून महिलांच्या भवितव्यासाठी सरकारने राबवलेले अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार करून व त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेली ही प्रधानमंत्री एलआयसी विमा साठी योजना आहे. ही योजना ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबवण्यात आलेली योजना आहे. नवीन नोकरीची संधी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील लोकांना विमा उपलब्ध करून देऊन, त्यांना आर्थिक व्यापक ध्येयात योगदान तिने या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलेला 3 वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाते, आर्थिक साक्षरतेची साधने, पॉलिसी आणि विम्याची आवश्यकता यावर प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये महिलांना 3 वर्षासाठी स्टायपॅड मिळेल. आणि त्या 3 वर्षा त्यानंतर एलआयसी एजंट म्हणून काम करू शकता.
महिला एलआयसी विमा एजंट झाल्यानंतर, त्यांच्या गावातील व आजूबाजू च्या लोकांना त्या विमा बद्दल माहिती सांगून त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करू शकते. आणि कुटुंबांना त्यांच्या विमा पॉलिसी मिळवण्यास मदत करू शकता. त्या समाजामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून काम सुद्धा करू शकतात. आणि कुटुंबांना चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन देऊ शकतात. एलआयसी या योजनेच्या माध्यमातून 1,00,000 महिलांना विमा सखी नोंदणी करायची योजना आखत आहे.
Lic Bima विमा सखी योजना 2025: या योजनेची पात्रता आणि आटी काय?
1. महिलाचे वय 18-70 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला कमीत कमी दहावी पास झालेली असावी.
3. ज्या महिला ग्रामीण भागामध्ये राहतात अशा महिलेला जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाईल.
4. अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी ऑफिस मध्ये भेट देऊ शकता. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
5. तुम्हाला यासाठी ऑनलाईन एलआयसी यांच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन अर्ज करू शकता.
6. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहे. वयाचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, राहत्या ठिकाणचा पत्त्याचा पुरावा, दहावी उत्तीर्ण असलेले ओरिजनल प्रमाणपत्र. इत्यादी कागदपत्रे लागणार आहे.
Lic विमा सखी योजना 2025: या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्या महिला अपात्र आहे?
1. Lic एलआयसीच्या कर्मचाऱ्याशी आणि एजंट अशा संबंधित महिला.
2. महिला या एलआयसी Lic निवृत्त आणि माजी एजंट नसाव्या.
3. लाभार्थी महिला विद्यमान एजंट नसाव्यात.
Lic विमा सखी योजना 2025: या योजनेचे उद्दिष्ट?
1. एलआयसी विमा सखी योजनेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे .
2. एका वर्षाच्या आत मध्ये 1,00,000 महिलांची नोंदणी करून महिलांना सक्षम बनवणे.
3. ग्रामीण भागामध्ये विमा बद्दल जनजागृती करणे
4. महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचे उद्दिष्ट आहे.
‘Bima Sakhi’ विमा सखी योजना 2025: महीलांना स्टापेंड किती असेल?
केंद्र सरकारने विमा सखी योजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेत सरकार महिलांना दरमहा सात हजार रुपयाची रक्कम आणि त्या व्यतिरिक्त बोनस सुद्धा देणार आहे. Lic एलआयसी विमा साठी योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षासाठी स्टापेंड दिला जातो. ती रक्कम खालील प्रमाणे आहे.
स्टायपेंड (प्रशिक्षण कालावधीत आर्थिक मदत)
वर्ष | प्रत्येक महिन्याला मिळणारी रक्कम |
---|---|
1ले वर्ष | ₹7,000 |
2रे वर्ष | ₹6,000 |
3रे वर्ष | ₹5,000 |
LIC Bima Sakhi Yojana: या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?
1. आधार कार्ड (Aadhar card)
2. रहिवासी दाखला
3. पॅन कार्ड
4. दहावीची मार्कशीट
5. मोबाईल नंबर
6. पासपोर्ट साईज फोटो
विमा सखी योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
विमा सखी योजना “Lic Bima Sakhi Yojana” या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा सविस्तरपणे आपण खाली बघणार आहोत.
- सर्वप्रथम तुम्हाला विमा सखी योजना यांच्या अधिकृत वेबसाईटला “https://licindia.in/test2” भेट द्यायचे आहे.
- या ठिकाणी आल्यानंतर विमा सखी योजना या पर्यावरण क्लिक करून घ्या.
- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे नवीन पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुमच्या स्वतःची माहिती तुम्हाला इथं भरायचे आहे. जसे की स्वतःचे नाव मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता, हे महत्त्वाची माहिती भरून घ्यायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये प्रश्न विचारण्यात येईल जसे की तुम्ही एलआयसी एजंट आहात का? Yes या no
- त्या ठिकाणी तुम्हाला नो या पर्यावर क्लिक करायचा आहे.
- हे सर्व झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला कॅपच्या विचारण्यात येतो कॅपच्या टाकून घ्यायचा आणि सबमिट बटन वर क्लिक करायचं.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि शहर निवडायचे आहे ज्या शहरात तुम्हाला काम करायचे आहे.
- पुढे तुम्हाला शाखा कार्यालय निवडायचे आहे. आणि “सबमिट लीड” या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे.
निष्कर्ष: lic Bima Sakhi Yojana 2025 केंद्र सरकार द्वारे एलआयसी विमा सखी योजना चालू करण्यात आले आहे आणि राज्यांमध्ये याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना सात हजार रुपये प्रत्येकी महिन्याला मिळणार आहे. लाडकी बहीण योजना नंतर केंद्र सरकारने आता विमा सखी योजना सुरू केले आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईट वेबसाईटला भेट द्या.