Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2025: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे ?

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana 2025: महाराष्ट्र राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना या योजनेमार्फत दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र मध्ये 8 लाख 50 हजार इतके सौर पंप बसवण्यात येणार आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केला आहे. Magel Tyala Saur Krushi Pump Yojana मागेल त्याला सौर कृषी पंप योजना साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा सविस्तरपणे जाणून घेऊया.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

योजनेचे नावमागेल त्याला सौर कृषी पंप योजना
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
लाभ घेणारी व्यक्तीमहाराष्ट्राचे रहिवासी
योजनेची पात्रताज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन आहे
सौर कृषी पंप क्षमता3HP, 5HP आणि 7.5HP
अधिकृत वेबसाईटमागेल त्याला सौर कृषी योजना

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: सौर कृषी पंप म्हणजे काय ?

महाराष्ट्र राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी योजना चालू करण्यात आली आहे. सौर कृषी पंप देण्यात येत आहे. हा सौर कृषी पंप सूर्यकिरणावर चालणारा एक यंत्रणा आहे. या सौर पंपामध्ये मुख्यतः वॉटर पंप त्याबरोबर सोलर, पॅनल पंप यंत्रणा इत्यादी साहित्य यासोबत मिळतात.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: या योजनेत मिळणारे फायदे

  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पाणीपुरवठा मिळणार आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना वीज बिलाचा खर्च वाचतो.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीमालाच्या उत्पादनात वाढ होते.
  • सौर कृषी पंप योजना वापरल्यामुळे इतर पंपा पेक्षा या योजनेतील खर्च कमी लागतो.
  • सौर कृषी पंप बसवल्यामुळे शेतकऱ्यांना वीज खंडित समस्या पासून मुक्ती मिळते.
  • सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि पर्यावरण पूरक पाणीसाठा मिळतो.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना विजेचा तार किंवा विजेचा खंबा पडून वीज अपघात होत नाही.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये काय ?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केली आहे. या योजनेमध्ये प्रमुख वैशिष्ट्ये
राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना फायदा मिळणार आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहेत.

  • मागेल त्यांना सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाण्याचा साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप बसवता येतात.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी दिवसा पाणीसाठा मिळतो
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना वीज बिलापासून मुक्ती मिळते.
  • सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना लोड सिलिंग या समस्या पासून मुक्ती मिळते.
  • मागेल त्यांना सौर कृषी पंप योजना या योजनेमध्ये राज्यातील प्रत्येक शेतकरी अर्ज करू शकणार आहे.
  • या योजनेमुळे अपघाताच्या समस्या दूर होतात. विजेचा फोल पडणे विजेचा तार तुटणे या धोक्यापासून मुक्ती मिळते.
  • मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सर्वसाधारण कॅटेगिरी च्या शेतकऱ्यांना 10% टक्के रक्कम भरावे लागते आणि 90% रक्कम सरकार अनुदान म्हणून देत आहे.
  • आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती एससी /एसटी या कॅटेगिरीतील शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरावे लागते. आणि उर्वरित 95 टक्के रक्कम अनुदान राज्य सरकार आणि केंद्र सरकार देत आहे.
  • मागेल त्याला स्वर कृषी पंप योजना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेती क्षेत्रानुसार 3HP, 5HPआणि 7Hp अशा क्षमतेचे सौर पंप दिले जात आहे.
  • जर तुमच्या सरपंपामध्ये काही बिघाड झाल्यास खराब झाल्यास पाच वर्षापर्यंत तुम्हाला हे पंप दुरुस्ती करून मिळणार आहे. पाच वर्षाचा इन्शुरन्स सह तुम्हाला हे मिळणार आहे.
  • सौर कृषी पंप बसवल्यानंतर तुम्हाला विज बिल मिळणार नाही. लोड-शेडिंगची (Load Shedding ) चिंता नाही.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: या योजनेसाठी लागणारे नियम आणि निकष काय?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यासाठी लागणारे नियम आणि निकष काय असणार आहे सविस्तरपणे आपण खाली बघणार आहोत.

  • 1. जर शेतकऱ्यांच्या नावावरती 2.5 एकर जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना 3HP एचपी पर्यंतचा Solar Panal सौर कृषी पंप मिळणार आहे.
  • 2. जर लाभार्थी शेतकऱ्यांकडे 2.5 एकर ते 5.1 एकर शेत जमीन असेल, तर त्या शेतकऱ्यांना 5HP एचपी अश्व क्षमतेचा पर्यंतचा सौर कृषी पंप मिळणार आहे.
  • 3. ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर ते पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना 7.5HP एचपी अश्व क्षमतेचा सौर कृषी पंप मिळणार आहे.
  • 4. या योजनेमध्ये लाभ घेणारे व्यक्ती ज्या शेतकऱ्यांकडे सामूहिक शेततळे, विहीर, बोरवेल अशा पाण्याचा साठा, बारमाही वाहणाऱ्या नद्या असेल तर त्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना मिळणार आहे.
  • 5. या अगोदर काढण्यात येणाऱ्या सौर कृषी पंप योजना उदाहरणार्थ: अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना – 2, आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न मिळालेले शेतकरी या योजनेत अर्ज करू शकतात.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत अपलोड करावी.

1. शेतकऱ्यांचा शेत जमिनीचा सातबारा (7/12 ), त्याचबरोबर पाण्याचा स्रोत नोंद असलेली विहीर,शेततळे बोरववेल आवश्यक आहे.
2. आधार कार्ड (Adhar Card)
3. जात प्रमाणपत्र (Cast Certificate) आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय  एससी/ एसटी जाती जमातीसाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
4. अर्ज करणारा शेतकरी यांची जर स्वतःच्या नावावर जमीन नसेल तर इतर हिस्सेदारांचा ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे.
5. पाण्याचा साठा हा डार्क झोन मध्ये असल्यास भू- जल विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
6. बँकेचे पासबुक .
7. पासपोर्ट आकाराचा फोटो.
8. मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज कुठे आणि कसा करावा ?

1. महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत कंपनी यांच्या अधिकृत वेबसाईटला https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/faq_mr.php भेट द्या.
2. यांच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर उजवीकडे मागेल त्यांना सौर कृषी पंप योजना हे तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
3. या ठिकाणी क्लिक आल्यानंतर तुमच्या पुढे आणखी एक नवीन पेज ओपन होईल, त्या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला अर्ज कोणत्या भाषांमध्ये भरायचा आहे. ते तुम्हाला भाषा निवडून घ्यायचे आहे मराठी किंवा इंग्लिश असा पर्याय असेल.
4. या ठिकाणी आल्यानंतर लाभार्थी सुविधा या पर्यावरण क्लिक करून घ्या.
5. या ठिकाणी आल्यानंतर मागेल त्यांना सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म ओपन होईल, त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर आणि अचूकपणे माहिती भरायचे आहे. आणि अर्जामध्ये आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: अर्ज केल्यानंतर अर्जाची माहिती कशी मिळेल ?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या मोबाईल वरती एक मेसेज येईल. सध्या अर्जाची स्थिती काय आहे. ही माहिती तुम्हाला मोबाईल एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. याव्यतिरिक्त देखील अर्जदार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज स्थिति काय आहे जाणून घेऊ शकतो.

Leave a Comment