Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana 2025: भारत सरकार हे नागरिकांच्या भल्यासाठी नवीन नवीन योजना राबवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामधील ही एक योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वाची आहे. राज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये बांधकाम कामगार कार्यरत आहे. बांधकाम कामगार हे आपल्या घरापासून दूर राहून पावसामध्ये, उन्हामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ,सातत्याने काम करत असतात. बांधकाम कामगाराला पुरेसा पगार मिळत नाही त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही गरीब असते. त्यामुळे त्यांना स्वतःचे कुटुंब सांभाळण्यासाठी व त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. तसेच कामगारांकडून स्वतःची सेफ्टी घेण्यासाठी सेफ्टी किट नसते त्यामुळे त्यांना अनेक वाईट अपघाताचा सामना करावा लागतो.
सेफ्टी किट नसल्यामुळे कधी कधी त्यांचा अपघात होऊन ते जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यूही होऊ शकतो का मग त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे बांधकाम कामगाराचा विचार करून सरकारने बांधकाम कामगारांसाठी 1 मे 2011 रोजी बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. खालील लेखांमध्ये बांधकाम कामगार योजना ही कुणी चालू केली, यासाठी कोण पात्र असणार आहे ,या योजनेचा अर्ज कसा करायचा ,याची सविस्तर माहिती दिलेली आहे. जेणेकरून ही माहिती वाचून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.
Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana 2025
योजनेचे नाव | महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना |
---|---|
चालू होणारे केंद्र | राज्य सरकार |
पात्रता | बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत नागरिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | mahabocw.in |
वय मर्यादा | 18-60 वर्ष |
Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana: महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना काय आहे?
महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना ही राज्य शासनाने चालू केलेली सरकारी योजना आहे. ही योजना मुख्यत बांधकामामध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांसाठी आहे. महाराष्ट्र मधले बांधकाम कामगार हे त्याच्यामध्ये पायाभूत सर्व सुविधांच्या त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण ते रस्ते ,इमारती पूल ,आणि अनेक बांधकाम प्रोजेक्ट प्रकल्पावर काम करतात. काम अतिशय कठीण आणि धोकादायक असू शकते.
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांमध्ये अनेकदा स्त्रियांचा सुद्धा समावेश असतो. नागरिक विविध ठिकाणाहून येतात काही वेळा तर ते गावाकडून स्थलांतर होऊन येतात. बांधकाम कामगारात कार्यरत असलेल्या नागरिकांना अनेकदा कमी पगार आणि असुरक्षित असा सामना करावा लागतो यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. सरकारने बांधकाम कामगाराच्या भल्यासाठी कल्याण वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या संस्थाचा समावेश आहे. या कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध बांधकाम कामगार नागरिकाची नोंद केली जाते तसेच त्यांना शैक्षणिक, सामाजिक ,आरोग्य विषयी तसेच त्यांना आर्थिक सुविधा सुद्धा लाभ दिला जातो.
Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana: महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे मुख्य उद्दिष्ट?
- महाराष्ट्र मध्ये बांधकाम कामगार योजना मंडळाचा महत्वाचे उद्दिष्ट असे आहे की या योजनेच्या माध्यमातून इमारत आणि बांधकाम कामगारांना सुरक्षा,आरोग्य आणि इतर कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देणे.
- कामगारांसाठी कामाची नवीन संधी उपलब्ध करणे.
- रोजगार आणि रोजगाराची संधी अधिक प्रमाणात वाढवणे.
- बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून अधिक प्रमाणात माहिती गोळा करणे.
- धोकादायक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकणे आणि प्रक्रिया, श्रम कागदाच्या अंबलबजावणीस बळकट करण. कौशल्य ,विकास आणि रोजगाराच्या सेवांचा प्रचार करणे.
- सामाजिक सुरक्षा कल्याणकारी उपायासाठी कार्य करणे.
- बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या कामगारांना शिक्षण ,आरोग्य आणि इतर कल्याणकारी योजनेचा लाभ देणे.
Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana: महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे फायदे?
बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांना अनेक फायदे होणार आहे ते खालील प्रमाणे आहे
1. आरोग्य आणि सुरक्षितता: बांधकाम कामगारांना सुरक्षितता त्याचबरोबर त्यांची वेळेवर आरोग्य तपासणी करणे, अपघात झाल्यास संरक्षण करणे आणि स्वच्छता सुविधा देणे.
2. आर्थिक लाभ: बांधकाम कामगारांना पेंनशन, योजना विमा योजना, आणि अन्य आर्थिक लाभ मिळवून देणे. ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षा राहू शकते.
3. शिक्षण: कामगारांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्यामध्ये सुधारणा करणे हा एक मोठा फायदा कामगारांना होणार आहे.
4. कपडे आणि अन्न वेळेवर देणे: या योजनेमुळे कामगारांना कपडे यांना पसरवणारा हे वेळेवर ठेवून त्यांच्या जीवनमान सुधारण.
5. महिला व मुलींसाठी योजना: महिलांसाठी आणि मुलींसाठी विशेष सुरक्षा, सुविधा, कार्यशाळेवर सुरक्षा आणि त्यांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रोत्साहन देणे.
Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana: आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. ईमेल
5. आयडी मोबाईल नंबर
6. पत्ता प्रमाणपत्र (address proof , voter ID,electrical bill)
7. पासपोर्ट आकाराचे 3फोटो
8. काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
9. नोंदनी अर्ज
10. बँक पासबुक
11. जन्मदाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला
12. बांधकाम कामगाराचे 90दिवस किंवा काम केले ला दाखला (इंजिनीयर किंवा ठेकेदार)
13. बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेविका किंवा ग्रामपंचायत मधून घेणे
14. घोषणापत्र
Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana: महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्रता?
1. 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार.
2. लाभ घेणारे व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
3. मागील वर्षांमध्ये 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले नागरिक, या योजनेसाठी पात्र असतील.
4. बांधकाम कामगार या योजनेसाठी लागणारी नोंदणीची एक रुपया असणार आहे.
Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana: बांधकाम कामगार या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ
1. शैक्षणिक मदत: कामगार व्यक्तीला त्याच्या मुलासाठी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळते. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षणासाठी 2,500 ते 10,000 रुपये मिळते. इंजीनियरिंग आणि मेडिकलच्या उच्च शिक्षणासाठी साठ हजार ते एक लाख दिले जाते.
2. आरोग्यासाठी सुरक्षा: शस्त्रक्रियासाठी 20,000 कृपया आर्थिक मदत मिळते आणि गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी देखील आर्थिक एक लाख रुपये आर्थिक साहाय्य मिळते.
3. सामाजिक सुरक्षा: विवाहासाठी आर्थिक सहाय्य तीस हजार रुपये मिळते, अपघाती विमा देखील यामध्ये मिळतो त्यासाठी दोन लाख रुपये मिळतात. त्याचबरोबर प्रधानमंत्री मानधन योजनेचा देखील यामध्ये फायदा मिळतो.
4. आर्थिक सहाय्य: बांधकाम कामगारांसठी घर बांधणी साठी कर्ज मिळते, साहित्य खरेदी करण्यासाठी देखील सहाय्य मिळते ₹500 आणि आपत्ती /अपंगत्वासाठी सहाय्य मिळते.
कौशल्य विकास: कौशल्य विकास मंडळच्या मार्फत प्रशिक्षण मिळते. आणि रोजगाराच संधी उपलब्ध होते.
Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana: महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचा अर्ज कसा करावा?
1. महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार यांच्या अधिकृत वेबसाईटला https://mahabocw.in/ भेट द्या.
2. या ठिकाणी आल्यानंतर “Worker Registration” या पर्यावरती क्लिक करा.
3. येथे आल्यानंतर मोबाईल नंबर, आधार क्रमांक, जिल्हा ही सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा आणि “Proceed” बटनावर क्लिक करा .
4. त्यानंतर स्वतःची माहिती व्यवस्थितपणे फॉर्म मध्ये भरून घ्या. बँकेचे माहिती त्याबरोबर 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र भरा.
5. त्यानंतर फॉर्म मध्ये आवश्यकते कागदपत्रे आधार कार्ड, फोटो, रहिवासी प्रमाणपत्र अशी आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
निष्कर्ष: महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र कामगार इमारत योजनेमार्फत कामगारांना आर्थिक सहाय्याच्या सुविधा मिळावा म्हणून योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये कामगारांसाठी शैक्षणिक, आरोग्य, सुरक्षा, या योजनेचा समावेश आहे. या योजनेचे अधिक माहिती मिळवायची असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्या.