MPSC Exam Update 2025: एमपीएससी परीक्षा आता यूपीएससी प्रमाणे होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या घोषणा

Mpsc Exam Update 2025: यूपीएससी प्रमाणे एमपीएससीचे देखील कॅलेंडर असावे असे देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच यावर्षी एमपीएससी परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपाची घेतली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले खालील लेखांमध्ये सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.

Mpsc Exam Update 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र मध्ये एमपीएससी मार्फत तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशा प्रकारचे अनेक पद भरले जातात. मात्र एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोज पाहायला मिळत आहे. एमपीएससी मध्ये विद्यार्थ्यांना सिलेक्शन होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यामध्ये विद्यार्थी निराश होतात. त्यामुळे त्यांना आंदोलने करावी लागतात. एमपीएससी मध्ये ऑर्डर मिळण्यासाठी खूप वेळ लागतो असे देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. त्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा ऑर्डर मिळत नाही. असे अनेक प्रकारचे प्रश्न एमपीएससी  विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागतात.

त्यामुळे राज्यातील एमपीएससी संदर्भात आमदार शिवाजीराव गरजे यांच्याकडून राज्यात चालू असलेल्या विधानसभा परिषद मध्ये प्रश्न विचारण्यात आला. तर त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे.

हे ही वाचा :: MPSC Prelims Notification Update 2025: एमपीएससी 2025 च्या पूर्व परीक्षेचे जाहीर प्रसिद्ध! यामध्ये 385 जागा भरल्या जाणार जाणून घ्या संपूर्ण जाहिरात

Mpsc Exam Update: एमपीएससी संदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

येणाऱ्या पुढील काळामध्ये एमपीएससीच्या देखील जाग्या भरल्या जाणार आहे असं देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. एमपीएससीच्या परीक्षा या यूपीएससी परीक्षा सारख्या होणार आहे असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे. तसेच यूपीएससीच्या प्रमाणे एमपीएससीचे देखील कॅलेंडर असणार आहे असे देखील म्हटले आहे.

यूपीएससीच्या प्रमाणे एमपीएससीचे देखील कॅलेंडर असावे असा आपला प्रयत्न असणार आहे असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटल आहे. तसेच एमपीएससीच्या परीक्षा या वर्षापासून वर्णनात्मक स्वरूपामध्ये घेतल्या जाणार आहे. अर्थातच या परीक्षेला काही जणांचा विरोध आहे मात्र आपण यावर लक्ष देणार नाही. अशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केले आहे.

Mpsc मार्फत काढण्यात येणारा एका जागेची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता पुढील दोन जागा साठी देखील आपण ऍड करणार आहोत असे देखील म्हटले आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे. दरम्यान दोन दिवसा अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिला आहे.

Mpsc एमपीएससीच्या संदर्भात आमदार विक्रम काळे काय म्हणाले?

एमपीएससी मध्ये मनुष्यबळ कमी असल्यास आणि त्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा. पोस्टिंग मिळत नाही . त्या समस्याला देखील विद्यार्थ्यांना सामोरे जावा लागतात. आणि नोकरी मिळून सुद्धा त्यामध्ये काही व्यवहार होतात असा आरोप देखील सभागृहामध्ये आमदार विक्रम काळे यांनी केला आहे. त्यावर देखील राज्याचे मुख्यमंत्री यांनी उत्तर दिला आहे.

Mpsc Exam: भविष्यामध्ये एमपीएससी मार्फत मोठी पदे भरले जाणार

तसे देखील आता एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल आला आहे. आणि आपण यापुढे देखील वेगाने काम करू असं देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Mpsc Exam: मराठीमध्ये होणार एमपीएससीची परीक्षा

राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विभागातले ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या इंग्लिश मध्ये घेतल्या जातात मात्र आता पुढे यामध्ये बदल होणार आहे. आणि ह्या सर्व परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जाणार आहे. असे देखील माहिती आपल्याला मिळत आहे.

अभियांत्रिकी परीक्षा साठी जे पुस्तके आहे तर ते सर्व पुस्तके इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे. मात्र याचे पुस्तके मराठीमध्ये नसल्यास या समस्या विद्यार्थ्यांना येत होत्या.मात्र आता अभियांत्रिकी परीक्षा ह्या मराठीमध्ये घेतल्या जाणार आहे असे देखील माहिती मिळत आहे.

आणि अभियांत्रिकीचे पुस्तके देखील उपलब्ध करून दिले जातील याची माहिती देखील सांगण्यात आले आहे. आणि या व्यतिरिक्त इतर तांत्रिकी पदाच्या परीक्षा देखील मराठीमध्ये होणार आहे.

Mpsc च्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रामध्ये काय लिहिले?

महाराष्ट्र राज्यातील एमपीएससी मार्फत उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि उपनिरीक्षक अशा पदासाठी नियुक्त केल्या जातात. तर त्यासाठी एमपीएससी मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य यामध्ये रिक्त पद आहे. मंजूर असलेल्या पाच पदांपैकी दोन पदे ही भरले गेले आहे आणि तीन पदे ही रिक्त आहेत.

या तीन रिक्त पदा असल्यामुळे आयोगातील मंडळाचे कामकाजावर विपरीत परिणाम होत असून परीक्षा ही लांबणीवर जात आहे. यामध्ये मुलाखत आणि निकालाची प्रक्रिया देखील रखडली जात आहे. त्यामुळे रिक्त असलेले पदे तातडीने भरावे ही मागणी शिक्षक पालक आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.

तर या मागण्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तर एमपीएससी मधील तीन रखडलेल्या रिक्त पदाची भरती करण्यात यावी असे पत्रामध्ये लिहिला आहे.

Leave a Comment