Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका भरती विविध पदाच्या 620 जागा भरल्या जात आहे. असा करा अर्ज

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी (NMMC) नवी मुंबई महानगरपालिका 620 रिक्त पदाकरिता मेगा भरती करण्यात आले आहे. यामध्ये गट- क आणि गट- ड पदाकरिता 620 पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती? पात्रता काय ?याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका भरती  

NMMC नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गट- क आणि गट पदाकरिता 620 पदाकरिता ही भरती काढण्यात आली आहे. यामध्ये पदे हे प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त उद्यान आणि सार्वजनिक आरोग्य अशा प्रकारचे पदे यामध्ये समाविष्ट आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या भरतीसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावा लागेल.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti last date: नवी मुंबई महानगरपालिकेसाठी अर्ज करण्याच्या तारखा

नवी मुंबई महानगरपालिकेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 28 /03/2025 पासून अर्ज सुरू करण्यात आलेले आहे आणि शेवटची तारीख ही 11/05/2025  पर्यंत असणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे.

  • अर्ज करण्याची तारीख – 28/03/2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11/05/2025
  • अर्जाची शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 11/05/2025
  • परीक्षेच्या वेळापत्रक मिळण्याची तारीख – परीक्षेच्या सात दिवस अगोदर वेळापत्रक मिळेल
  • अधिकृत वेबसाईट- नवी मुंबई महानगरपालिका

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti Education Qualification: शैक्षणिक पात्रता

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदासाठी 620 रिक्त जागा काढण्यात आले आहे. यामध्ये विविध पदाच्या जागा असल्यामुळे जाहिरात मध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे वाचून घ्या नंतरच ऑनलाईन अर्ज करा.

वयोमर्यादा:

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्जाचा शुल्क:

नवी मुंबई महानगरपालिकेत इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल ती किती लागणार आहे. ती सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 रुपये फी लागणार आहे. तसेच मागासवर्गीय एसटी/एसटी आणि अनाथ  या उमेदवाराला 900 रुपये फी लागणार आहे.

तर महानगरपालिकेच्या परीक्षेच्या तारखा वेळ प्रवेश वेळापत्रकावरती जाहीर केल्या जाईल. आणि संभाव्य वेळा बदलल्या बाबत महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध केले जाईल. अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti apply Form: या भरतीसाठी अर्ज कसा करावे ?

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावा लागेल.
  • 2. या ठिकाणी आल्यानतर संपूर्ण जाहिरात पहिले वाचून घ्या त्यानंतर अर्ज करायचा आहे .
  • 3. यामध्ये विविध प्रकारच्या पदासाठी भरती करण्यात आले आहे तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात ते आधी बघून घ्या.
  • 4. ज्या पदासाठी तुम्ही पात्र हाल त्या पदा ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे.
  • 5. त्यानंतर स्वतःची माहिती या फॉर्ममध्ये सविस्तरपणे भरून घ्यायचे आहे.
  • 6. सर्व माहिती भरल्यानंतर महत्त्वाचे कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे.
  • 7. हे सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म हा परत चेक करून घ्यायचा आणि सबमिट बटन वर क्लिक करायचा आहे.
  • 8. त्यानंतर अर्जाचा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • 9. अर्जाचा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक पोज पावती दिली जाते ती तुम्हाला चांगली जपून ठेवायचे आहे. भविष्यात तुम्हाला ती रिसिप्ट कामे येणार आहे.

Leave a Comment