Nondani Mudrank bharti -2025: नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये 284 पदासाठी काढण्यात आली आहे भरती

Nondani Mudrank bharti -2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी सुवर्णसंधी. महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक यांच्या विभागामार्फत शिपाई (गट ड) 284 पदासाठी भरती करण्यात आले आहे. ही भरती पुणे या ठिकाणी काढण्यात आली आहे. या भरतीची अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. त्यासाठी कोणते शैक्षणिक पात्रता असणार आहे? कोणते डॉक्युमेंट लागणार आहे? याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Nondani Mudrank bharti -2025: महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड पदाकरिता भरती

महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत शिपाई गट क पदासाठी 285 जागा काढण्यात आले आहे. इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/ या वेबसाईट वरती अर्ज करता येणार आहे. 22/04/2025 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू झाला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागात मार्फत काढण्यात आलेली मूळ जाहिरात या https://rfd.maharashtra.gov.in/ ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन बघू शकता.

Nondani Mudrank bharti -2025 भरती करणारा विभाग:

महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्यामार्फत पुणे या ठिकाणी शिपाई गट ड या पदासाठी वरती काढण्यात आले आहे. यामध्ये एकूण 285 पदे असणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक या विभागामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक माध्यमिक शालांत परीक्षा 10th (SSC) दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • 1. आधार कार्ड
  • 2. दहावीचे मार्कशीट
  • 3. दहावीची सनद
  • 4. दहावीची टीसी
  • 5. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
  • 6. सही (स्कॅन करून ठेवावी)

अर्ज प्रक्रिया :

महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट या ठिकाणी https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/ जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक:

नोंदणी व मुद्रांक या भरतीसाठी अर्ज करण्याचा दिनांक 22/04/2025 पासून सुरू झालेला आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 10/05/2025 पर्यंत असणार आहे.

परीक्षा शुल्क:

नोंदणी व मुद्रांक शिपाई गट क पदासाठी (खुल्या प्रवर्गातील) सर्वसाधारण कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना 1000 रुपये फी लागणार आहे. आणि राखीव प्रवर्गातील उमेदवाराला 900 रुपये फी आकारली जाणार आहे.या परीक्षेचा शुल्क हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

पगार:

महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक शिपाई गट ड या पदासाठी साधारणपणे पगार हा 15000 ते 46 हजार 600 इतका पगार असेल. त्याचबरोबर महागाई भत्ता देखील त्यामध्ये दिला जाणार आहे.

भरतीच्या अधिकृत वेबसाईट:

  • 1. मूळ जाहिरात बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/ या ठिकाणी क्लिक करा
  • 2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://rfd.maharashtra.gov.in/ या ठिकाणी क्लिक करा.

निष्कर्ष: महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक यांच्यामार्फत शिपाई गट ड पदासाठी पुणे या जिल्ह्यामध्ये भरती काढण्यात आली आहे . यामध्ये एकूण रिक्त पदे हे 285 असणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या येत आहे अर्ज करण्याची दिनांक हा 22/04/2025 पासून सुरू झालेला आहे आणि अंतिम दिनांक हा 10/5/2025 पर्यंत असणार आहे.

Leave a Comment