PM Annapura Yojana: महिलांसाठी खुशखबर! आता वर्षात ३ मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार का? चेक करा

PM Annapurna Yojana: महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांसाठी खुशखबर! आता त्यांना घर खर्चाला हातभार लागावा आणि धुरकट चुलीमुळे होणारे आरोग्याचे प्रश्न कमी व्हावेत यासाठी आता राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत महिलांना वर्षात 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. या योजनेचे नाव “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना”आहे.

या योजनेमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शहरी भागातील महिलांचे जीवनमान नक्कीच सुधारेल. तुम्हीही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे आपण खालील लेखांमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे तुम्हीही हा लेख शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून या योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळेल.

हे ही वाचा :: Mohabbat Bhandi sanch: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! मोफत भांडीसंच मिळवा घरबसल्या      

PM Annapurna Yojana: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे काय?

  • मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे.
  • अन्नपूर्णा योजना ही माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही लागू होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षातून तीन वेळेस मोफत गॅस सिलेंडर दिले जाईल.
  • सध्या या योजनेचा पहिला टप्पा यवतमाळ जिल्ह्यात सुरू झाला आहे. 1540 महिलांची यादी तयार झाली आहे आणि लवकरच त्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वाटप सुद्धा केले जाणार आहे.

PM Annapurna Yojana: या योजनेसाठी निकष आणि पात्रता काय आहेत?

अन्नपूर्णा या योजनेसाठी सरकारने काही नियम आणि अटी सांगितले आहे त्या अटी आणि नियमाचे पालन करणाऱ्या महिलांना मोफत सिलेंडर मिळतील त्या खालील प्रमाणे आहेत.

  • अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असाव
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावे
  • गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असावे
  • बँक खाते आधार आणि मोबाईल नंबर ची जोडलेल्या असणे खूप महत्त्वाचे आहे.
  • सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

PM Annapura Yojana योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड 
  • गॅस कनेक्शन पासबुक महिलेच्या नावावर 3.उत्पन्नाचा दाखला 
  • मोबाईल नंबर 
  • बँक पासबुक

हे ही वाचा ::  Post Office RD Yojana 2025:फक्त 12,000 रुपये दरमहा भरा आणि 5 वर्षांत मिळवा तब्बल ₹8,56,388👇👇👇     

PM Annapurna Yojana: अर्ज प्रक्रिया

अन्नपूर्णा या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन केव्हा ऑनलाईन कसा करायचा याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही त्यामुळे अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या स्थानिक जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Leave a Comment