Pm Awas Yojana 2025: प्रधानमंत्री आवास योजनेत नियम आणि अटी मध्ये बदल, आता या योजनेत मिळणार 1 लाख 50 हजार रुपये

Pm Awas Yojana 2025: प्रधानमंत्री पीएम आवास योजना ही एक सरकारी योजना आहे. ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे मेन उद्दिष्ट म्हणजे गरिबाला स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देणे. गरिबाला स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सरकारकडून 1,50,000 आर्थिक मदत दिली जाणार आहे. यापूर्वी ही रक्कम 1,30,000 इतकी होती पण सरकारने रकमेमध्ये सुद्धा बदल केले आहेत.

प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं गावाकडं किंवा शहरी भागात एक स्वतःचे घर पाहिजे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला हक्काचा निवारा असावा. परंतु सगळ्यांनाच स्वतःचे घर बांधणे शक्य नसते. क्या मागे नागरिकाचे विविध कारणे असतात त्यामधलं प्रमुख कारण म्हणजे आर्थिक अडचणी. या सर्व समस्यांचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम आवास योजना ( PMAY ) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार जे लोक गरीब दारिद्र्यरेषेखाली आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहेत अशा लोकांना हक्काचे घर बांधण्यास आर्थिक मदत देणार आहे. सध्या प्रधानमंत्री आवास योजनेची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे सतत माहिती मिळणारे नागरिक स्वतःहून फॉर्म भरू शकतात किंवा मल्टी सर्विस वर जाऊन फॉर्म भरू शकतात.

नागरिकाला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाहीत कारण या योजनेमध्ये सरकार  मार्फत अनेक बदल केले जात आहे. नियमात बदल करण्याचे सरकारचे महत्त्वाचे कारण म्हणजे अपात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू नये. कारण अनेक वेळा अपात्र व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेतात. अशा परिस्थितीमध्ये या योजनेचा लाभ फक्त गरजू व्यक्तीला आणि पात्र व्यक्तीला मिळावा. यासाठी या योजनेत नवनवीन नियम लागू करत आहे सरकार. खालील लेखांमध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या योजनेमध्ये सरकारने कोणकोणते बदल केले कोणकोणत्या अटी आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

Pm Awas Yojana 2025: PMAY प्रधानमंत्री आवास योजना

योजनेचे नावपीएम आवास योजना (PMAY)
योजना चालू करणारे केंद्रभारत सरकार (ग्रामीण – MoRD, शहरी – MoHUA)
योजना कधी सुरू झाली01 एप्रिल 2016
योजनेत पात्र लाभार्थीग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक
योजनेत मिळणारा लाभ1 लाख 50 हजार रुपये
अधिकृत वेबसाईटpmaymis.gov.in

हे ही वाचा :: Lic Bima Sakhi Yojana 2025: लाडकी बहीण नंतर राज्यात नवीन योजना सुरू ‘विमा सखी’ योजना काय? अटी काय? योजनेत किती पैसे मिळणार

Pm Awas Yojana 2025: योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

एम आवास योजनेचा Pm Awas Yojana फॉर्म भरणे अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे ही योजना शहरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्हीकडे पण सुरू आहे. आणि दोन्ही नियम निश्चित केले आहेत जे नागरिक नियम लक्षात ठेवतील आणि नियमाचे पालन करतील अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल. आणि जे नागरिक नियमाचे पालन करणार नाही अशा नागरिकांना या योजनेतून वगळल्या जाईल. आणि त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर लवकरच भारत सरकार करून पात्र नागरिकाला लाभ दिला जाईल. परंतु सर्वप्रथम घर पडताळणीसाठी निवडलेल्या कर्मचाऱ्याला पाठवले जाईल, त्यानंतर या योजनेसाठी पात्र ठरलेल्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषा खालील कुटुंबांना होणार आहे जेणेकरून त्यांना स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत होईल .

PMAY पीएम आवास योजनेचा लाभ कोणत्या नागरिकाला दिला जाणार नाही?

1. पीएम आवास योजनेचा Pm Awas Yojana लाभ अशा नागरिकांना मिळणार नाही जे नागरिक व्यवसाय कर आणि आयकर भरतात अशा नागरिकांना या योजनेतून वगळण्यात येईल.
2. जर कुटुंबाततील कोणत्याही सदस्याची सरकारी नोकरी असेल तर अशा कुटुंबांना या योजनेतून काढून टाकले जाईल त्यांना या योजनेचा लाभ घेतल्या जाणार नाही
3. नागरिकाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि जे नागरिक स्वतः कायमस्वरूपी घर बांधू शकतात अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
4. ज्या शेतकऱ्याकड अडीच एकर पेक्षा जास्त शेती आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Pm Awas Yojana 2025: अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती?

प्रधानमंत्री आवास योजनेची अर्ज भरण्याची तारीख ग्रामीण साठी निश्चित केली आहे सरकारने, आणि निश्चित केलेली तारीख ही 31 मार्च आहे. विभागाने सर्व नागरिकांना 31 मार्च अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची सांगितले आहे. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवून तुम्ही तुमचा अर्ज लवकरात लवकर भरून घ्या. वेळेवर अर्ज केल्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि या योजनेचा सहजपणे लाभ मिळेल.

PMAY पीएम आवास योजना 2025: मंत्री आवास योजनेचा अर्ज करण्याच्या पद्धती

1. प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे नागरिक आपल्या स्मार्टफोन द्वारे अर्ज करू शकतात.
2. दुसरा मार्ग म्हणजे कोणत्याही सामान्य केंद्रात जाणे आणि तेथून अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे.
3. या पद्धती व्यतिरिक्त अजून एक पद्धत आहे ती म्हणजे ग्रामपंचायत सरपंचाकडे जाऊन अर्ज करणे. तुम्ही पीएम आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत सरपंचाकडे जाऊन यशस्वीरित्या अर्ज करू शकतात.

Pm Awas Yojana (PMAY) पीएम आवास योजना 2025: लाभार्थ्याची यादी

प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आवश्यक कामे पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर जे नागरिक पात्र असतील अशा नागरिकांची नावे अधिकृत वेबसाईट लाभार्थी यादी मध्ये प्रसिद्ध केले जाईल. आणि ज्या नागरिकांची नावे लाभार्थी यादीत आहे अशाच नागरिकांना पीएम आवास योजनेचा लाभ दिला जाईल असा सरकारचा निर्णय आहे.

अशा परिस्थितीमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करा न्याव्यतिरिक्त भविष्यात जेव्हा या योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थी यादी जाहीर केली जाईल. तेव्हा अधिकृत वेबसाईटवर जा आणि तिथून लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव चेक करा. आणि जर लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला कळेल की या योजनेचा लाभ शेवटी नक्की तुम्हालाच मिळेल.

Pm Awas Yojana पीएम आवास योजना 2025: या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • 1. सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना यांच्या अधिकृत वेबसाईटला https://pmaymis.gov.in/ भेट द्यायचे आहे.
  • 2. वेबसाईटवर आल्यानंतर “हाउसिंग पल्स सव्ह” या पर्यायावर क्लिक करा.
  • 3. त्यानंतर तुम्हाला PMAY 2.0 त्यासाठी अर्ज करा या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
  • 4. त्यानंतर फॉर्ममध्ये दिलेल्या सूचना सविस्तरपणे वाचून घ्यायचे आहे.
  • 5. अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या वार्षिक उत्पन्न आणि त्याचबरोबर इतर आवश्यकता कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • 6. त्यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये बारा अंकी आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे त्याबरोबर आधार कार्ड अपलोड करायचे आहे.
  • 7. पीएम आवास योजना हा फॉर्म भरताना तुमचे नाव,उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँकेचा तपशील,अशा प्रकारचे आवश्यकता माहिती सविस्तरपणे भरून घ्यायची आहे.
  • 8. हे सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा आणि खाली तुम्हाला कॅपच्या सुद्धा टाकावं लागणार आहे.तो टाकून घ्या.
  • 9. हा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला भविष्यामध्ये फॉर्म भरलेली रिसिप्ट तुम्हाला त्यामधून डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यायचे आहे.

निष्कर्ष: केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येणारी प्रधानमंत्री आवास योजना, Pm Awas Yojana या योजनेमध्ये गरीब कुटुंबांना स्वतःचे आणि  हक्काचे घर बांधण्याची सुविधा उपलब्ध करून दिले जाते. या अगोदर प्रधानमंत्री आवास योजना मध्ये सरकार एक लाख तीस हजार रुपये देत होते पण आता यामध्ये बदल करून आता या योजनेमध्ये सरकार 1 लाख 50 हजार रुपयाची आर्थिक मदत करते. आणि 2025 मध्ये या योजनेत नियम आणि अटी देखील बदलण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment