Pm Kisan Yojana 2025: पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार ? जाणून घ्या सविस्तर

Pm Kisan Yojana 2025 पी एम किसान सन्मान निधी योजना: ही भारत सरकारचे प्रमुख योजना आहे. ही योजना केंद्र सरकार द्वारे चालवण्यात येत आहे. प्रधानमंत्री सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना  तीन समान हफ्ते 6,000 दिले जातात.  शेतकऱ्यांच्या हप्त्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. पी एम समा निधी योजनेचा अठरावा हप्ता हा 5 ऑक्टोंबर 2024 ला सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. 19 हपत्याची प्रतीक्षा करोडो शेतकऱ्यांना आहे. सर्व शेतकऱ्यांचे लक्ष 19 व्या हप्त्याकडे लागलेले आहे.चला तर जाणून घेऊया 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार

Pm Kisan Yojana पी एम किसान सन्मान निधी योजना काय आहे ?

प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील गरीब शेतकऱ्यांना आणि अल्पभूधारक  शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली  जाणार आहे. पीएम समान निधी योजना अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचे 3 समान  ह्पतयामधे प्रत्येक वर्षी 6,000 दिले जातात. हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. पीएम समान निधी योजनेचा  अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 ला जमा करण्यात आला होता.

आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष याकडे आहेत 19 हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार. एकोणावीसव्या हाताचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे परंतु सरकारने आतापर्यंत याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. पीएम समा निधी योजनेचे हप्ते हे दर वर्षांमध्ये दर चार महिन्याला दिले जातात. प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारचा 14.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा उद्देश आहे. पी एम किसान सन्मानिधी योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी काही अटी लागू केले आहे सरकारने. आतापर्यंत 11.71 कोटी शेतकऱ्यांच्या नोंदणी झाल्या आहेत.

Pm Kisan Yojana पी एम किसान  सन्मान निधी योजनेचे फायदे ?

  • गरजू आणि दुर्बल शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा फायदा होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहे.
  • एका वर्षामध्ये दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जाणार आहे.
  • गरीब कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत म्हणून हे रक्कम दिली जाणार आहे.
  • एका वर्षांमध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकार देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)

योजनेचे नावप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN)
योजना चालवणाराकेंद्र सरकार
योजना सुरू करण्याची तारीख1 डिसेंबर 2018
उद्देशगरीब आणि अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे
पात्रतादोन हेक्टर शेत जमीन असलेले शेतकरी आणि कष्टकरी शेतकरी
पात्र रक्कम₹6000 दरवर्ष
भरणा वारंवारतातीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येक हप्ता ₹2000)
पैसे येण्याची पद्धतथेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये
अंमलबजावणीकेंद्र सरकार आणि कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून
अर्ज प्रक्रियासामान्य सेवा केंद्र (CSCs) किंवा राज्य पोर्टलवर अर्ज करू शकता
अधिकृत वेबसाईटpmkisan.gov.in
योजना कव्हरेजभारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश
निधी वितरण₹6000 तीन हप्त्यांमध्ये, प्रत्येक हप्ता ₹2000

Pm Kisan Yojana पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी कोण पात्र आहे ?

1. गरीब आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.
2. ज्या शेतकरी कुटुंबाकडे शेती करण्यासाठी योग्य शेत जमीन आहे अशी कुटुंब प्रधानमंत्री निधी योजना साठी पात्र आहे.
3. अर्ज करणारा शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.

Pm Kisan Yojana पी एम किसान योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

1. आधार कार्ड (Aadhar card )
2. जमिनीचे कागदपत्रे सातबारा 7/12
3. बँकेची पासबुक झेरॉक्स
4. मोबाईल नंबर

PM Kisan Yojana: पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अर्ज कसा करायचा ?

पी एम किसान सन्माननिधी योजना हे अंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला ₹6,000 रक्कम दिली जाते. हा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. तो कसा करायचा सविस्तरपणे आपण बघणार आहोत.

1. सर्वप्रथम तुम्हाला google वरती जायचं आहे. आणि पीएम किसान सन्माननिधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला https://pmkisan.gov.in/ भेट द्या.

2. या वेबसाईटवर आल्यानंतर “फार्मर कॉर्नर” या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.

3. त्यानंतर तुम्हाला “New Farmer Registration” या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे.

4. या पर्याय वर क्लिक केल्यानंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकायचा आणि नंतर राज्य निवडून घ्यायचा आहे.

5. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो OTP टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे.

6. त्यानंतर पुढे फॉर्म वरची माहिती सविस्तरपणे भरून घ्यायची तुमचे नाव वडिलांचे नाव, जन्मतारीख ही माहिती बरोबर भरून घ्यायची आहे.

7. त्यानंतर शेतीचा सातबारा जमिनीच्या मालकीची माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे.

8. त्यानंतर तुम्हाला बँकेची माहिती बँक अकाउंट नंबर IFSC कोड बरोबर भरून घ्यायचा आहे.

9. त्यानंतर यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आधार कार्ड, बँकेची पासबुक झेरॉक्स, सातबारा उतारा हे कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे.

10. पी एम किसान योजनाचा फॉर्म भरत असतानी फॉर्ममध्ये सर्व माहिती बरोबर भरली आहे की नाही चेक करून घ्या. त्यानंतर “Submit” बटन वर क्लिक करायचा आहे.

11. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी क्रमांक मिळेल तो नोंदणी क्रमांक चांगला ठेवायचा आहे.

12. हे सर्व झाल्याच्या नंतर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला फार्मर कॉर्नर “Farmer Corner” या ठिकाणी जायचं आहे. येथे आल्यानंतर “Beneficiary Status” या ठिकाणी क्लिक करायचा आहे.

13. येथे आल्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी केलेला क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि अर्जाची स्थिती तपासायची.

Pm Kisan Yojana या पद्धतीने शेतकरी चेक करू शकतात पुढील हप्त्याचे स्टेटस

  • 1. सर्वात प्रथम पी एम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर pmkisan.gov.in जा.
  • 2. लाभार्थी स्टेटस चेक करण्यासाठी मेन पेजवर जा : मेन पेजवरन लाभार्थी स्टेटस वर क्लिक करा.
  • 3. तुमची माहिती भरा: तुमचा आधार क्रमांक ,बँक खाते क्रमांक , किंवा मोबाईल नंबर द्या.
  • 4. स्टेटस चेक करा: तुमची माहिती भरल्यानंतर submit बटन वर क्लिक करा, तुमच्या हप्ते ची स्थिती दाखवल्या जाईल.
  • 5. अशा रीतीने तुम्ही तुमच्या हप्त्याचे स्टेटस चेक करू शकता.

पी एम किसान योजना 19 व्या हप्त्याचे महत्त्व

1. 19व्या त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. फेब्रुवारी2025च्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणे ,ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या योजनेचा असा उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या खर्चावर निर्बंध न घालता आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम बनवणे. सरकार हे कृषी क्षेत्राला मजबूत बनवण्याचे काम करत असतं. ही योजना लहान आणि अल्पभूधारक करांच्या कल्याणासाठी आहे. पी एम किसान योजनेचा एकोणावीस व हप्ता म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे . यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते.

पी एम किसान सन्मान निधी योजना

योजनेचे नावपी एम किसान सन्मान निधी योजना
योजनेचे उद्दिष्टशेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने योजना सुरू केली आहे
PM किसान योजनादेशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे
आर्थिक लाभया योजनेत वर्षाला ₹6000 रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा केली जातात.
योजनेची अधिकृत वेबसाईटpmkisan.gov.in

निष्कर्ष: Pm Kisan Yojana पी एम किसान सन्मान योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना चालू केली आहे. या योजनेत आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकार वर्षाला ₹6000 रुपये रक्कम थेट खात्यात जमा करतात. पी एम किसान सन्माननिधी योजना चे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment