Pm Kisan Yojana 19th installment update: पी एम किसान योजनेचा 19 हप्ता कधी मिळणार? या योजनेत पात्र लाभार्थ्यांची यादी कशी तपासायची

Pm Kisan Yojana 19th installment update: पी एम किसान  योजना 2025: पी एम किसान योजना ही केंद्र  कृषी आणि ग्रामीण मंत्रालयाकडून चालण्यात आलेली योजना आहे. ही योजना केंद्र सरकारने भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक साह्यय मिळावा यासाठी राबविण्यात आलेली ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या शेतकऱ्याला सरकारकडून दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षातून तीन वेळेस, तीन टप्प्यात दिले जातात. 4 महिन्याला 2000 हजार त्याचप्रमाणे, सहा हजार रुपयाचे तीन हप्ते करून हे 6000 हजार रुपये शेतकऱ्याला दिले जातात. हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात DBT महाडीबीटी द्वारे जमा केले जातात.

आतापर्यंत शेतकऱ्याला याचे एकूण 18 हप्ते (36000) मिळालेले आहे. तर शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पडला आहे. लवकरच 19 वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये,19 वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. चला तर खालील लेखांमध्ये जाणून घेऊया 19 व्या हप्त्याची तारीख कोणती आहे 19 वा हप्ता कसा चेक करायचा. जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव चेक करता येईल यादीत तुमचं नाव आहे की नाही चला मग जाणून घेऊया.

Pm Kisan Yojana 2025

योजनेचे नावपी एम किसान योजना
सुरू करणारे केंद्रकेंद्र सरकार
उद्दिष्टगरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक साह्य
पात्रतादोन हेक्टर शेती असलेले शेतकरी
पात्र लाभ₹6000 दरवर्षी
येण्याची पद्धतमहाडीबीटी प्रणाली द्वारे डायरेक्ट करायचा खात्यामध्ये
अंमलबजावणीकेंद्र सरकार आणि कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटpmkisan.gov.in

हे ही वाचा :: Pm Kisan Yojana 2025: पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार ? जाणून घ्या सविस्तर

पी.एम किसान ‘Pm Kisan Yojana’ योजना काय आहे ही योजना?

पी एम किसान योजना ही केंद्र सरकार द्वारे चालवणारी योजना आहे. ही योजना अल्पभूधारक शेतकरी आणि लहान वर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 हजार रुपये महाडीबीटी प्रणाली द्वारे पाठवण्यात येणार आहे. हे 6000 रुपयाचे तीन हप्ते म्हणजे 2000 हजार रुपयाचा एक हप्ता असे तीन समान हफ्ते येणार आहे म्हणजेच एकूण ती रक्कम 6000 इतकी असेल. ही योजना चालू करण्याचा उद्देश म्हणजे लहान वर्गीय लोकांना आर्थिक साह्य मिळावा म्हणून सरकारने ही योजना राबवण्यात आली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

प्रधानमंत्री किसान योजनेत पात्रता काय आहे?

1. जे शेतकरी गरीब आणि अल्पभूधारक आहे अशी शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.
2. ज्या शेतकऱ्याकडे शेती करण्यासाठी चांगली योग्य जमीन आहे, अशी शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.
3. अर्ज करणारा शेतकरी भारताचा नागरिक असा हावा.

प्रधानमंत्री किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी येणार?

‘Pm Kisan Yojana’ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचे एकूण 18 ते शेतकऱ्यापर्यंत पोचले आहे परंतु, 19 वा आता कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे. सरकारने सांगितले आहे की एकूण हप्ता हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेची लाभार्थी यादी कशी तपासायची?

1. सगळ्यात अगोदर प्रधानमंत्री किसान संबंधी योजनेच्या
https://pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईट वर जा, त्यानंतर लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा.
2. त्यानंतर मेन पेज वरील लाभार्थी स्थिती टॅब वर क्लिक करा.
3. नंतर तुमची माहिती भरा: तुमचा आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक ,आणि मोबाईल नंबर टाका.
4. त्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता तपासून शकता.

pm Kisan Yojana: अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

1. आधार कार्ड
2. बँक पासबुक
3. मोबाईल नंबर
4. जमिनीचा सातबारा 7/12

प्रधानमंत्री किसान योजनेचा मोबाईल नंबर कसा लिंक करायचा?

प्रधानमंत्री किसान “Pm Kisan Yojana” योजनेबाबतीत नवीन अपडेट आणि हप्ते विषयी सूचना मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलशी लिंक असणे गरजेचे आहे. OTP आधारित ekyc पूर्ण करण्यासाठी देखील तुमचा मोबाईल नंबर  प्रधानमंत्री किसान योजनेची लिंक असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर घरच्या घरी तुमच्या स्मार्टफोनवर पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर वर जाऊन लिंक करू शकतात. किंवा तुम्ही जवळच्या सर्विस सेंटर ला जाऊन देखील लिंक करू शकता.

1. प्रथम तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत
वेबसाईटवर जा.
2. त्यानंतर “अपडेट मोबाईल नंबर “पर्यावर क्लिक करा.
3. पी एम किसान योजनेच्या पोर्टलला नोंद असलेला आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल नंबर टाका.
4. तपासणीसाठी सबमिट पर्यावर क्लिक करा.

Pm Kisan Yojana योजनेचा 19 हप्ता कसा चेक करावा?

पी एम किसान Pm Kisan Yojana योजनेचा 19th हप्ता जमा होण्याला सुरुवात झाली आहे. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही चेक करायचा असेल तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा. आणि तुमचे पी एम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले नाही चेक करा.

1. सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
2. या ठिकाणी आल्याच्या नंतर “Farmer Corner” या पर्यावर क्लिक करायचा आहे.
3. त्यानंतर तुम्हाला ‘Beneficiary Status” हा पर्याय निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी क्लिक करायचा आहे.
4. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पीएम किसान “Pm Kisan Yojana” योजनेसाठी दिलेला रजिस्टर मोबाईल नंबर किंवा बारा अंकी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
5. त्यानंतर तुम्हाला खाली एक पर्याय दिसेल त्यामध्ये कॅपच्या तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचा आहे.
6. सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
7. ओटीपी टाकल्यानंतर पी एम किसान योजनेचे 19 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले किंवा नाही ते तुम्हाला लगेच कळेल.

निष्कर्ष: केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी योजना.लहान कुटुंब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योजना चालू केली आहे. पी एम किसान योजना 2019 मध्ये देशामध्ये चालू केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये रक्कम थेट त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळाला होता. पण मात्र आता 19 हप्ता देखील जमा होण्याला सुरुवात झाली आहे. या योजनेमध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment