Pm Kisan Yojana 20th installment: पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पी एम किसान सन्माननिधी योजनेचा 20वा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. हप्ता मिळवायचा असेल तर जाणून घ्या. E-kyc केवायसी कशी करावी? आणि प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या सविस्तरपणे या लेखांमध्ये.
Pm Kisan Yojana 20th installment: किसान सन्मान योजनांचा 20वा हप्ता कधी मिळणार?
भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी योजना(Pm Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत मिळते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
या योजनेत आतापर्यंत 19 हप्ते यशस्वीपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र आता शेतकऱ्यांना 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या लक्ष लागलेलं आहे.
पी एम किसान योजनेच्या मागील काही त्याचा विचार करता 18वा हप्ता हा 5 ऑक्टोंबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आणि त्यानंतर 19 वा हफ्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. सर्व विचार करता शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेच हप्ता हा चार महिन्याच्या अंतरावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो.
Pm Kisan Yojana: पी एम किसान सन्माननिधी योजना चे फायदे
- 1.देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.
- 2. पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
- 3. पी एम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये आर्थिक मदत मिळते.
- 4. शेतकऱ्यांना योजनेचा फायदा शेतीतील अवजारे व खते घेण्यासाठी होतो.
Pm Kisan Yojana: पी एम किसान योजना म्हणजे काय?
पी एम किसान योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारची ही योजना महत्वकांशी योजना आहे. एम किसान योजनेमध्ये दर चार महिन्याला दोन हजार रुपये रक्कम केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवत असते.
या योजनेची रक्कम शेतकऱ्यांना DBT डीबीटी (डायरेक्ट बँक ट्रान्सफर) प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातात. तर एकूण या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000 रुपये आर्थिक मदत मिळते.
Pm Kisan Samman Nidhi Yojana: पी एम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने मिळतो ?
पी एम किसान सन्माननिधी योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत मिळते. तर ही रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
पी एम किसान सन्मान योजना चा निधी केंद्र सरकार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्राण्याला द्वारे लाभाची रक्कम पाठवले जातात.
पी एम किसान सन्माननिधी योजनेचे ई केवायसी E-kyc कशी करावी?
- 1. सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्माननीय योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
- 2. या वेबसाईटवर आल्याच्या नंतर फार्मर कॉर्नर “Farmer Corner” या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
- 3. त्यानंतर ई केवायसी (E-kyc ) या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
- 4. त्यानंतर बारा अंकी आधार क्रमांक टाकून घ्या आणि ओटीपी पाठवा “Get OTP” या ठिकाणी क्लिक करा.
- 5. त्यानंतर रजिस्टर मोबाईल वरती आलेला ओटीपी टाकून घ्यायचा आहे.
- 6. अशाप्रकारे घरबसल्या पीएम किसान योजनेची एक केवायसी करता येतात.
- 7. पी एम किसान योजनेचे ई केवायसी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- i. आधार कार्ड ii. बँक पासबुक iii. जमिनीचे कागदपत्रे सातबारा