PM Matru Vandana Yojana (PMMVY) 2025: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेत गर्भवती महिलांना ₹5000 रुपये आर्थिक मदत मिळते, ऑनलाइन अर्ज सुरू

PM Matru Vandana Yojana (PMMVY) 2025: प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने महिलांना सर्वांगीण बनवण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना त्या योजना पैकी एक योजना आहे. ही योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारतर्फे चालवण्यात येत आहे. ही योजना चालू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट म्हणजे गर्भवती माता, स्तनदा माता नवजात बालकाचे आरोग्य सुधारणा व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मातृत्व वंदना योजना मार्फत महिलांना 5000 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.ही योजना महिला आणि बाल विकास यांचा विचार करून सुरू करण्यात आली आहे. महिलांना 5000 हजार रुपये ही रक्कम तीन टप्प्यात दिली जाते.

जर लाभार्थी महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर त्या महिलांना एक्स्ट्रा 1000 हजार रुपये दिले जाणार आहे म्हणजे एकत्रित रक्कम म्हणजे एकूण 6000 हजार रुपये त्या महिलांना मिळणार आहे.  हे रक्कम गर्भवती महिलेच्या त्यात डीबीटी (DBT) प्रणाली द्वारे जमा होतील. खालील लेखांमध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे ही योजना कोणासाठी आहे, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे या योजनेचे फायदे काय आहे हे सविस्तरपणे खाली दिलेला आहे. जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

PM Matru Vandana Yojana (PMMVY) 2025

योजनेचे नावप्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025
चालवणारे केंद्रकेंद्र सरकार
सुरू करण्याची तारीख1 जानेवारी 2017
उद्दिष्टमागासवर्गीय कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळते
लाभ5000 रुपये
अधिकृत वेबसाईटwww.wcd.gov.in

हे ही वाचा :: Maharashtra Imarat Bandhkam kamgar yojana 2025: महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना (PMMVY) योजना 2025: काय आहे ही योजना?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे ही एक सरकारी योजना आहे या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017 सुरू करण्यात आली.

ही योजना महिलांसाठी  महत्त्वाची योजना आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा उद्दिष्ट गर्भवती महिलांना आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे गर्भधारक महिलांना त्यांच्या गर्भधारणेच्या वेळेस आणि प्रस्तुतीच्या वेळेस पोषण आणि त्यांच्या आरोग्याची योग्यरित्या काळजी घेता येईल. या योजनेमध्ये महिलाचं पहिलं मूल जन्माला आल्यावर महिलाला सरकारकडून 5000 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन टप्प्यात दिली जाते. ते खालील प्रमाणे आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे हप्ते पुढीलप्रमाणे आहे

1. पहिला हप्ता: हा अंगणवाडीत किंवा आरोग्य सुविधा केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1000 रुपयाची आर्थिक मदत सरकारकडून  दिली जाते.
2. दुसरा हप्ता: दुसरा हप्ता हा गर्भधारणेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर Rs.2000 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो
3. तिसरा हप्ता: मातृत्व वंदना योजनेचा तिसरा हप्ता हा मूल जन्माला आल्यावर त्याच्या लसीकरणाच्या वेळेस 2000 हजार रुपयाचा दिला जातो.

PMMVY प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025: योजनेचा लाभ कुणाला मिळतो?

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ गर्भवती महिलांना घेता येतो. तसेच दारिद्र्य रेषा खालील महिलेला किंवा दारिद्र्य रेषा वरील महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल. ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्यांना या योजनेअंतर्गत 5 हजार रुपये मिळतील. या योजनेचा लाभ 19 वर्ष पूर्ण झालेल्या महिला आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. लाभ घेणारी महिला पहिल्या वेळेस बाळाच्या बाबतीत  असावी. महिला ही भारताचा नागरिक असणे आवश्यक.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2025: या योजनेचे फायदे?

1. गर्भवती महिलाला आर्थिक सहाय्य: प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना 5000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. हे तीन टप्प्यात मिळेल.
2. महिलांना आरोग्य आणि पोषण: प्रधानमंत्री मातृत्व वंदनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांचं आणि नवजात बाळाचं आरोग्य आणि त्या बाळाला पोषण मिळणे.
3. महिलांना सरकारी योजनेचा लाभ : या योजनेमुळे गर्भवती महिलांना विविध सरकारी आरोग्य सेव घेता येईल. या योजनेमुळे मातृत्व महिलांचे स्वच्छता अधिकच प्रमाण वाढेल
4. महिलाचे प्रजनन आरोग्य सुधारेल: गर्भवती महिलांना उत्तम आरोग्य विषयी माहिती सांगणे आणि त्यांच्यामध्ये जनजागृती करणे.
5. महिलांना स्तनपानात प्रोत्साहन करणे: नवजात शिशु च्या आईला स्तनपानामध्ये प्रोत्साहन करणे या योजनेची उद्दिष्ट आहे. जे नवजात बाळासाठी फायद्याचा ठरेल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये काय?

  • 1. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PMMVY ही योजना देशातील गरीब आणि आर्थिक मागासवर्गीय महिलांसाठी राबवण्यात येते.
  • 2. पीएम मातृ वंदना योजना ही गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी सरकार कडून महिलांना पहिल्या अपत्यासाठी आर्थिक मदत देते.
  • 3. PMMVY मातृत्व योजनेमुळे महिलातील पोषण आहाराच्या समस्या पासून सुटका मिळते. आणि गर्भवती महिलांना पोषणाच्या समस्या दूर होतात.
  • 4. पीएम मातृ वंदना योजनेमुळे महिलांना आरोग्य सुदृढ होते. माता आणि बाळ यांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येत आहे.
  • 5. या योजनेमुळे देशातील गर्भवती महिलांचे मृत्यूचे प्रमाण कमी होण्याला मदत होत आहे. या योजनेत महिलांचा आरोग्य सदृढ बनत आहे. यामध्ये महिलांना पोषणाचा आहार मिळतो.
  • 6. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत महिलांना पहिला बाळासाठी ₹5000 रुपये आर्थिक मदत दिले जाते.
  • 7. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची रक्कम दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जाते. ही रक्कम त्यांच्या थेट डीबीटी DBT प्रणाली द्वारे खात्यामध्ये पाठवण्यात येते.
योजनेचे नावप्रधानमंत्री मातृ वंदना योजना
पात्र महिलाभारत देशाचे रहिवासी असावे
योजनेत मिळणारा लाभपहिल्या बाळाच्या जन्मानंतर ₹5000 रुपये
जननी सुरक्षा योजना लाभया योजनेत लाभ घेतलेल्या महिलांना ₹1000 रुपये एक्स्ट्रा मिळणार

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) यासाठी लागणारे आवश्यकता कागदपत्रे कोणते?

1. लाभार्थी महिलाचे आधार कार्ड
2. मोबाईल नंबर ( आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर )
3. बँक पासबुक झेरॉक्स
4. माता बाल संरक्षण कार्ड (MCP)
5. लाभार्थी महिला आणि तिचा पती या दोघांचे आधार कार्ड ( ओळखपत्राचा पुरावा)
6. लाभार्थी महिलाचा आधार कार्ड आणि तिच्या पतीच्या आधार कार्ड याच्यावर स्वतःचे स्वाक्षरी. आणि त्याबरोबर हमीपत्र सोबत जोडावे.
7. दुसरा हप्ताचा लाभ मिळवण्यासाठी गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतरची तपासणी केलेली एमसीपी या कार्डचं झेरॉक्स कॉपी.
8. तिसरा आताचा लाभ मिळवण्यासाठी जन्म झालेल्या बाळाचे प्रमाणपत्र. प्रस्तुती प्रमाणपत्र, बाळाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र त्यासोबत एमसीपी या कार्डची झेरॉक्स तुम्हाला सोबत जोडायचे आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावे?

प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा PMMVY लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा सविस्तरपणे आपण खाली जाणून घेणार आहोत.

1. प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील अर्ज तुम्हाला प्राप्त करावे लागेल.
2. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी किंवा आरोग्य सुविधा केंद्राला तुम्हाला हा फॉर्म मिळेल.
3. यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म देखील उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी तुम्हाला या https://www.wcd.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचा आहे आणि तिथून पीडीएफ डाउनलोड करायचे आहे.
4. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा फॉर्म मिळल्यानंतर या फॉर्म वरील माहिती सविस्तरपणे आणि अचूकपणे भरून घ्यायचे आहे. त्यासोबत त्यामध्ये देण्यात आलेले महत्त्वाचे कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहे.

5. हा फॉर्म सविस्तरपणे भरल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. आणि अंगणवाडी किंवा आरोग्य सेवा केंद्राला हा फॉर्म सबमिट करायचा आहे.

निष्कर्ष: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये PMMVY गर्भवती महिलांना पोषणाची सुविधा आणि आरोग्याची सुविधा मिळते. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय या गर्भवती महिलांना मिळतो. या योजनेत महिलांना पहिल्या बाळाचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये रक्कम थेट त्यांच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PMMVY या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment