Pm vishwakarma yojana 2025: भारतातील कारागीर समाजातील बांधवांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे ही योजना भारतातील कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. ही योजना सरकारने 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत कारागीर बांधवांना सरकार आर्थिक मदत ,कौशल्य, विकास, आणि प्रशिक्षण प्रदान करते. सरकार हे नेहमी नागरिकांच्या भवितव्याच्या विचार करून नवनवीन योजना राबवत असते त्याचप्रमाणे ही योजना पण कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचे फायद्याची ठरणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे. हे अर्ज प्रक्रिया कशी करावी करायची आहे. या योजनेसाठी कोण पात्र आहे, ही योजना काय आहे, हे सविस्तरपणे आपण खालील लेखांमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा लेख सविस्तरपणे पूर्ण वाचा.
Pm vishwakarma yojana 2025: काय आहे ही योजना?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही एक सरकारी योजना आहे. ही योजना विशेषतः कारागीर बांधवांसाठी आहे. केंद्र सरकारने देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील जे हस्त कलाकार कारागीर बांधव आहे. या बांधवांना आर्थिक साह्य देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत कारागिरांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी 13,000 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये 18 पारंपारिक उद्योगाचा समावेश आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक बाबीवरील मंत्रिमंडळ समितीने 13,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी सरकारने पाच वर्षाचा कालावधीसाठी आर्थिक वर्ष (2023-2024 ते 2027-2028) मंजूर दिली आहे. जे नागरिक हाताने कला करतात हस्तकलाकार आहेत. कारागिरी चे गुरु अथवा शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाचे कौशल्य जोपासणे ,आणि त्याला बळकटी देणे हे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे. हस्तकलाकारांचे आणि कामगाराचे कामाचा दर्जा सुधारणे, त्याचप्रमाणे त्यांची कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून, विश्वकर्मा आणि जागतिक मूल्य स्थानिक साखळीशी जोडले जातील, आणि हे सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कलाकारांना कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्रद्वारे ओळखले जातील. त्याचप्रमाणे त्यांना%5 व्याज दर सवलतीने पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रूपापर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. याशिवाय ही योजना कौशल्य ,विकास ,अर्थसहाय्य डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देते.
Pm vishwakarma yojana: पीएम विश्वकर्मा योजना चा लाभ कोणाला मिळतो ?
pmvishwakarma.gov.in ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील हस्तकला कारण साठी सह्य करेल. या योजनेतील 18 पारंपारिक उद्योगाचा समावेश केला जाईल.
क्रमांक | व्यवसाय | काम |
---|---|---|
1 | सुतार | लाकडी वस्तू आणि फर्निचर बनवणे |
2 | होडी बांधणी करणारे | होड्या तयार करणे |
3 | चिलखत बनवणारे | संरक्षणासाठी चिलखत तयार करणे |
4 | लोहार | लोखंडी वस्तू तयार करणे |
5 | हातोडी आणि शेतीची अवजारे बनवणारे | शेतीसाठी आवश्यक साधने तयार करणे |
6 | कुंभार | मातीच्या भांड्यांची निर्मिती |
7 | सोनार | सोने-चांदीची दागिने बनवणे |
8 | कुलूप बनवणारे | कुलूप आणि सुरक्षितता यंत्रे तयार करणे |
9 | शिल्पकार | मूर्ती आणि शिल्पे बनवणे |
10 | चांभार | चामड्याच्या वस्तू बनवणे (बूट, चप्पल) |
11 | मिस्तरी | बांधकाम आणि इमारती तयार करणे |
12 | टोपल्या, चटया, झाडू बनवणारे | विणकाम करून वस्तू तयार करणे |
13 | बाहुल्या आणि खेळणी बनवणारे | पारंपारिक खेळणी तयार करणे |
14 | न्हावी | केस कापणे आणि दाढी करणे |
15 | फुलांचे हार बनवणारे | फुलांचे हार आणि सजावटीच्या वस्तू बनवणे |
16 | धोबी | कपडे धुण्याचा व्यवसाय |
17 | शिंपी | कपडे शिवणे आणि टाक्यांचे काम करणे |
18 | दुपारी जाणे विणणारे | हाताने कपडे किंवा चादरी विणणे |
Pm vishwakarma yojana2025: काय आहे पात्रता?
- 1. अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- 2. अर्ज करणारा नागरिका विश्वकर्मा योजनेअंतर्गत दिलेल्या क्षेत्रांमधील 18 क्षेत्रा पैकी एका मध्ये काम करत असावा.
- 3. अर्जदाराचे वय हे 18 वर्षा पेक्षा जास्त असावे आणि50 वर्षा पेक्षा कमी असावे.
- 4. मान्य पात्र संस्थेचे असलेल्या ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- 5. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत दिलेल्या जाती पैकी एक जात असणे आवश्यक.
Pm vishwakarma yojana 2025: लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. उत्पन्न प्रमाणपत्र
4. रहिवासी दाखला
5. ओळखपत्र
6. जातीचे प्रमाणपत्र
Pm vishwakarma yojana 2025: अर्ज कसा करायचा?
- 1. सर्वप्रथम तुम्हाला मला तुमच्या जवळपासच्या सर्विस सेंटर मध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. मी तुमची ओळख ही निश्चित होते.
- 2. कामगार नोंदणी: तुमचा आधार कार्ड मोबाईलची लिंक झाल्यानंतर CSC द्वारे तुमची कारागीर नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी यामुळे करावे लागते की ही नोंदणी ठरवते की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही.
- 3. अर्ज फॉर्म भरणे: त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट CSC केंद्राद्वारे कमेंट करून तुमचा अर्ज करावा लागेल. त्यामध्ये व्यावसायिक आवश्यक कागदपत्राचे स्कॅन कॉपी असेल.
- 4. माहिती भरा: त्यानंतर तुमच्याद्वारे भरलेली सर्व माहिती ग्रामपंचायत किंवा स्थानिक निकाय द्वारे पहिल्या टप्प्यामध्ये सबमिट केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची माहितीची पडताळणी होईल जर तुम्ही या योजनेच्या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल नाहीतर नाकारला जाईल.
- 5. ऑनलाइन अर्ज स्वीकारला गेल्यानंतर: तुमचा अर्ज ऑनलाईन द्वारे स्वीकारला गेल्यानंतर तुम्हाला Pm vishwakarma digital ID आणि certificate किंवा विश्वकर्मा प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र तुम्ही विश्वकर्मा योजनेमध्ये आहात याची नोंदणी पुष्ट करते.
- 6. कार्ड मिळाल्यानंतर चे फायदे: कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही विश्वकर्मा योजनेसाठी किंवा या योजनेमार्फत कर्जासाठी अर्ज सादर करू शकता.
निष्कर्ष::
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सरकारी योजना असून या योजनेद्वारे हस्त कलाकार, आणि कामगारांना सरकारकडून आर्थिक साह्य कौशल्य, विकास प्रदान करणार आहे. या योजनेद्वारे सरकार हे कारागिरांना विश्वकर्मा योजनेचे कार्ड प्रदान करणार आहे . ज्या मार्फत कारागीर कलाकार हे विश्वकर्मा योजनेचे कार्ड वापरून कर्जासाठी अर्ज करू शकते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.