Vihir Anudan Yojana 2025: नव्या व जुन्या विहिरीचा काम करण्यासाठी सरकार देत आहे अनुदान, काय आहे ही योजना जाणून घ्या सविस्तर

Vihir Anudan Yojana 2025: अनुसूचित जातीय एससी,एसटी आणि ओबीसी शेतकऱ्यांना फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजना राबवले जात आहे. यावेळी पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी सरकार आणून देत आहे. तर यासाठी एकूण रक्कम अडीच लाख रुपये दिले जात आहेत. तर या योजनेचे संपूर्ण माहिती काय आहे खली लेखामध्ये जाणून घेऊया.

Vihir Anudan Yojana 2025: कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार विहीर अनुदान योजना लाभ?

अनुसूचित जाती जमाती मध्ये शेतकऱ्यांना एससी एसटी ओबीसी या प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजनेनुसार. लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन या जुन्या विहीर खोदकाम करण्यासाठी सरकार अडीच लाख रुपये अनुदान देत आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी विहीर खोदकाम करण्यासाठी अनुदान दिले जातात. अनुसूचित जमातीतील व नवबौद्ध शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्न वाढवण्यास मदत होते. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कृषी स्वावलंबी योजना राबवली जात आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबवली जाते. लाभार्थ्यांना या योजनेची अनुदान समाज कल्याण विभागाअंतर्गत दिले जाते. या योजनेमार्फत बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरीत खोदकाम केले जात आहे याची माहिती विभागामार्फत मिळत मिळाली आहे.

हे ही वाचा :: Crop Insurance Approval Farmer : 2024 मधील पिक विमा मंजूर ,शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी होणार भरपाई जमा

Vihir Anudan Yojana 2025: विहीर खोदकाम उन्हाळ्यात का करतात?

पावसाळ्याचा परिस्थितीमध्ये चिखल आणि पाण्यामुळे विहिरीचे काम करता येत नाही. त्यामुळे शेतकरी विहिरीचे काम उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करतात. आणि उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीचे कामे कमी असल्यामुळे शेतकरी विहीर खोदकाम करण्याचे काम करतात.

Vihir Anudan Yojana: या योजनेचे निवड समिती कोण?

या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी निवड समिती ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे असते. यामध्ये सहा सदस्याचा सहभाग असतो. त्यांच्यामार्फत निवड केली जाते.

Vihir anudan Yojana: एका शेतकऱ्याला किती अनुदान मिळते?

जर लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधकाम करायचे असेल तर सरकार हे 2.5 lakh अडीच लाख रुपये अनुदान देते आहे. आणि जर शेतकऱ्यांना त्यांच्या जुन्या विहिरीचं काम करायचं असेल तर सरकारी 50 हजार रुपये अनुदान देत आहे.

आणि जर विहिरीमध्ये इनवेल बोरिंग घ्यायचं असेल तर वीस हजार रुपये सरकार देत आहे. आणि त्याचबरोबर कृषी पंपासाठी सरकार 20,000 रुपये देत आहेत. आणि वीज जोडण्यासाठी ₹10 हजार रुपये  देखील सरकारांना देत आहे. शेततळ्यातील प्लास्टिक साठी एक लाख रुपये, तुषार सिंचनासाठी ₹25 हजार रुपये. ठिंबक सिंचनासाठी 50 हजार रुपये अनुदान सरकार देत आहेत. अशा प्रकारचे अनेक अनुदान सरकारी योजनेचे माध्यमातून देत आहे.

Vihir Anudan Yojana: विहीर अनुदान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?

लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर अनुदान मिळण्यासाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या आवश्यकता डॉक्युमेंट जोडावे लागते.

  • 1. लाभार्थी शेतकरी हा अनुसूचित नवबौद्ध जातीतील असावा.
  • 2. लाभार्थी शेतकऱ्याकडे सक्षम प्राथमिकरण दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे.
  • 3. नवीन विहीर बांधकाम करण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी एक एकर शेती असावी.
  • 4. लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावरती सातबारा 7/12 आणि 8 अ असावी.
  • 5. विहिरीच्या व्यतिरिक्त इतर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावरती वीस गुंठे शेती असावी.
  • 6. लाभार्थ्यांची बँक तपशील झेरॉक्स कॉपी.
  • 7. लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड.
  • 8. लाभार्थी शेतकऱ्यांच वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.

Vihir Anudan yojana: विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा?

लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन विहिरीचे खोदकाम करायचा असेल तर अर्ज हा जवळ कृषी कार्यालयामध्ये अर्ज करावा लागेल. किंवा तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्ही विहीर अनुदान मिळण्याचा अर्ज करू शकता. तेव्हा काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील यामध्ये केला जातो.

जिल्हा नुसार कृषी कार्यालय: तुमचा जिल्हा मध्ये कृषी कार्यालयाला भेट द्यायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन विहीर खोदकाम करण्यासाठी अर्ज करायचा आहे.

ग्रामपंचायत कार्यालय: तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात आपले द्यायचे आहे नवीन विहीर बांधकाम करण्यासाठी अर्ज करू शकता.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज: कृषी कार्यालय यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. त्यासाठी तुम्हाला यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.

नवीन विहीर खोदकाम करण्यासाठी लागणारे आवश्यकता कागदपत्र: लाभार्थी शेतकऱ्यांचे स्वतःचे आधार कार्ड, जमिनीची तपशील जसे की ७/१२ सातबारा आठ अ उतारा, शेतकऱ्यांच्या नावावरती सविन असावे. इत्यादी आवश्यकता कागदपत्र यासाठी लागणार आहे.

अनुदान: या योजनेचा शेतकऱ्यांन वेगवेगळे प्रकारच्या अनुदान मिळतात. उदाहरणार्थ बोरवेल, ठिंबक सिंचन, वीज जोडणी, सोलार पंप आणि शेततळे अशा प्रकारच्या अनुदान यामध्ये मिळतात.

निष्कर्ष: विहीर अनुदान योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अनुदान मिळतात. जसे की शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदकाम करायचे असेल तर अडीच लाख रुपये शेतकऱ्यांना मिळतात. जर शेतकऱ्यांना जुन्या विहिरीचे खोदकाम करायचा असेल तर 50 हजार रुपयांमध्ये शेतकऱ्यांना मिळतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज जोडणे सोलार पंप शेततळे अशा प्रकारचे अनुदान सरकार शेतकऱ्यांना देत असतात. या विषया अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याजवळील कृषी विभाग कार्यालयाला भेट द्या. किंवा तुमच्या ग्रामपंचायत कार्याला भेट द्या आणि या योजनेविषयी माहिती जाणून घ्या.

Leave a Comment