Vik Vima Bank Status Check: पिक विम्याचे पैसे कुठल्या बँकेत आले आहे, कसे चेक करायचे? बघा सोपी पद्धत

Vik Vima Bank Status Check: लाभार्थी शेतकऱ्यांना कुठलाही सरकारी योजना चे पैसे डीबीटी DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र ते कोणत्या बँकेत जमा झाले आहे? हे कसं बघायचं तर आपण ते सविस्तर या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Vik Vima Bank Status Check: पिक विमा योजना बँक पैसे कसे चेक करायचे?

सरकारच्या माध्यमातून विविध सरकारी योजना राबवल्या जातात. या योजना अनुदान (Government Schemes Subsidy) सरकार हे डीबीटी प्रणाली द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान पाठवले जातात. म्हणजे शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँकेला लिंक असेल अशा शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा अनुदान थेट त्यांच्या बँकेत मिळतात.

जसे की नमो शेतकरी योजना, Pm Kisan Yojana पी एम किसान योजना, आणि पिक विमा योजना (Pik Vima Yojana) अशा विविध सरकारी योजना चे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यावर पाठवले जातात.

Vik Vima Bank Status Check: शासनामार्फत विविध सरकारी योजना चे पैसे कोणत्या बँकेत येतात?

अनेकदा लाभार्थी शेतकरी विविध सरकारी योजनेचा लाभ घेत असताना नेमकं त्यांचे खाते कोणत्या बँकेला (Bank Account) आधार कार्डशी जोडलेले होते. पिक विमाचे अनुदान, अत्यदृष्टी अनुदान हे शासकीय मिळणारे अनुदान नेमकं कोणत्या बँकेतील अशी प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडतात. आणि असे प्रश्न लाभार्थी शेतकरी वारंवार विचारत असतात.

लाभार्थी शेतकऱ्यांचे सद्यस्थिती अनुदान हे बँक खात्यात येतात. मात्र हे कोणत्या खात्यात येतात हे शेतकऱ्यांना माहिती नसते. तरीही कोणत्या बँकेमध्ये येतात ते आपण  NPCI एन.पी.सी.आय या माध्यमातून आपले खाते कोणत्या बँकेची लिंक आहे हे आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊया.

Pik vima bank account Status: अशाप्रकारे चेक करा पिक विमा मिळणारे बँक खाते?

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला एनपीसीआय या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
  • 2. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी निळ्या रंगांमध्ये काही पर्याय दाखवण्यात येईल.
  • 3. त्यानंतर तुम्हाला तिथे निळ्या रंगांमध्ये कंजूमर “Consumer” नावाचा पर्याय दिसेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 4. त्यानंतर तुम्हाला भारत आधार सीडिंग इनेबल (Bharat Adhar Seeding enable) या पर्यावरणाची तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 5. त्यानंतर तुम्हाला पुढील पेज वरती इंटर (Enter Your Aadhar) युवर आधार हा पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 6. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बारा अंकी आधार क्रमांक (Aadhar Number) टाकून घ्यायचा आहे.
  • 7. आधार क्रमांक टाकल्यानंतर त्याखाली तुम्हाला कॅपच्या “Captcha” कोड दिलेला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे.
  • 8. त्यानंतर आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी OTP तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे.
  • 9. आलेला ओटीपी टाकल्यानंतर कन्फर्म पर्यावरण तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
  • 10. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या बँकेची माहिती दिसेल की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे किंवा तुमची बँक कोणती आहे.
  • 11. तुम्ही आधार कार्डशी कोणती बँक लिंक केलेले आहे किंवा बँकेचे अकाउंट नंबर कोणत्या आहे बँकेचे खाते क्रमांक कोणता हे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे.
  • 12. अशाप्रकारे विविध सरकारी योजना चा लाभ येणारे अनुदान तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये येतात हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment