Pm Aawas Yojana Beneficiary list 2025: प्रधानमंत्री आवास योजना 2025 मध्ये आता अर्ज प्रक्रिया सक्रिय झाल्यामुळे जे लोक पीएम आवास योजनेचा लाभ घेऊ शकले नाही अशा लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि खुशखबर आहे कारण पीएम आवास योजनेचे अर्ज प्रक्रिया आता परत सुरु झाले आहे ज्या लोकांनी याचा लाभ घेतला नाही त्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे आणि त्यांचे हक्काचे घर सुद्धा मिळणार आहे. आता पीएम आवास योजनेची लाभार्थी यादी सुद्धा उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या अर्जदाराचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा अर्जदारांचे नाव जारी केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लिस्टमध्ये समावेश केले जात आहे. पीएम आवास योजनेची यादी अनेक भागांमध्ये जाहीर केली जात आहे.
जर तुम्ही मागच्या महिन्यामध्ये अर्ज केला असेल परंतु काही कारणास्तव तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये नसेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी यादी जाहीर केले आहे त्या यादीमध्ये तुमचे नाव तपासा.
Pm Aawas Yojana Beneficiary list 2025: लाभार्थी यादी जाहीर
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेल्या मागील लाभार्थी यादीत ज्यांचे नाव आलेले आहे अशा सर्व अर्जदारांना घरांचा लाभ देण्यात आला आहे. त्यानंतर सरकारने ज्यांचे नावे यादीत नसेल अशा लोकांसाठी नवीन यादी तयार केली होती त्या यादीमध्ये ज्या अर्जदारांचे नाव असलेल्या सर्वांना पहिला हप्ता दिला जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता लाभार्थी यादी ही ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदार सहज हाऊसिंगच्या वेबसाईटला भेट देऊन तुमचे नाव यादीमध्ये आहे की नाही तपासून शकता.
जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करताना तुम्हाला काही अडचणी येत असत्याल ,तर हा लेख तुमच्यासाठीच आहे या लेखांमध्ये अर्ज कसा चेक करायचा अर्जाची स्थिती कशी चेक करायची ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने हे सर्व माहिती तुम्हाला आम्ही सविस्तरपणे खालील लेखांमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही तुमची यादी तपासता येईल आणि या योजनेचा लाभ घेता येईल.
pm Aawas Yojana: काय आहे पात्रता?
- 1. पीएम आवास योजनेचा लाभ मिळालेला नसावा.
- 2. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे .
- 3. अर्जदाराचे वेगळे कुटुंब ओळखपत्र असावे.
- 4. दाराच्या नावावर कोणतीही वैयक्तिक मालमत्ता असू नये.
- 5. अर्जदाराचे सर्वेक्षण प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत व्हायला हवे.
- 6. अर्जदाराचे अर्ज मंजूर कोणीही खूप महत्त्वाचे आहे.
Pm Aawas Yojana : काय आहे ही योजना?
प्रधानमंत्री आवास योजना ही एक सरकारी योजना असून, मध्यमवर्गी आणि गरीब कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे . ही योजना 2016 पासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत कोट्यावधी लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
योजनेअंतर्गत शहरी भागातील लोकांना 2,50,000 लाखाची मदत दिली जाते तर ग्रामीण भागातील लोकांना घर बांधण्यासाठी 1 लाख20 हजाराची आर्थिक मदत दिली जाते हे पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये हस्तरेखित केले जातात.
प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता:
ज्या अर्जदाराचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये समाविष्ट आहे. अशा सर्व अर्जदारांना सरकारी नियमानुसार दहा ते पंधरा दिवसांमध्ये पहिला हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी प्रणाली द्वारे हस्तरेखित केला जातो. ज्या अर्जदाराचे नाव नवीन यादीमध्ये असेल अशा अर्जदारांचे अर्जदारांना पहिला हप्ता हा 25 हजार रुपयांचा हस्तरेखित करण्यात आले आहे.
Pm Aawas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेची यादी कशी तपासायची?
प्रधानमंत्री आवास योजनेची यादी तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- 1. सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- 2. पोर्टल वरती लॉगिन केल्यानंतर तुम्हाला मेनू पेजवर जावे लागेल. तेथे तुम्हाला “Aawsoft“चा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा आणि पुढे जा.
- 3. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, तेथून बेनिफिशरी फिल्डमध्ये जा.
- 4. त्यानंतर मिस रिपोर्ट वर क्लिक करा.
- 5. सांगितलेली आवश्यक माहिती तिथे भरा.
- 6. आता आवश्यकतेनुसार कॅप्चर कोड भरा आणि सर्च बटन वर क्लिक करा..
- 7. तुमच्या समोर आता प्रधानमंत्री आवास योजनेची यादी ओपन होईल, तिथे तुमचे नाव चेक करू शकता.
निष्कर्ष: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे .त्यामुळे त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न हे पूर्ण होतील. गरीब लोकांना आणि मध्यमवर्गी लोकांना घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना घर बांधण्यासाठी सरकारकडून 1 लाख 20 हजाराची आर्थिक मदत दिली जाणार आहेत तर शहरी भागातील लोकांना घर बांधण्यासाठी 2,50,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे. या आर्थिक मदतीमुळे घर बांधणे हे गरिबांना सोपे होईल आणि त्यांच्या हक्काचे घर बनेल जर तुमचेही नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या लिस्ट मध्ये असेल तर ते चेक करणे या योजनेचा लाभ घ्या.